करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवुनिया मन ।
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥ धृ ॥
धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व ।
कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनी सगर्व ।
योग याग तप दान नेणती असताही अपूर्व ।
सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व, करितो ॥ १ ॥
अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती ।
भिक्षुक होऊनी अनसूयेप्रती बोलती त्रैमूर्ती ।
नग्न होऊनी आम्हाप्रती द्या अन्न असे वदती ।
परिसुनी होऊन नग्न अन्न दे, तंव ते शिशू होती, करितो ॥ २ ॥
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र ।
ब्रह्मदेव तो जाहला चंद्र जाहला तो उपेंद्र ।
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र ।
वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतंद्र, करितो ॥ ३ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .