॥ श्रीसत्यदत्त व्रतकथा ॥
अथ प्रथमोऽध्यायः ।
।। श्रीगुरुः शरणम् ।। ।। श्रीसत्यदत्तव्रतकथारम्भः ।।
श्रीगणेशाय नमः ।। श्रीदत्त ।।
दीपक उवाच ।।
दत्तात्रेयाभिधः कोऽयं देवः सिद्धेशवन्दितः ।
वर्णयन्ति महात्मानो यञ्चरित्रमनुत्तमम् ॥ १ ॥
वेदधर्मा उवाच ।।
धन्योऽसि कृतकृत्योऽसि सौभाग्योऽसि धरातले ।
श्रीदत्तात्रेयमाहात्म्ये यस्य ते मतिरुत्तमा ॥ २ ॥
योगीशस्य परं वक्ष्ये माहात्म्यं पापनाशनम् ।
सद्यः सिद्धिप्रदनृणां सत्यदत्तव्रताश्रयम् ॥ ३ ॥
कलिमागतमाज्ञाय शौनकाद्या महर्षयः ।
सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्त्रसममासत ॥ ४ ॥
त एकदा तु मुनयः प्रातर्तुतहुताग्नयः ।
सत्कृतं सूतमासीनं पप्रच्छुरिदमादरात् ॥ ५ ॥
।। श्रीगणेशाय नमः ।। श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ।।
वेदधर्मामुनींचा सच्छिष्य श्रीदीपक, एके दिवशी त्यांना असे विचारता झाला की, "श्रीगुरुजी ! मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ चरित्र वर्णन करतात, असे श्रीदत्तात्रेय नाव असलेले हे कोण देव आहेत?" ॥ १ ॥ शिष्याचा प्रश्न ऐकून श्रीवेदधर्माऋषी म्हणाले की, "हे दीपका ! या भूतलावर तू मोठा धन्य आहेस, कृतकृत्य आहेस व तसाच अत्यंत भाग्यवानही आहेस; कारण तुला श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम बुद्धी उत्पन्न झाली आहे. ॥ २ ॥ योगीश्वर श्रीदत्तप्रभूचे श्रेष्ठ व पापनाशक असे माहात्म्य तुला सांगतो. ते श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे. ॥ ३ ॥ कलियुग प्राप्त झालेले जाणून श्रीशौनकादिमहर्षीनी स्वर्गलोक मिळविण्याकरिता एक सहस्रसंवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरू केला. ॥ ४ ॥ एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी श्रीअग्निनारायणाला हविर्भाग देऊन स्वस्थ बसले असता, मान्य अशा पुराणज्ञ श्रीसूतांना त्यांनी आदराने असा प्रश्न केला. ॥ ५ ॥
ऋषय ऊचुः ।।
सूत सूत महाबुद्धे सर्वशास्त्रविशारद ।
वासुदेवस्य माहात्म्यं दत्तदेवस्वरूपिणः ॥ ६ ॥
परमानन्दजननं सर्वसम्पत्प्रदं नृणाम् ।
सदानन्दस्य नो ब्रूहि योगाख्यानानि सर्वतः ॥ ७ ॥
ऐश्वर्यमतुलं प्रापुस्तद्भक्ता इति शुश्रुम ॥ ८ ॥
सूत उवाच ।।
शृण्वन्तु मुनयः सर्वे वेदवेदाङ्गपारगाः ।
भवतां परितोषाय दत्तदेवप्रसादतः ॥
माहात्म्यं श्रावयिष्यामि निबोधत यथाश्रुतम् ॥ ९ ॥
कुलाद्रिमृक्षं ब्रह्मज्ञवरीयांश्चविधीरितः ।
पत्नीयुतोऽत्रिः पुत्रार्थ त्र्यधीशोपास्तये ययौ ॥ १० ॥
ऋषी असे म्हणाले की, "हे महाबुद्धिमान् व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सूता ! सच्चिदानंदरूप श्रीदत्तदेवस्वरूपी वासुदेवाचे, मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे माहात्म्य आम्हाला सांग व त्या प्रभूची सर्व बाजूने योगप्रभाव व्यक्त करणारी आख्यानेही सांग. ॥ ६-७ ॥ त्याच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे." ॥ ८ ॥ श्रीसूत त्यांना असे म्हणाले की, “हे वेदवेदांगनिष्णात ऋषीहो ! आपण सर्व सावधानतेने श्रवण करा. श्रीदत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूचे माहात्म्य, तुमच्या संतोषाकरिता मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही एकचित्ताने ऐका. ॥ ९ ॥ ब्रह्मज्ञवरीयान् अशी पदवी असणारे म्हणजे सहाव्या ज्ञानभूमिकेवर आरूढ झालेले श्रीअत्रिमहर्षी श्रीब्रह्मदेवांच्या प्रेरणेने, पुत्रप्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करावी म्हणून श्रीअनसूया या आपल्या पत्नीसह ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. ॥ १० ॥
तार्थ्यासनस्थोऽब्दशतं संयतात्माऽनिलाशनः ।
निर्द्वन्द्वः सुतरां दध्यावेकं तादृक्प्रजाप्तये ॥ ११ ॥
प्रापुरत्रिं कविष्ण्वीशाः स्वस्वचिह्नान्वितास्ततः ।
तपसा तस्य सन्तुष्टा वरदानोत्कमानसाः ॥ १२ ॥
ऊचुस्त ऋषे सत्सङ्कल्प न तेऽसत् ।
हृद्यं हि य एको ध्यातः स इतः कः ॥ १३ ॥
मादृक्सुतलब्ध्यै वृत्तश्रमसिद्ध्यै ।
दत्तोऽद्य मयाऽऽत्माऽयं ते सकलात्मा ॥ १४ ॥
एवं दत्वा वरं सद्यो देवा अन्तर्हितास्त्रयः ।
अथावतरदग्रेऽत्रेर्दत्तात्रेयश्चतुर्भुजः ॥ १५ ॥
चित्त ताब्यात ठेवून व केवळ वायूचा आहार करून तप करणाऱ्या द्वंद्वातीत श्रीअत्रिमुनींनी, श्रीगरुडासनावर राहून त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान, तसा पुत्र व्हावा म्हणून शंभर वर्षे केले. ॥ ११ ॥ अशी तपश्चर्या झाल्यावर, त्या तपाने संतुष्ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे श्रीब्रह्मा, श्रीविष्णू व श्रीमहेश्वर हे तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून श्रीअत्रिऋषीच्या आश्रमात प्राप्त झाले. ॥ १२ ॥ आणि असे म्हणाले की, "हे ऋषे! तू सत्यसंकल्प आहेस व तुझे मनीषित असत्य होणार नाही. ज्या एक तत्त्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस, ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे ? ॥ १३ ॥ माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस, याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता, मी सर्वस्वरूप असा माझा आत्माच तुला दिला आहे." ॥ १४ ॥ याप्रमाणे तीनही देवांनी श्रीअत्रिमुनींना वर देऊन ते तत्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्रीदत्तात्रेय श्रीअत्रिऋषींसमोर प्रकट झाले. ॥ १५ ॥
आप्तकामोऽपि भगवान् श्रीदत्तो योगमायया ।
दर्शयन् भक्तवशतां सन्तोष्य पितरौ स्थितः ॥ १६ ॥
अथ कश्चिद्विजवरः सर्वसंस्कारसंस्कृतः ।
अधीतवेदवेदाङ्गश्चरिताश्रमसत्क्रियः ॥ १७ ॥
चतुःसाधनसम्पन्नो दैवीसम्पत्समन्वितः ।
एवं सन्नपि नो शान्तिं प्राप्तोनानाश्श्रुतभ्रमात् ॥ १८ ॥
"गुरूक्तार्चाकल्पनया हृत्स्थैर्याद्बोध उद्भवेत्" ।
इत्यौपनिषदं दत्तं ध्यात्वा सम्पूज्य यत्नतः ॥ १९ ॥
तिष्ठन्तं खिन्नहृदयं विषीदन्तं शुचान्वितम् ।
त्रातुमाविरभूत् श्रीमान् दत्तात्रेयो दिगम्बरः ॥ २० ॥
नित्यतृप्त असे भगवान् श्रीदत्तप्रभू, आपली भक्ताधीनता दाखविण्याकरिता, मातापितरांना संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात राहिले. ॥ १६ ॥ नंतर कोणे एके काळी, एक ब्राह्मण, गर्भादानादि सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा, वेदवेदांगांचे अध्ययन करून आश्रमधर्माचे अनुष्ठानही ज्याने केले आहे असा, एके ठिकाणी राहात होता. ॥ १७ ॥ विवेकवैराग्यादिसाधनचतुष्टयसंपन्न व अभय, सत्त्वशुद्धी इत्यादि श्रीमद्भगवद्गीतोक्त दैवी संपत्तीने युक्त असूनही, अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे तो ब्राह्मण चित्तशांती मिळवू शकला नाही. ॥ १८ ॥ श्रीसद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होऊन तत्त्वबोध उत्पन्न होतो म्हणून उपनिषत्प्रतिपाद्य श्रीदत्तांचे ध्यान-पूजन प्रयत्नपूर्वक करूनही, दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या व विषाद्, शोक यांनी युक्त असणाऱ्या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता, योगश्रीमान् दिगंबर श्रीदत्तप्रभू त्याच्यासमोर प्रगट झाले. ॥ १९-२० ॥
मनोहरे मार्गशीर्षे शुक्लपक्षे गुरोर्दिने ।
प्रदोषे पूर्णिमायां भे मृशशीर्षाभिधे शुभे ॥ २१ ॥
प्राह विप्र किमर्थं त्वं दुर्मना इव लक्ष्यसे ।
वद सर्व ममाग्रे त्वं दौर्मनस्यस्य कारणम् ॥ २२ ॥
तं प्रत्युवाच तद्भक्तियन्त्रितो नतकन्धरः ।
विमुक्तो मुच्यतेऽनर्थादिति श्रुत्वा तदीहया ।
प्रवृत्तस्य ममाज्ञस्य भ्रमदोऽभूत्श्रुतार्णवः ॥ २३ ॥
एतेषां कतमः श्रेयान् शिवः पन्था भयोझ्झितः ।
सुगमो मेऽद्य कृपया सम्प्रदर्शय सद्गुरो ॥ २४ ॥
श्रीदत्त उवाच ।।
समीचीनः कृतोऽयं हि प्रश्नोऽतोऽवहितः शृणु ।
श्रुत्या युक्तत्यानुभूत्या च यत्सत्यं तद् ब्रवीमि ते ॥ २५ ॥
मनोहर मार्गशीर्ष मास, शुक्लपक्ष पौर्णिमा तिथी, मृग नक्षत्र, गुरुवार अशा समयी प्रदोषकाळी भगवान् श्रीदत्तात्रेय प्रगट झाले. ॥ २१ ॥ आणि त्या ब्राह्मणास असे म्हणाले की, "हे विप्रा ! तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर सांग." ॥ २२ ॥ त्या वेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन भगवान् श्रीदत्तात्रेयांना नमस्कार करून तो ब्राह्मण असे म्हणाला की, "ज्ञानवान् पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून, त्या इच्छेने, मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले; परंतु माझा भ्रम गेला नाही. ॥ २३ ॥ तेव्हा यांपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कोणता कल्याणकारक, कोणता निर्भय व कोणता मार्ग सुगम आहे, हे सद्गुरो ! तो कृपा करून मला सांगा." ॥ २४ ॥ श्रीदत्त असे म्हणाले की, "तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे. म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य ते तुला सांगतो. ॥ २५ ॥
ईश्वराराधनधिया स्वधर्माचरणात् सताम् ।
ईशप्रसादस्तद्रूपः सुलभश्चात्र सद्गुरुः ॥ २६ ॥
सद्गुरोः सम्प्रसादेऽस्य प्रतिबन्धक्षयस्तथा ।
दुर्भावनातिरस्ताराद्विज्ञानं मुक्तिदं क्षणात् ॥ २७ ॥
सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये ।
सत्यस्य सत्यमुत सत्यनेत्रं सत्यात्मकं मां खलु विद्धि सत्यम् ॥ २८ ॥
द्विपैकदेशमालम्ब्य यथान्धा द्विपवेदिनः ।
अन्योन्यं कलहायन्ते शास्त्रौघोऽयं तथाल्पदृक् ॥ २९ ॥
विज्ञाय तत्त्वं भवता मदुक्तेर्बुध्द्धा सदैवोपनिषन्मतं सत् ।
स्थेयं तदालोचन एव तेन मुक्तिः कृतार्थत्वमिहैव तेऽस्तु ॥ ३० ॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तव्रताख्याने प्रथमोऽध्यायः ।। १ ।। श्रीगुरुदेवदत्त ।।
मी ही ईश्वराची आराधनाच करीत आहे, अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे अनुष्ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वराचा प्रसाद होतो. म्हणजे तद्रूप श्रीसद्गुरू सुलभ होतात. ॥ २६ ॥ श्रीसद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाला असता, जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा नाश होतो तसेच दुष्ट भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. ॥ २७ ॥ सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे, हे तू निश्चयपूर्वक जाण. ॥ २८ ॥ जसे एक एक अवयव चांचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे, हत्ती असाच आहे असे आपापसात भांडण करतात; तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रौघाविषयी होतो. ॥ २९ ॥ याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून, उपनिषदांना संमत असलेले सत्तत्त्व जाणून, त्याचे आलोचन करण्यातच तू मग्न असावेस. त्या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील" असा त्या ब्राह्मणास प्रभुश्रीदत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला. ॥ ३० ॥
॥ इति श्रीसत्यदत्तव्रताख्याने प्रथमोऽध्यायः ॥
॥ श्रीसत्यदत्त व्रतकथा ॥
अथ द्वितीयोऽध्यायः ।
श्रीदत्त ।। सूत उवाच ।।
इति दत्तोदितं ज्ञान श्रुत्वा सन्तुष्टमानसः ।
नमः श्रीसत्यदत्तायेत्युक्त्वा नत्वावदच्च तम् ॥ १ ॥
द्विज उवाच ।।
विराडादिस्थावरान्ता ईश्वरा बहवः श्रुताः ।
एतेषु कतमोऽच्र्योऽत्र मोक्षसिद्धिप्रदश्च कः ॥ २ ॥
श्रीदत्त उवाच ।।
मञ्चिदंशयुतास्ते तु फलदाः स्वाधिकारतः ।
किन्तु मद्भजनात्कामक्रोधाद्यन्तर्मलक्षतिः ॥ ३ ॥
मत्प्रसादात्ततश्चान्तस्तमोनाशस्ततोऽमृतम् ।
निर्गुणोपास्तितः सर्वान्कामानाप्त्वाऽमृतो भवेत् ॥ ४ ॥
तस्मात्त्यक्त्त्वाऽखिलान्धर्मान्मामेहि शरणं द्विज ।
मत्प्रसादाद्विशुद्धोऽतो मोक्ष्यसे शान्तिमृच्छसि ॥ ५ ॥
श्रीदत्त। श्रीसूत असे म्हणाले की, "याप्रमाणे भगवान् श्रीदत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झाले आहे असा तो ब्राह्मण श्रीसत्यदत्तास नमस्कार असो, असे बोलून व नमस्कार करून श्रीदत्तांना असे म्हणाला की, ॥ १ ॥[cite: 2] "विराटापासून अश्वत्थादि स्थावरांतापर्यंत ईश्वराची अनेक स्वरूपे शास्त्रामध्ये सांगितलेली दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा." ॥ २ ॥[cite: 2] श्रीदत्त त्याला असे म्हणाले की, "माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्वही आपापल्या अधिकारानुरूप फल देणारे आहेत; पण सर्वरूप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील कामक्रोधादि मलांचा नाश होतो. ॥ ३ ॥[cite: 2] आणि माझ्या प्रसादाने मूलकारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते. ॥ ४ ॥[cite: 2] म्हणून हे द्विजा ! तू सर्व धर्म सोडून मला शरण ये; म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. ॥ ५ ॥[cite: 2]
स्वस्त्यस्तु ते मदुक्तेस्त्वं सारमाधत्स्व शोधितम् ।
मद्भक्तेष्वपि योगोऽयं प्रकाश्यो यत्नतत्स्त्वया ॥ ६ ॥
इत्युक्त्वा भगवान् दत्तो लीलया द्राक् तिरोदधे ।
स द्विजः कृतकत्योऽभूत्तदुक्तत्यर्थविलोकनात् ॥ ७ ॥
सूत उवाच ।।
आजीवितं त्रयः सेव्या वेदान्तो गुरुरीश्वरः ।
पूर्वं ज्ञानाप्तये पश्चात्कृतघ्नत्वनिवृत्तये ॥ ८ ॥
महानुशासनं चेत्थं मनस्यानीय स द्विजः ।
व्रतं श्रीसत्यदत्तस्य चकार प्रेमनिर्भरः ॥ ९ ॥
तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर." ॥ ६ ॥[cite: 2] असे बोलून भगवान् श्रीदत्तात्रेय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निदिध्यासाने कृतकृत्य होता झाला. ॥ ७ ॥[cite: 2] सूत पुढे असे म्हणाले की, "हे ऋषीहो ! वेदान्तशास्त्र, गुरू व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे. ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर कृतघ्नपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. ॥ ८ ॥[cite: 2] अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण, प्रेमनिर्भर होऊन श्रीसत्यदत्ताचे व्रत करता झाला. ॥ ९ ॥[cite: 2]
पौर्णमास्यां च सङ्क्रान्तौ शुभे काले गुरोर्दिने ।
समुपोष्योक्तकाले वै समाहृतसमर्हणः ॥ १० ॥
सप्तावरणसंयुक्तं दत्तात्रेय मुनीश्वरं ।
कल्पोक्तेन विधानेन सत्यदत्तमपूजयत् ॥ ११ ॥
सितां गोधूमचूर्णं च घृतमेतत् त्रिकं समम् ।
समादाय सपादं च सम्यक् क्षीरे विपाचितम् ॥ १२ ॥
संस्कृतं चैलाद्राक्षाद्यैः स संयावं न्यवेदयत् ।
ब्राह्मणैर्बाधवैः सार्धं प्रसादं जगृहे ततः ॥ १३ ॥
एवं श्रीसत्यदत्तस्य व्रतं कुर्वन् द्विजोतमः ।
सद्भक्तत्योपास्तयोगीन्द्रस्त्यक्तसर्वेषणो वशी ॥ १४ ॥
दत्तोक्तज्ञानमाहात्म्यात्पुनरावृत्तिदुर्लभम् ।
जगामान्ते द्विजश्रेष्ठाः सहसा महसां निधिम् ॥ १५ ॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ।। २ ।। श्रीदत्त ।।
पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही शुभकाल अशा समयी उपोषण करून, गंधपुष्पादि सर्व पूजा साहित्य जमवून, कल्पोक्तविधीप्रमाणे सात आवरणदेवतांसहित मुनीश्वर श्रीदत्तात्रेयरूपी श्रीसत्यदत्ताचे पूजन करता झाला. ॥ १०-११ ॥[cite: 2] साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात, पण सव्वापट म्हणजे सव्वाशेर, सव्वापायली, सव्वा मण, सव्वा खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादि घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्रीसत्यदत्तप्रभूस समर्पण केला आणि ब्राह्मण व आप्तबांधव यांच्यासह त्याने तो प्रसाद ग्रहण केला. ॥ १२-१३ ॥[cite: 2] याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्रीदत्तात्रेयांची उपासना करीत राहून, त्या बलाने पुत्रेषणा, वित्तेषणा व लोकैषणा या सर्वही एषणा सोडून, इंद्रियविजयी होत्साता श्रीदत्तात्रेयांनी उपदिष्ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्तिविरहित अशा तेजोनिधी श्रीदत्तात्रेयांच्या सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला. ॥ १४-१५ ॥
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्यान द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
॥ श्रीसत्यदत्त व्रतकथा ॥
अथ तृतीयोऽध्यायः ।
श्रीदत्त ऋषय ऊचुः ।।
सूत सूत महाबुद्धे वद नो वदतां वर ।
माहात्म्यं सत्यदत्तस्य यतः शुश्रूषवो वयम् ॥ १ ॥
सूत उवाच ।।
कश्चिद्राजा सोमवंश्य आयुर्नाम महामतिः ।
सम्राट् दाता वशी धन्यः सोऽनपत्यत्वदुःखितः ॥ २ ॥
श्रीदत्तात्रेयमाहात्म्यं श्रुत्वा मुनिसमीरितम् ।
गुरुं शौनकमानम्य पुत्रार्थी शरणं ययौ ॥ ३ ॥
राजेन्द्र सत्यदत्तस्य व्रतं कुरु यथाविधि ।
तद्व्रतस्य प्रभावेण सुपुत्रं प्राप्स्यसि ध्रुवम् ॥ ४ ॥
श्रुत्वेत्थं स गुरोर्वाक्यं व्रतं चक्रे समाहितः ।
प्रसादं जगृहे भक्तत्या भार्याबन्धुजनैः सह ॥ ५ ॥
श्रीदत्त ।। श्रीशौनकादि ऋषी असे म्हणाले की, "श्रीसूतजी ! आपण अत्यंत बुद्धिमान् असून पौराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात; तरी श्रीसत्यदत्ताचे माहात्म्य आम्हाला आणखी सांगा. कारण ते श्रवण करण्याची इच्छा करणारे आम्ही आहोत." ॥ १ ॥[cite: 2] ते ऐकून श्रीसूत असे म्हणाले की, “चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान् दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट् राजा होता; पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखित होता. ॥ २ ॥[cite: 2] मुनींनी सांगितलेले श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वासाने, नम्रतापूर्वक तो श्रीशौनक गुरुजींना पुत्रप्राप्तीसाठी शरण जाता झाला. ॥ ३ ॥[cite: 2] तेव्हा त्यास श्रीशौनक असे म्हणाले की, “हे राजेंद्रा ! श्रीसत्यदत्तांचे व्रत यथाविधी कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल." ॥ ४ ॥[cite: 2] असे श्रीसद्गुरूंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन, यथाविधी श्रीसत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठ्या भक्तीने भार्या व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करिता झाला. ॥ ५ ॥[cite: 2]
अथास्य महिषी स्वप्ने महापुरुषलक्षणम् ।
मुक्ताफलं चार्पयन्तं क्षीरपूर्णेन कम्बुना ॥ ६ ॥
स्वात्मानमभिषिञ्चन्तं दृष्ट्वा पत्यै शशंस तत् ॥ ७ ॥
प्रातर्नृपोऽपि संशुद्धः स्वप्नं शौनकमब्रवीत् ।
शौनक उवाच ।।
अनसूयागर्भरत्न-दत्तात्रेयार्पितं फलम् ॥ ८ ॥
धर्मात्मा वैष्णवः पुत्रः श्रीसोमान्वयभूषणः ।
भविष्यतीति स्वप्नेन सूचितं नात्र संशयः ॥ ९ ॥
अत्रान्तरे तु हुण्डस्य तनया नन्दनं वनम् ।
वयस्याभिर्गता तत्र चारणानां परस्परम् ॥ १० ॥
भाषतां वचनादायोः पुत्रो हुण्डासुरान्तकः ।
भविष्यतीति सा श्रुत्वा गत्वा पित्रे शशंस तत् ॥ ११ ॥
नंतर त्याच्या राणीस, महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन त्याने आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला, असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजास कथन केले. ॥ ६-७ ॥[cite: 2] राजाही प्रातःकालीन स्नानदानादि क्रियांनी शुद्ध होऊन, ते स्वप्न श्रीशौनकामुनींस सांगता झाला. ते ऐकून श्रीशौनकमुनी असे म्हणाले की, "अनुसूयेच्या गर्भातील रत्न असणाऱ्या श्रीदत्तात्रेय प्रभूनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा श्रीविष्णुभक्त, उत्तम अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल, हे या स्वप्नाने सूचित केले आहे, याविषयी काहीच शंका नाही." ॥ ८-९ ॥[cite: 2] याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसह नंदनवनामध्ये गेली होती तेथे काही भाटस्तुतिपाठक लोक परस्परांमध्ये असे बोलत होते की, "हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे." असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तात्काळ नगरात परत येऊन तिने ते वृत्त आपला पिता जो हुंडासुर त्याला कथन केले. ॥ १०-११ ॥[cite: 2]
दुरात्मा दानवो दुष्टः श्रुत्वैवं चकितोऽभवत् ।
नूनं शत्रुर्ममैवैष हन्तव्यो मे प्रयत्नतः ॥ १२ ॥
इति निश्चत्येन्दुमत्यै स दुस्वप्नानदर्शयत् ।
श्रीदत्तरक्षितो गर्भो नैव ब्रभ्रंश भाग्यवान् ॥ १३ ॥
ततः सुशोभने काले तुङ्गस्थे ग्रहपञ्चके ।
असूर्यरगे महाभागमसूतेन्दुमती सुतम् ॥ १४ ॥
दृष्ट्वा तं सुभगं बालं ननन्देन्दुमुखी सती ।
आयूराजापि तं श्रुत्वा पुत्रोद्भवमहोत्सवम् ॥ १५ ॥
जातकर्माऽकरत्प्रेम्णा ददौ दानानि भूरिशः ।
काचिदत्रान्तरेऽरिष्टाद्धात्र्येका बहिरागता ॥ १६ ॥
दुरात्मा दुष्ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखरच हा माझा शत्रू आहे. याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे. ॥ १२ ॥[cite: 2] असा निश्चय करून तो राक्षस, इंदुमती राणीस दुष्ट स्वप्ने दाखविता झाला. तथापि श्रीदत्तांनी रक्षण केलेला तो इंदुमतीचा भाग्यवान् गर्भ नाश पावला नाही. ॥ १३ ॥[cite: 2] इतकेच नव्हे; तर दिवसेंदिवस तो वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर, शुभ काली, रवी, गुरू, शुक्र, बुध व चंद्र हे पांचही ग्रह उच्चस्थानी असून अस्तंगत नसताना, महाभाग्यवान् अशा पुत्रास इंदुमती प्रसविती झाली. ॥ १४ ॥[cite: 2] त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित झाली. राजा श्रीआयूही पुत्रजन्माचा महोत्सव श्रवण करून, प्रेमाने पुत्राचा जातकर्मसंस्कार करता झाला व अनेक प्रकारची दाने देता झाला. इतक्यात कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली. ॥ १५-१६ ॥[cite: 2]
हुण्डासुरोऽपि मायावी तस्या अङ्गं प्रविश्य सः ।
नेतुकामो जजापेष्टां लघुप्रस्वापिनीं विधेः ॥ १७ ॥
तत्र सुप्तेषु सर्वेषु देव्या संमोहितेष्वथ ।
प्रादुर्भूय स्वरूपेण दैत्यो बालं जहार सः ॥ १८ ॥
अपहृत्याथ तं बालं काञ्चनाख्यं पुरं स्वकम् ।
गत्वा प्रियां समाहूय तस्यै दत्वाऽसुरोऽब्रवीत् ॥ १९ ॥
प्रिये समक्षमेव त्वं घातयित्वार्भमप्यमुम् ।
तन्मांसं प्रातराशाय सास्त्रं मे देहि पाचितम् ॥ २० ॥
तथेत्युक्त्वाऽसुरस्त्री सा बालमादाय निर्दयम् ।
प्राहैकलाख्यां सैरन्ध्रीं हत्वैनमविचारतः ॥ २१ ॥
पक्त्वोत्तमं प्रदेहि त्वं प्रियभोजनहेतवे ।
इत्युक्त्वाऽदाच्छिशुं सापि सूदहस्ते तथा ददौ ॥ २२ ॥
मायावी हुंडासुर पण त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश करता झाला आणि बालकाला तेथून नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी या हेतूने मंत्र विद्येचा जप केला. ॥ १७ ॥[cite: 2] त्यामुळे राणीसह सर्व मोहित होऊन झोपले असता, हुंडासुर दैत्य आपल्या खऱ्या रूपाने प्रकट होऊन त्या बालकाचे अपहरण करिता झाला. ॥ १८ ॥[cite: 2] त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला बोलाविले व तिच्या स्वाधीन ते बालक करून दैत्य असे म्हणाला की, ॥ १९ ॥[cite: 2] “हे प्रिये ! तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारून व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरिता मला दे." ॥ २० ॥[cite: 2] "बरे ", असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणाने अशी आज्ञा केली की, "कोणताही विचार न करता या बालकाला मारून व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यासाठी दे." असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्य स्त्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारून शिजविण्यासाठी आचाऱ्याच्या हाती दिले. ॥ २१-२२ ॥[cite: 2]
विश्वासेनैव हुण्डस्य प्रिया दत्वार्भकं स्वयम् ।
जाता कार्यान्तरासक्ता सैरन्ध्येकात्र संस्थिता ॥ २३ ॥
दिव्यं सद्योजातमपि दृष्ट्वा बालं स निर्दयः ।
चिच्छेद सुशितास्त्रेण तथापि स न विव्यथे ॥ २४ ॥
श्रीदत्तचक्रगुप्तत्वाच्छस्त्रं भग्नं स नो हतः ।
भाविबालसुदैवेन शान्ता क्रूरापि सैकला ॥ २५ ॥
हुंडासुराची स्त्री, विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसऱ्या कामाकरिता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली. ॥ २३ ॥[cite: 2] नंतर त्या निर्दय आचाऱ्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरिता त्याच्यावर शस्त्रप्रहार केला ! पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. ॥ २४ ॥[cite: 2] उलट श्रीदत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचाऱ्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षितच राहिले. ते पाहून या बालकाच्या सुदैवाने, ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली. ॥ २५ ॥[cite: 2]
सूदं प्राह त्वया बालो न वध्योऽयं महामते ।
तथेत्युक्त्वा कृपाविष्टौ तदैवादाय तं द्रुतम् ॥ २६ ॥
द्वाराद्वहिनिधायर्षेर्वसिष्ठस्थागतौ पुनः ।
मृगशावं निहत्यैकं पक्त्वा सूदः सुसंस्कृतम् ॥ २७ ॥
तन्मांसं दैत्यराजाय धूर्तो विश्वासयन् ददौ ।
तदाऽसुरो हृष्टतरो भूत्वा मूढस्तदामिषम् ॥ २८ ॥
भुक्त्वात्मानं कुधीर्मेने कृतकृत्यं हतान्तकम् ।
ततः प्रभाते विमले वसिष्ठो ज्ञानिनां वरः ॥ २९ ॥
बहिरेत्यार्भकं द्वारि ददर्श मुनिवृन्दयुक् ।
दृष्ट्वा विस्मयमापन्न उवाचारुन्धतीपतिः ॥ ३० ॥
आणि ती त्या आचाऱ्यास असे म्हणाली की, "हे बुद्धिमान् पाचका ! तू या बालकाला मारू नकोस." त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे त्या बालकासह नगराबाहेर गेले आणि श्रीवसिष्ठऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचाऱ्याने एका मृग शिशूला मारून ते मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासुर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला. त्यानंतर प्रभातकाळी, ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे श्रीवसिष्ठऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले. ॥ २६-३० ॥[cite: 2]
मुनयः पश्यतात्रेष बालः कस्यास्ति सुन्दरः ।
रात्रौ केन समानीय स्थापितस्तन्न विद्महे ॥ ३१ ॥
मुनयस्तं शिशुं दृष्ट्वा विस्मिता अपि तेऽभवन् ।
वसिष्ठस्तु तदा ध्यात्वा योगी प्राह त्रिकालवित् ॥ ३२ ॥
आयोस्तु सोमवंश्यस्य दत्तसेवाफलोद्भवः ।
श्रीदत्तगुप्तः पुत्रोऽयमायुष्मान् राजलक्षणः ॥ ३३ ॥
हुण्डेन स्वान्तकं मत्वा हृतो दैवादिहागतः ।
मैत्रावरुणिरित्युक्त्वा ज्ञानीशोऽपि विमोहितः ॥ ३४ ॥
कराभ्यां दययादाय स्वाश्रमं तमनीनयत् ।
वसिष्ठ आह श्रीदत्तप्रसादादमरान्नरान् ॥ ३५ ॥
शीघ्रं विपद उद्धृत्य सम्राड् जिष्णुर्भविष्यति ।
इति ब्रुवति मौनीशे पुष्पाणि ववृषुः सुराः ॥ ३६ ॥
श्रीवसिष्ठमुनी असे म्हणतात की, "ऋषीहो ! हे कोणाचे सुंदर बालक, रात्री येथे कोणी आणून ठेवले ते समजत नाही." ॥ ३१ ॥[cite: 2] ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ श्रीवसिष्ठऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले की, ॥ ३२ ॥[cite: 2] "हा सोमवंशातील आयूराजापासून श्रीदत्तसेवेचे फळ म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्रीदत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. ॥ ३३ ॥[cite: 2] हुंडासुराने हा आपला नाश करणारा आहे असे जाणून सूतिकागृहातून याचा अपहार केला. पण दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे." याप्रमाणे बोलून महान् तत्त्वज्ञानी श्रीवसिष्ठऋषीही त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित झाले ॥ ३४ ॥[cite: 2] आणि मोठ्या दयेने दोन्ही हातांनी त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले. आणि असे म्हणाले की, "श्रीदत्तप्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करून विजयी असा हा सम्राट राजा होईल." या प्रमाणे श्रीवसिष्ठऋषी बोलत असता देव पुष्पवृष्टी करते झाले. ॥ ३५-३६ ॥[cite: 2]
ननृतुश्चाप्सरोवर्गा गन्धर्वाः सुस्वरं जगुः ।
ऋषयोऽपि तदा हृष्टाः कुमारायाशिषो ददुः ॥ ३७ ॥
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः ।
नामकर्माऽथ विधिवद्वसिष्ठस्तस्य चाकरोत् ॥ ३८ ॥
न क्वापि बालभावैस्ते दूषितं यन्नराधिप ।
तस्मान्नहुषनाम्ने ते स्वस्त्यस्वमरपूजित ॥ ३९ ॥
अरुन्धती सती सापि बालमौरसवत्सदा ।
ररक्ष दैवनाथं तं वात्सल्याल्लालनादिना ॥ ४० ॥
अप्सरा नृत्य करत्या झाल्या व गंधर्व सुस्वर गायन करिते झाले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले. ॥ ३७ ॥[cite: 2] "हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न होवो" असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला. नंतर श्रीवसिष्ठऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. ॥ ३८ ॥[cite: 2] "बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण दूषित झाले नाही त्याअर्थी, हे देववंदिता ! तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील तुझे कल्याण असो." ॥ ३९ ॥[cite: 2] महासती श्रीअरुंधतीही वात्सल्यामुळे त्याचे लालनपालन करून, औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करती झाली. ॥ ४० ॥[cite: 2]
प्राप्तेऽथैकादशे वर्षे यथाविध्युपनीय तम् ।
वेदमग्राहयत्साङ्गं शास्त्राणि च यथार्थतः ॥ ४१ ॥
सरहस्यं धनुर्वेदं सविधानं विशेषतः ।
ज्ञानशास्त्रं राजनीतिं सेतिहासपुराणकम् ॥ ४२ ॥
बहुशोऽपि विनीतात्मा शिष्यत्वेन यथाविधि ।
सिषेवे श्रीगुरुं भक्त्या मनोवाक्कायकर्मभिः ॥ ४३ ॥
इत्थं सर्वगुणापूर्णो नहुषो गतमत्सरः ।
श्रीवसिष्ठप्रसादेन सर्वा विद्यास्ततार सः ॥ ४४ ॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोऽध्यायः ।। ३ ।। श्रीदत्त ।।
श्रीनहुषाला अकरावे वर्ष लागले असता, क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करून सांगवेद व सार्थशास्त्र श्रीवसिष्ठऋषी त्याला शिकविते झाले. ॥ ४१ ॥[cite: 2] सरहस्य धनुर्वेद, विशेषतः सविधान अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे अध्ययन त्याच्याकडून करविते झाले. ॥ ४२ ॥[cite: 2] या प्रमाणे विद्याग्रहण करीत असताना यथाविधी शिष्यत्व स्वीकारून तो श्रीनहुष मन, वाणी, शरीरादिकांनी सद्गुरू श्रीवसिष्ठांऋषीचे सेवन भक्तिपूर्वक करिता झाला. ॥ ४३ ॥[cite: 2] या प्रमाणे निर्मत्सर व सर्वगुणांनी पूर्ण असा नहुष, श्रीवसिष्ठाऋषींच्या प्रसादाने सर्व विद्यापारंगत झाला. ॥ ४४ ॥[cite: 2]
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोध्यायः ॥ ३ ॥[cite: 2]
॥ श्रीसत्यदत्त व्रतकथा ॥
अथ चतुर्थोऽध्यायः ।
श्रीदत्त ।। सूत उवाच ।।
प्राकृतात्पाह्यघादित्थं सकृद्ये प्रार्थयन्त्यपि ।
तान् पात्यतो नित्ययुक्तभक्तोपेक्षा कथं हरेः ॥ १ ॥
नीते हुण्डासुरेणार्भे प्रातःकाल उपागते ।
प्रस्वापिन्यां गतायां च जनः सुप्तोत्थितोऽभवत् ॥ २ ॥
वीतनिद्रेन्दुमत्यर्भमपश्यन्ती समन्ततः ।
विललाप तदा तन्वी सा हाहाकारपूर्वकम् ॥ ३ ॥
केन मे सर्वलक्ष्माढ्यः सुतो देवसुतोपमः ।
दत्तो दत्तेन गुप्तश्च कथं कस्माद्धृतस्त्वितः ॥ ४ ॥
हा पुत्र वत्स हा बाल हा गुणाकर सुन्दर ।
क्वासीति विलपन्ती सा मूर्च्छिताभून्मृतोपमा ॥ ५ ॥
श्रीदत्त ।। श्रीसूत असे म्हणाले की, "आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर, अशी जे एकदाच प्रार्थना करतात, त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची, नित्य चिंतन करणाऱ्या भक्तांविषयी उपेक्षाबुद्धी कशी भासेल ? ॥ १ ॥[cite: 2] इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता, प्रातःकाल झाल्यावर, प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली सर्वांनी निद्रा दूर झाली व सर्व लोक निजून उठले. ॥ २ ॥[cite: 2] राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही, यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाःकारपूर्वक विलाप करती झाली. ॥ ३ ॥[cite: 2] "माझा सर्व लक्षणांनी युक्त, देवपुत्राप्रमाणे असणारा, श्रीदत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र येथून कसा बरे नेला व कशासाठी नेला ? ॥ ४ ॥[cite: 2] हाय हाय ! हे पुत्रा ! हे गुणनिधाना !! तू कोठे आहेस?" याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मृतवत् मूच्छित पडली. ॥ ५ ॥[cite: 2]
राजाप्यप्रियमाकर्ण्य प्राप्यारिष्टं ददर्श ताम् ।
भूत्वातिविव्हलो दीनो विलपन्निदमब्रवीत् ॥ ६ ॥
दत्तात्रेयप्रसादस्य श्रुतं मे फलमक्षयम् ।
लब्धोऽपि सगुणः पुत्रस्तत्र विघ्नः कथं त्वयम् ॥ ७ ॥
इह धर्मफलं नास्ति नास्ति वै तपसः फलम् ।
नास्ति दानफलं नष्टे सुपुत्रे निश्चिनोम्यदः ।
दीनवत्सल मां पाहि श्रीदत्तानन्यमातुरम् ॥ ८ ॥
अथ दत्तेरितः प्राप नारदो दिव्यदर्शनः ।
प्रत्युद्गम्याभ्यर्च्य नृपस्तस्मै दुःखं न्यवेदयत् ॥ ९ ॥
नारद उवाच ।।
किं नश्वरेण पुत्रेण गृहेणाङ्गेन वा तव ।
लोकः सुखोऽस्ति हृद्यात्मा दत्तोऽमुं शरणं व्रज ॥ १० ॥
श्रीआयू राजाही, ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सूतिकागृहामध्ये येऊन मूच्छित झालेल्या राणीला पाहता झाला. त्यामुळे अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करता झाला आणि असे म्हणाला की, "श्रीदत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय्य असते, असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान् असा पुत्रही झाला; पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले ते समजत नाही." ॥ ६-७ ॥[cite: 2] दुःखातिरेकाने मोहित होऊन श्रीआयूराजा पुन्हा असे म्हणाला की, "या लोकात धर्माचरणाचे फळ काहीच नाही. तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला ! श्रीदत्तप्रभो !! या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे." ॥ ८ ॥[cite: 2] यानंतर श्रीदत्तांनी प्रेरित असे दिव्यदर्शन श्रीनारदमुनी त्या ठिकाणी आले. श्रीहरिभक्त, श्रीनारद मुनी आलेले पाहून, श्रीआयुराजा त्यांना सामोरा गेला व यथाविधी पूजन करून त्यांना आपले दुःख निवेदन करता झाला. ॥ ९ ॥[cite: 2] ते ऐकून श्रीनारदमुनी असे म्हणाले की, "राजा ! विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार? तसेच गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार ? नित्य प्रकाशमान् आनंदरूप श्रीदत्तपरमात्मा हृदयातच आहेत. त्यांनाच तू शरण जा. ॥ १० ॥[cite: 2]
यं तु शोचसि हुण्डेन हन्तुं नीतोऽपि दैवतः ।
कस्यचिन्मुनिवर्यस्य गृहेऽस्ति स सुरक्षितः ॥ ११ ॥
विद्वान् हत्वाऽसुरं सार्द्धं पत्यागत्याशु शत्रुहा ।
भुक्त्वेह राज्यमैन्द्रं च पदं मर्योऽपि भोक्ष्यति ॥ १२ ॥
इत्युक्त्त्वाऽथ मुनौ याते भार्यांयै तच्छशंस सः ।
देवर्युक्तिः प्रिये सत्या वरः सत्योऽपि चेशितुः ॥ १३ ॥
प्रसादो नान्यथा तस्माच्छोकं जह्यङ्गशोषणम् ।
एवं मुनिप्रत्ययात्तौ स्मृत्वा माहात्म्यमीशितुः ॥ १४ ॥
श्रीसत्यदत्तमभ्यर्च्य सुखमासतुरन्वहम् ।
तद्व्रतस्य प्रभावेण प्रेरतो मुनिपुङ्गवः ।
वसिष्ठोऽप्येकदाहूय नहुषं तत्र तं जगौ ॥ १५ ॥
ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस, तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरिता उचलून नेला असताही, दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषर्षीच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. ॥ ११ ॥[cite: 2] धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल." ॥ १२ ॥[cite: 2] असे सांगून श्रीनारदमुनी निघून गेले असता, ते वृत्त राजाने राणीस कथन केले की, "हे प्रिये ! देवऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्रीदत्तप्रभूचा वरही सत्यच आहे. ॥ १३ ॥[cite: 2] श्रीदत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे." याप्रमाणे देवर्षी श्रीनारदमुनींवर विश्वास असल्यामुळे, श्रीदत्तांचे माहात्म्य स्मरण करून व श्रीदत्तांचे पूजन करून ते राजाराणी सुखाने राहते झाले. त्या व्रताच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ श्रीवसिष्ठऋषी, एके दिवशी असे श्रीनहुषाला बोलावून म्हणाले की, ॥ १४-१५ ॥[cite: 2]
आयोः सुतस्त्वं नहुष इन्दुमत्यात्मजो विधेः ।
चारणानां भाषणतस्त्वत्तो मृत्युभयार्दितः ॥ १६ ॥
हन्तुं कृतमतिर्दृष्टो हुण्डोऽरिष्ठादपाहरत् ।
सूदायादाच्च हन्तुं त्वां स तु दैवादिहानयत् ॥ १७ ॥
पालितोऽसि मया वत्स सोमवंशविभूषण ।
क्षत्रोऽसि त्वमतो हिंसान्निहन्तुं मृगयां चर ॥ १८ ॥
तत्रायुष्मन् महाबाहो धनुर्विद्याविशारद ।
दत्तात्रेयाभिगुप्तस्त्वं गत्वा हुण्डासुरं जहि ॥ १९ ॥
ब्राह्मणाः पितरो देवा दुरितात्पान्तु रोदसी ।
पूषा च मा प्रभुवतु दुःशंसः सर्वथा जय ॥ २० ॥
"हे नहुषा ! तू आयूराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने, तुलाच मारून टाकावे म्हणून हुंडासुराने सूतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरिता आचाऱ्याजवळ दिले; पण सुदैवाने त्या आचाऱ्यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेविले. ॥ १६-१७ ॥[cite: 2] हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा ! तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र पशुंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि हे आयुष्मन् महाबाहो ! धनुर्विद्यानिष्णात अशा नहुषा !! श्रीदत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ॥ १८-१९ ॥[cite: 2] ब्राह्मण, पितर, देव, द्यावापृथिवी व पूषा हे सर्व संकटांपासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासुर निष्प्रभ होवो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त होवो." ॥ २० ॥[cite: 2]
इति प्रस्थापयामास लब्धाशीः सोऽपि तं गुरुम् ।
भक्त्या प्रणम्य श्रीदत्तं संस्मृत्य नहुषोऽब्रवीत् ॥ २१ ॥
यो निषेकप्रभृत्यद्ययावत् स्नेहाद्ररक्ष माम् ।
स चात्रिनन्दनो युद्धे जयं दत्वाऽवतु प्रभुः ॥ २२ ॥
एकमुक्त्वा प्रतस्थैऽसौ हन्तुं हुण्डासुरं तदा ।
पुष्पाणि ववृषुर्देवा आशीर्वादान् मुनीश्वराः ॥ २३ ॥
अत्रान्तरे सहायार्थं शक्राज्ञप्तस्तु मातलिः ।
नहुषं प्राप्य देवेन्द्रप्रेरितोऽस्मीत्युवाच च ॥ २४ ॥
रथमास्थाय हर्यश्वं दिव्यं हुण्डासुरं जहि ।
तत्श्रुत्वा नहुषो हृष्टो रथं नत्वारुरोह तम् ॥ २५ ॥
असे सांगून श्रीसद्गुरूंनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा श्रीनहुष भक्तीने श्रीसद्गुरुजींना नमस्कार करून व श्रीदत्तांचे स्मरण करून असे म्हणाला की, ॥ २१ ॥[cite: 2] “जो गर्भाधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला तो श्रीअत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो." ॥ २२ ॥[cite: 2] याप्रमाणे बोलून तो श्रीनहुष, हुंडासुराला मारण्यासाठी गमन करिता झाला. त्या वेळी देव पुष्पवृष्टी करते झाले व ऋषी आशीर्वाद देते झाले. ॥ २३ ॥[cite: 2] त्या वेळी श्रीइंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी श्रीमातली, श्रीनहुषाजवळ रथासह येऊन असे म्हणाला की, “मला देवेंद्राने तुला साहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे. म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर." ते ऐकून श्रीनहुष आनंदित होऊन व नमस्कार करून रथामध्ये बसता झाला. ॥ २४-२५ ॥[cite: 2]
पायूक्तमन्त्रैः सन्नद्धो ययौ हन्तुं महासुरम् ।
तत्राथ तत्सहायार्थं प्रापुर्दैत्यारिसैनिकाः ॥ २६ ॥
सिद्धगुह्यकगन्धर्व-यक्षविद्याधरोरगैः ।
कृतं कलकलाशब्दं श्रुत्वा भीतोऽसुरोऽब्रवीत् ॥ २७ ॥
दूत गच्छ कुतः शब्दस्तज्ज्ञात्वैहि पुनर्वृतम् ।
गत्वा दूतोऽपि यत्नेन ज्ञात्वैत्याहायुनन्दनः ॥ २८ ॥
शूर इन्द्ररथारूढो नहुषोऽजेय आगतः ।
इत्याकर्ण्यामुरः क्रुद्धो भार्यां दासीं च बल्लवम् ॥ २९ ॥
हतो न वार्थो ब्रूतेति पप्रच्छ स पुनः पुनः ।
ते हतो भवता लीढः सत्यमित्यूचूरासुरः ॥ ३० ॥
वेदोक्तमंत्रांनी सन्नद्ध होऊन (चिलखत घालून) तो महिषासुराला मारण्यासाठी जाता झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या साहाय्यासाठी देवसैनिक प्राप्त झाले. ॥ २६ ॥[cite: 2] श्रीनहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून, भयभीत झालेला हुंडासुर असे म्हणाला की, ॥ २७ ॥[cite: 2] "हे दुता ! जा, हा मोठा कोलाहल शब्द कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये." दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास असे म्हणाला की, 'आयुराजाचा पुत्र नहुष, मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे." हे ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासुर, भार्या, दासी व आचारी यांना हाक मारून असे विचारता झाला की, "अरे ! तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा." तेव्हा ते असे म्हणाले की, "त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. ॥ २८-२९-३० ॥[cite: 2]
दैवं हि बलवन्मत्वा दैत्यान् प्राहोग्रशासनः ।
सर्वेर्योद्धंहि गन्तव्यं भीरून्हन्मि क्षणादिह ॥ ३१ ॥
इत्यादिश्यासुरान् योद्धं सन्नद्धोऽगात्स तैः सह ।
क्रुद्धो हुण्डः समभ्येत्य नहुषं प्राह भीमवाक् ॥ ३२ ॥
मा गर्ज गर्ज मर्योत्थ हुण्डोऽस्मीह प्रतापवान् ।
जीवन्नैष्यसि पश्चात्त्वं सहदेवैर्ममाग्रतः ॥ ३३ ॥
राजाह सोमवंशस्य चरितं क्वापि नेदृशम् ।
शूरोऽसि यदि युध्यस्व वावदूकतयात्र किम् ॥ ३४ ॥
मां हन्तुमुद्यतस्थापि तव प्राणहरोऽस्म्यहम् ।
दत्तात्रेयाभिगुप्तोऽस्मि को मूढो मां प्रधर्षयेत् ॥ ३५ ॥
खरोखर देव हेच प्रबल आहे असे मानून, ज्याची आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे, असा तो हुंडासुर दैत्यांना असे म्हणाला की, "तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिऊन राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन." ॥ ३१ ॥[cite: 2] याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करून तो हुंडासुर, चिलखत घालून दैत्य सेनेसह श्रीनहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासुर गर्जना करीत श्रीनहुषासमोर येऊन त्याला असे म्हणाला की, ॥ ३२ ॥[cite: 2] "अरे माणसाच्या पोरा ! उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासुर आहे. तू माझ्यापुढे युद्धाकरिता उभा राहशील; तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस." ॥ ३३ ॥[cite: 2] ते ऐकून श्रीनहुष असे म्हणाला की, "चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील; तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा ? ॥ ३४ ॥[cite: 2] प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस. पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान् श्रीदत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील?" ॥ ३५ ॥[cite: 2]
इत्युक्त्वा निष्ठुरं चापमुद्यम्याकर्णमाशुगान् ।
सन्धाय च ससैन्यौ तौ युयुधा ते परस्परम् ॥ ३६ ॥
न दिवा न निशा यत्र भ्राजते तुमुलेतराम् ।
हस्तिनो वाजिनो विद्धा मृता भग्ना रथा अपि ॥ ३७ ॥
असुराणां ववू रक्तस्रवन्त्यो मांसकर्दमाः ।
गुरुं प्रणम्य नहुषः स्मृत्वा चैवात्रिनन्दनम् ॥ ३८ ॥
ऐन्द्रीं शक्तिं मुमोचास्मै तया भिन्नो ममार सः ।
अथैत्य जयिनं सार्द्धं रम्भयाऽ शोकसुन्दरी ॥ ३९ ॥
प्राहास्मि धर्मपत्नी ते नहुषोपयमस्व माम् ।
स प्राहाग्रे वरिष्यामि गुरोर्मे यदि रोचते ॥ ४० ॥
असे कठोर बोलून, धनुष्य आकर्ण ओढून, त्यावर बाण लावून, सैन्यासह ते परस्पर युद्ध करते झाले. ॥ ३६ ॥[cite: 2] अहोरात्र ते तुमुल युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच हत्ती-घोडे घायाळ झाले. काही मृत झाले. रथही भग्न झाले. ॥ ३७ ॥[cite: 2] मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्रीसद्गुरुंजीना प्रणाम करून व अत्रिनंदन श्रीदत्तात्रेयांचे स्मरण करून श्रीनहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोकसुंदरी, त्या विजयी श्रीनहुषाकडे येऊन असे म्हणाली की, "हे नहुषा ! तुझी मी धर्मपत्नी आहे म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर." हे ऐकून श्रीनहूष असे म्हणाला की, "गुरुजींच्या अनुमतीने त्यांच्यासमोरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे जर तुला पटत असेल तर पाहा." ॥ ३८-३९-४० ॥[cite: 2]
तथेत्युक्त्वा रथे तस्य सा रम्भा चास्थिता मुदा ।
नहुषोऽभ्येत्य गुरवे नत्वा सर्वं न्यवेदयत् ॥ ४१ ॥
हृष्टो वसिष्ठ उद्वाहं सुलग्नेऽकारयत्तयोः
द्रष्टुं प्रस्थापयामास पितरौ नहुषं मुनिः ॥ ४२ ॥
नत्वा गुरुं रथारूढः प्रभयार्क इव स्त्रिया ।
पितरावेत्य तच्छोकं जहार परिसान्त्वयन् ॥ ४३ ॥
सरथं मातलिं रम्भां स्वर्गाय प्रेरयन्नतः ।
प्रभोर्वरं गुरोर्वाक्यं श्रुत्वायुश्चेन्दुमत्यपि ॥ ४४ ॥
रतिस्मरोपमौ दृष्ट्वा स्नुषापुत्रौ ननन्दतुः ।
पित्राभिषिक्तो विधिवत् पित्र्यं राज्यं शशास सः ॥ ४५ ॥
सम्राट् चैन्द्रं पदं भेजे चिरं तेनैव वर्मणा ।
वानप्रस्थविधानेन महिष्यायुः समं वनम् ॥ ४६ ॥
उषित्वाऽत्रिसुतं ध्यायन् लेभे सायुज्यमक्षयम् ।
श्रीसत्यदत्तमर्थार्थी भजन्नेवं क्रमान्नृपः ।
मुक्त एवं तन्महिमा कोऽपि भक्तो न नश्यति ॥ ४७ ॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वतीयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ।। ४८ ।। श्रीदत्त ।।
" बरे आहे "असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती व रंभा बसली." श्रीनहुषाने श्रीवसिष्ठऋषींकडे येऊन सर्व वृत्त कथन केले. ॥ ४१ ॥[cite: 2] ते ऐकून आनंदित झालेले श्रीवसिष्ठमहर्षी, सुलग्नसमयी अशोकसुंदरी व श्रीनहुष यांचा विवाह करते झाले आणि नंतर मातापितरांना भेटण्यासाठी श्रीनहुषाला पत्नीसह पाठविते झाले. ॥ ४२ ॥[cite: 2] श्रीवसिष्ठ ऋषर्षीना नमस्कार करून, प्रभेसह निघणाऱ्या सूर्याप्रमाणे, आपल्या भार्येसह रथारूढ झालेला श्रीनहुष मातापितरांच्याकडे आला आणि सांत्वनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला. ॥ ४३ ॥[cite: 2] श्रीदत्तात्रेयांचा वर व श्रीसद्गुरुवाक्य यांची आठवण होऊन, तसेच रती व मदनाप्रमाणे असणाऱ्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून श्रीआयुराजा आणि इंदुमती राणी आनंदित होते झाले. श्रीआयुराजाने नंतर त्या श्रीनहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला. त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण श्रीनहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. ॥ ४४ ॥[cite: 2] सम्राट् श्रीनहुष इहलोकी उत्तम सुख भोगून, त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. तसेच श्रीआयुराजाही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून महिषीसह वनामध्येच वास्तव्य करिता झाला आणि नित्य अत्रितनय श्रीदत्तप्रभूच्या ध्यानप्रभावाने अक्षय्य अशा सायुज्य मुक्तीप्रत प्राप्त झाला. ॥ ४५-४६ ॥[cite: 2] अर्थार्थी भक्त श्रीआयुराजाही श्रीदत्तात्रेयांची सेवा करून ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्रीदत्तप्रभूचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही, इतकेच नव्हे; तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त होतो. ॥ ४७ ॥[cite: 2]
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥[cite: 2]
॥ श्रीसत्यदत्त व्रतकथा ॥
अथ पञ्चमोऽध्यायः ।
श्रीदत्त ।। सूत उवाच ।।
नतावनात्तसुभगव्रतोऽयं परमेश्वरः ।
तत्प्रभावं मुनिश्रेष्ठाः पुनः शृणुत सादरम् ॥ १ ॥
त गोदावासी द्विजः कश्चिद्धरिशर्मा तदात्मजः ।
द्विदशाब्दो यस्य जन्या गुल्मोऽष्टाब्दः क्षयोऽभवत् ॥ २ ॥
त्र्यब्दो जलोदरे जीर्णज्वर एकाब्द आयनः ।
अतिसारः सकासश्च चातुर्मास्यो भगन्दरः ॥ ३ ॥
त्रिदोषेणापि संक्रान्तं प्रेक्ष्य मृत्यून्मुखं पतिम् ।
तद्भार्या षोडशाब्दाऽगाच्छरणं विष्णुदत्तमित् ॥ ४ ॥
सौभाग्यं देहि मे ब्रह्मन् भर्ता मे रोगपीडितः ।
अत्युत्कटाः प्रतीकारा दैवाजाता निरर्थकाः ॥ ५ ॥
श्रीदत्त ।। श्रीसूत असे म्हणाले की, "शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्रीदत्तात्रेय आहे. याकरिता हे मुनिश्रेष्ठ हो ! पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा. ॥ १ ॥[cite: 2] श्रीगोदातटी राहणारा श्रीहरिशर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, आठ वर्षाचा क्षय, तीन वर्षांचा जलोदर, एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच चार महिन्यांपासून भगंदरही झाला होता. ॥ २-३ ॥[cite: 2] शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून, अत्यंत दुःखी झालेली त्याची सोळा वर्षांची स्त्री, परम श्रीदत्तभक्त श्रीविष्णुदत्तांना शरण गेली ॥ ४ ॥[cite: 2] व असे त्यांना म्हणाली की, "हे ब्रह्मन् ! मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत आणि त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत." ॥ ५ ॥[cite: 2]
इत्यर्थितो दयालुः स साध्व्या तद्गृहमेत्य तम् ।
दृष्ट्वा कर्मविपाकं च पत्या व्रतमकारयत् ॥ ६ ॥
क्रमेणाशु लयं प्राप तत्तद्रोगः प्रतिव्रतम् ।
द्विजोऽथ तं हृदि स्पृष्ट्वा जजापोपनिषन्मनुम् ॥ ७ ॥
नीरुग्लेभे द्विजस्तेन भूतिमायुः प्रजा यशः ।
दिव्यां गतिं दत्तभक्तिमिहामुत्र च सद्गतिम् ॥ ८ ॥
एवं श्रीसत्यदत्तस्य व्रतं पापप्रणाशनम् ।
तुष्टिदं पुष्टिदं नृणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ।
श्रीदत्तानुग्रहेणैव कथितं च समासतः ॥ ९ ॥
वेदधर्मा उवाच ।।
एवं सूतमुखात्श्रुत्वा नैमिषेया महर्षयः ।
श्रद्धया सत्यदत्तस्य व्रतं चक्रुः सुसंहताः ॥ १० ॥
त्या साध्वी स्त्रीने अशा प्रकारे प्रार्थना केली असता, दयाळू श्रीविष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला पाहून व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्रीसत्यदत्तव्रत करविते झाले. ॥ ६ ॥[cite: 2] क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर श्रीविष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या हृदयाला स्पर्श करून उपनिषन्मंत्राचा जप केला. ॥ ७ ॥[cite: 2] त्यामुळे तो ब्राह्मण, रोगमुक्त होऊन, इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्रीदत्तभक्ती यांचा लाभ करून घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस प्राप्त झाला. ॥ ८ ॥[cite: 2] याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत, मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारे, पुष्टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे आहे. श्रीदत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे." ॥ ९ ॥[cite: 2] श्रीवेदधर्मा असे म्हणाले की, “हे दीपका ! असे श्रीसूतांच्या मुखातून श्रवण करून, नैमिष्यारण्यातील महर्षी, एकाग्रचित्त होत्साते श्रद्धेने श्रीसत्यदत्ताचे व्रत करते झाले. ॥ १० ॥[cite: 2]
