अंबे एक करी उदास न करी भक्तासी हाती धरी ।
विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी ।।
चित्ती मूर्ति बरी वरा भयकरी ध्यातो तुला अंतरी ।।
वाचा शुध्द करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ।।१ ।।
माते एकविरे वरा भय करे दे तू दया सागरे ।।
माझा हेतु पूरे मनात न उरे संदेह माझा हरे ।।
जेणे दुःख सरे कुबुद्धि विसरे ब्रह्मैक्यधी संचरे ।।
देई पूर्णकरे भवांबुधि तरे ऐसे करावे त्वरे ।।२ ।।
अनाथासी अंबे नको विसरु वो ।
भवः सागरी सांग कैसा तरु वो ।
अन्यायी मी हे तूझे लेकरु वो |
नको रेणुके दैन्य माझी करु वो ।।३ ।।
मुक्ताफले कुंकुम पाटलांगी |
सन्ध्येव तारानिकरे विभाती ।
श्रीमूळपीठा चल चूडिकाया ।
तामेंकवीरा शरणं प्रपद्ये ।।४ ।।
सखे दुःखीताला नको दुःखवु वो ।
दिना बालकाते नको मोकलू वो ।
ब्रिदा रक्षि तू आपुल्या श्री भवानी ।
ही प्रार्थना ऐकुनि कैवल्यदानी ।।५।।
माते तुझे ध्यान आम्हास राहो |
तुझे नाम आमुचे मुखास येवो ।
माते तुझे आम्ही दासानुदास |
नमस्कार माते तुझ्या चरणास ।।
जगदंब जगदंब ऐसे म्हणावे |
देहातीत होवोनि जावे |
स्वानंदसाम्राज्य भोगावे |
समाधीस्थिती ।।
काय मागू अंबाबाई ।
मागणे लई नाही |
संत सेवा घडो ।
मुखी नाम जडो ।
दर्शन तुझे घडो अंबाबाई ।।
.png)