छंद तुझा लागला, गं अंबाबाई नाद तुझा लागला

×

📿 सेवा बुकिंग / चौकशी फॉर्म

छंद तुझा लागला, गं अंबाबाई नाद तुझा लागला

भरजरीचा शालु गं अंबे भरजरीचा शालु ।
कशाने चुरगळला , गं अंबाबाई पालखीचा भार पडला 
|| 1 || 

सव्वा मन गुगुळ अंबे सव्वा मन गुगुळ । 
आकाशी धुर गेला , गं अंबाबाई शंकर गुरु केला 
॥ 2 ।। 

नवरत्नांचा चुडा गं अंबे नवरत्नांचा चुडा । 
कश्याने तडतडला , गं अंबाबाई सोंगट्यांचा डाव रंगला || 3 ||

सरज्याची नथ अंबा ,सरज्याची नथ ।
कशाने ओली झाली , गं  अंबाबाई पेल्याने दुध प्याली || 4 ||

बुट्टेदार शालू अंबा ,बुट्टेदार शालू।
कशाने मळविला ,
गं राती बाई परशूला खेळवीला  || 5 ||

सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं । 
शंकरासी अंबाबाई सारीपाठ  खेळ गं 
डाव कुणी जिंकला ग अंबाबाई ।।6 ।। 

छंद तुझा लागला, गं अंबाबाई नाद तुझा लागला ..





Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने