तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा


तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा ।। धृ ।।



कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत


फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई ।। १ ।।



आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा


केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई ।। २ ।।



ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात


ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई ।। ३ ।।



टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान


टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई ।। ४ ।।


Instant Article Tags

थोडे नवीन जरा जुने