माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या

माय माझ्या रेणुकेची । 

दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ।।धृ ।। 


माहुरगडी हिच ठाण | 

भक्तांसाठी केल येण | 

आनंदाने सेवा घेई । 

दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ।।१ ।। 


लाल शालु ही नेसली । 

अंगी काचोळी घातली । 

कैसी वेल्हाळ शोभली । 

दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ।।२ ।। 


मारुनी दैत्य महिषासुर । 

तेथे दृष्ट झाली अपार | 

भक्तीसुमने घेऊनी हाती । 

दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ।।३ ।। 


पाहुनि सुंदर मुर्ति तुझी । 

दृष्ट काढिते रेणुकेची । 

चरणी लीन रमादासी 

दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ।। ४ ।।

Instant Article Tags

थोडे नवीन जरा जुने