जय करुणाघन निजजनजीवन
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ धृ ॥
निज अपराधे उफराटी दृष्टी
होऊनी पोटी भय धरु पावन ॥ १ ॥
तू करुणाकर कधी आंम्हावर
रुससी न किंकर वरद कृपाघन ॥ २ ॥
वारी अपराध तू मायबाप
तव मनी कोप लेश न वामन ॥ ३ ॥
बालकापराधा गणे जरी माता
तरी कोण त्राता देईल जीवन ॥ ४ ॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥ ५ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .