सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।
कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥
न कळे ब्रह्मादिकां अंत अनंता ।
तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥
जय देव जय देव जय करुणाकारा ।
आरती ओवाळू सद्गुरूमाहेरा ॥ धृ ॥
मायेविण माहेर विश्रांती ठाव ।
शब्दी अर्थी लाव बोलणे वाव ।
सद्गुरूच्या प्रसादे सुगम उपाव ।
रामी रामदास फळाला सद्भाव ॥ जय ॥ २ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .