॥ करुणात्रिपदी पद २रे ॥
श्री गुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥ धृ ॥
चोरे द्विजासी मारिता मन जे
कळवळले ते कळवळो आता ॥ १ ॥
पोटशूळाने द्विज तडफडता
कळवळले ते कळवळो आता ॥ २ ॥
द्विजसुत मरता वळले ते मन
हो की उदासीन न वळे आता ॥ ३ ॥
सतीपती मरता काकुळती येता
वळले ते मन न वळे की आता ॥ ४ ॥
श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता
कोमल चित्ता वळवी आता ॥ ५ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .