नित्य असो दे चरणासी दे मज आशिष तू आई

 नित्य असो दे चरणासी । 


दे मज आशिष तू आई ।। धृ .।। 


तुज चरणी मज स्वर्ग दिसे ग | 

नाही भीती नरकाचि ।

दे मज आशिष तू आई  || १ || 


सुख - दुःखाची जाणीव नाही । 

शक्ती मिळे मज चरणासी । 

दे मज आशिष तू आई  ।।२ ।। 


ऐसी विनंती करितो तुजला | 

सेवा घडो दे चरणांची  । 

दे मज आशिष तू आई  ।।३ ।।



थोडे नवीन जरा जुने