आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ll ध्रु ll
पुण्यग्रामी तूं वससी, भक्तां पावन तूं करिसी
भजती त्याते उध्दरीसी न भजती त्यांही कृपा करीसी
(चाल) पुरुषोत्तमा तूं अवतारा, पुरुषोत्तमा तूं अवतारा
शरण येऊन, विनीत होऊन, धुली घेईन
श्रीगुरू आपुल्या चरणांची । किमया पावन करण्याची ।।
आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ।।१।।
भागवतावरी तव प्रीती, स्वकुळी गणेशदत्तभक्ति
ज्ञानी विद्यावाचस्पती, अंकित कुंडलिनी शक्ति
(चाल) कवीश्वरा तूं ईश्वरा, कवीश्वरा तूं ईश्वरा
जगती प्रगटून, लीला दावून, तरीही लपवून
ठेविली ओळख स्वरुपाची, गाईन लीला कीर्तीची ।।
आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ।।२।।
शुभ्र वस्त्र शुचीचे ल्याले, वात्सल्या मूर्तरुप आले
ज्ञाना विनये शोभविले, ब्रह्म साकारुनि आले
(चाल) भक्तवत्सला दयाघना, भक्तवत्सला दयाघना
दृष्टीने करुण, मजला बघून, जवळी घेउन
वर्षा करी बा ममतेची, मागीन भिक्षा भक्तीची ।।
आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची।। ३।।