धन्य अंबापूर महिमा | योगेश्वरी देवीची आरती

धन्य अंबापूर महिमा विचित्र 


पार्वती अवतार योगिनी क्षेत्र 


दंतासूर मर्दोनी केले चरित्र 


सिध्दांचे स्थळ हो महापवित्र 



जय देवी जय देवी जय योगेश्वरी 


महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी। जय देवी ।।धृ।।



पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारी 


माया मोचन सकळ माया निवारी 


साधक सिध्दी वाणेच्या तीरी 


तेथिल महिमा वर्णं न शके वैखरी। जय देवी ।।२।।



सिध्दलिंग स्थळ परम पावन 


नरसिंह क्षेत्र तेथे नरसिंह वदन 


मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण 


संतांचे माहेर गोदेवी स्थान। जय देवी ।।३।।



महारुद्र तेथे भैरव अवतार 


काळभैरव त्याचा महिमा अपार 


नागझरी तीर्थ तीर्थांचे सार 


मार्जन करीता दोष होती संहार। जय देवी ।।४।।



अनंत रुप शक्ती तुज योग्य माते 


योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते 


व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते 


नीलकंठ ओवाळू कैवल्य माते । जय देवी ।।५।।

🔴 संबंधित इतर पोस्ट्स 👇

थोडे नवीन जरा जुने