🔴 श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम् | या स्तोत्राचे पठणाने बुद्धीमध्ये वाढ होते |

आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण प्रखर होण्यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अतिशय उपयोगी आहे. हे एक स्कंदपुराणातील अनुभवसिद्धस्तोत्र असलेल्यामुळे सर्वांनी त्यांच्याकडून रोज एक  दोन वेळा तरी हे स्तोत्र म्हणवून घ्यावे. तुम्हाला फरक निश्चितच जाणवेल बृहस्पतीसारखे बुद्धीशाली मुले बनतील हे स्तोत्र दररोज सकाळी (ब्रह्म मुहूर्तावर) म्हणावे.


अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।

स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।

मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।


श्रीस्कंद उवाच।।


 योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:।

स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।।


 गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:।

तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।


 शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:।

सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।


 शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत।

 सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।


 अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्।

 प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।


 महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्।

 महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।


|| इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम् ||

 

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पुरश्चरण - एक पुष्य नक्षत्र पासून दुसऱ्या पुष्य नक्षत्रापर्यन्त (२७ दिवश) पिंपळाच्या झाडाखाली रोज दहा वेळा म्हणावे . म्हणजे एक पुरश्चण होते. प्रारंभ गुरुपुष्यामृत योगावर करावा. । हे स्तोत्र पहाटे श्रद्धेने म्हणावे. या स्तोत्राच्या नित्य पाठाने बुद्धीची वाढ होते . ॥

थोडे नवीन जरा जुने