गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायी वाजति घुंगूर ।
गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी ।
पूजिती जन तुजला ॥ २ ॥
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
गंध पुष्प धूप दीप समर्पुनी ।
अर्पिती पुष्पाला ॥ ३ ॥
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
भक्त हरी हा आठवितो रूप ।
गातो तव लीला ॥ ४ ॥
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .