धूप दीप झाला आता कापूर आरती ।
देवा कापूर आरती ॥
रत्नजडित सिंहासनी (२) भगवंता मूर्ती ॥ धृ ॥
कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे ।
देवा मानस राहू दे ॥
कर्पूरासम भावभक्तीचा (२) सुगंध वाहू दे ।
धूप दीप झाला ... ॥ १ ॥
कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती ॥
देवा पाहीन तव मूर्ती ॥
नयनी साठवू (२) ही भगवंत मूर्ती ।
धूप दीप झाला ... ॥ २ ॥
ज्ञान कळेना ध्यान कळेना । कळेना काही ॥
देवा कळेना काही ॥
शब्दरूपी गुंफूनी माळा (२) वाहतसे पायी ।
धूप दीप झाला ... ॥ ३ ॥
नेत्री ध्यान मुखी नाम हृदयी तव मूर्ती ॥
देवा हृदयी तव मूर्ती ॥
भावभक्तीने केली देवा (२) कापूर आरती ।
धूप दीप झाला ... ॥ ४ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .