सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी मारोतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । 

करी डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी । 

गडबडीले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी | 

सुर नर निशाचर त्या झाल्या पळनी ।।धृ ।।


जयदेव जयदेव जय हनुमंता। 

तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || 


दुमदुमली पाताळे ऊठीला प्रतीशब्द | 

थरथरला धरणीधर मानीला खेद । 

कडकडीले पर्वत उड्डागण ऊच्छेद । 

रामी रामदासा शक्तीचा शोध || 


जयदेव जयदेव जय हनुमंता। 

तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || 
थोडे नवीन जरा जुने