सत्रधर्मेण ते वत्स कांक्षंतो दर्शनं विभोः ।
दध्युरेकाग्रमनसो दत्तदेवपदाम्बुजम् ॥ ११ ॥
अथ वायुः सुखस्पर्शः पुण्यगन्धवहो ववौ ।
तमनु ज्योतिषां राशिराविर्भूतः स्वमायया ॥ १२ ॥
तेजोमण्डलमध्यस्थमुद्यन्तमिव भास्करम् ।
श्रीसत्यदत्तं द्रष्टुं तमशक्ताश्चर्मचक्षुषा ॥ १३ ॥
निमील्याक्षीणि ते विप्राश्चिन्तयन्तो हरिं हृदि ।
प्रार्थयामासुरव्यग्राः कथं नो दर्शनं भवेत् ॥ १४ ॥
इति चिन्तयतां तेषां वागासीन्मेघनिस्वना ।
उन्मीलयत नेत्राणीत्यनन्तेनेरिता द्विजाः ॥ १५ ॥
हे वत्सा दीपका ! यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी, प्रभू श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे, एकाग्रचित्ताने श्रीदत्तदेवांच्या पदांबुजाचे ध्यान करते झाले. ॥ ११ ॥[cite: 2] नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्रीदत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले. ॥ १२ ॥[cite: 2] उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणाऱ्या श्रीसत्यदत्ताला, चर्मचक्षूनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. ॥ १३ ॥[cite: 2] नेत्र मिटून ते ब्राह्मण अव्यग्र होत्साते, हृदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करिते झाले. ॥ १४ ॥[cite: 2] आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असताना, मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली. ती अशी की, "हे ऋषीहो! नेत्र उघडा." अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत्स्वरूप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती करते झाले. ॥ १५ ॥[cite: 2]
ततो ददृशिरे सर्वे शुद्धचित्ताश्च तुष्टुवुः ।
ऋषय ऊचुः ।।
नूनं भवानृषिर्नैव न वर्णाश्रमलिङ्गभाक् ।
निर्मितं भवतैवेदं विश्वं स्वांशांशतोऽखिलम् ॥ १६ ॥
न जानन्ति भवन्मायामोहिता दिव्यमुत्तमम् ।
भवद्धामात एवैते श्रमन्त्यसुरभावगाः ॥ १७ ॥
कर्ता भर्तासि हर्ता त्वं प्रत्यक्षं तत्त्वमस्यपि ।
भो सर्वं खल्विदं ब्रह्म त्वमस्यात्मासि केवलम् ॥ १८ ॥
त्वदुदेति रमत्येतद्विश्वं त्वय्येव लीयते ।
अष्टमूर्तिभिराभिस्त्वमाभासीव जगन्मयः ॥ १९ ॥
निगूढतत्त्वं ते ज्ञातं यत्किञ्चिल्लोकदुर्ग्रहम् ।
चेष्टितं ते प्रसादोऽयं प्राक्पुण्यैरनुभूयते ॥ २० ॥
ऋषी असे म्हणाले की, "खरोखर आपण ऋषी नाही. तसेच वर्णाश्रमचिह्न धारण करणारेही नाही; तर आपण त्रिगुणातीत परब्रह्मस्वरूप आहात. आपणच स्वांशांशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले আসতে. ॥ १६ ॥[cite: 2] आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक, आपले दिव्य, उत्तम, सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात फार श्रमतात. ॥ १७ ॥[cite: 2] तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्व तूच आहेस. हे परमात्मन् ! हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरूप आहे आणि तू सर्वात्मा आहेस. ॥ १८ ॥[cite: 2] तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते व तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री ब्राह्मण या आठ रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस. ॥ १९ ॥[cite: 2] तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप, सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे." ॥ २० ॥[cite: 2]
वेदधर्मा उवाच ।
एवं स्तुतस्तदा तुष्टो विश्वं स्वस्मिन्नदर्शयत् ।
उवाच च मुनीन् देवो मेघगम्भीरया गिरा ॥ २१ ॥
जानीतमागतं विप्राः प्रसादा भवत्स्विह ।
तपसा ब्रह्मचर्येण यमेन नियमेन च ॥ २२ ॥
यज्ञादिना च बहुभिर्जन्मभिस्तोषितो ह्यहम् ।
सत्यदत्तव्रतेनातो वरं वृणुत माचिरम् ॥ २३ ॥
ऋषय ऊचुः ।।
ज्ञापयास्मान् महादेव स्वभक्तान् कुरु निवृतान् ।
येन त्वमस्यात्मसाक्षी किं ब्रूमोऽनुग्रहं कुरु ॥ २४ ॥
श्रीसत्यदत्त उवाच ।।
यद्यूयं श्रद्धया स्तोत्रं कृतवन्तश्च मे प्रियम् ।
योगसिद्धिकरं नृणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥ २५ ॥
याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले परमात्मा श्रीदत्तात्रेय, त्या ऋषींना, सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना असे म्हणाले की, ॥ २१ ॥[cite: 2] "हे ब्राह्मणहो ! तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग इत्यादि साधनानुष्ठानामुळे, तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्ट तो वर मागून घ्या." ॥ २२-२३ ॥[cite: 2] त्यावेळी श्रीशौनकादि ऋषी असे म्हणाले की, "हे महादेवा ! तूच आम्हास स्वस्वरूपाचे ज्ञान करून देऊन, स्वभक्त व शांतचित्त कर; कारण तूच सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे? आपणच आमचा मनोरथ जाणून, सर्वतोपरि योग्य असा अनुग्रह करा." ॥ २४ ॥[cite: 2] श्रीसत्यदत्त असे म्हणाले की, "जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे. ॥ २५ ॥[cite: 2]
देहान्ते मत्परानन्दस्वरूपं परमं पदम् ।
मनोवाचामविषयं यास्यथात्रैव सुव्रताः ॥ २६ ॥
सन्निपाताक्षिरुङ्मेहकुष्ठश्लेष्मक्षयज्वरान् ।
वातपैत्तिकगुल्माद्यान् देशाद्युत्थान् हरेदिदम् ॥ २७ ॥
पुत्रं वन्ध्याऽभयं त्रस्तो निःस्वः स्वं रोग्यनामयम् ।
मुमुक्षुः सद्गतिं यद्यद्यस्येष्टं स लभेद् व्रतात् ॥ २८ ॥
वेदधर्मा उवाच ।।
इत्युत्क्त्वान्तर्दधे देवः सहसा महसां निधिः ।
स्वप्नदृष्ट इव स्वार्थो मुनयो विस्मयं ययुः ॥ २९ ॥
एवं प्रभावं श्रीदत्तं शरणागतवत्सलम् ।
स्मर्तृगामिनमीशानं सम्पूज्य हरमाप्नुहि ॥ ३० ॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तोपाख्याने पञ्चमोऽध्यायः ।। ५ ।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीदत्त ।।
हे उत्तम अनुष्ठानशील ब्राह्मण हो ! तुम्ही या जन्मीच देहांती, मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंदस्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. ॥ २६ ॥[cite: 2] तसेच हे सत्यदत्तव्रत, सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्ठ, श्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशात स्वचक्र, परचक्र, इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील. ॥ २७ ॥[cite: 2] या व्रताने, वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल. मुमुक्षु पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट असेल ते त्याला या श्रीसत्यदत्तव्रताच्या योगाने प्राप्त होईल." ॥ २८ ॥[cite: 2] श्रीवेदधर्मामुनी असे म्हणाले की, "दीपका! याप्रमाणे बोलून, स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्यराशीप्रमाणे तेजोराशी देवाधिदेव श्रीदत्तराज एकदम अंतर्धान पावले, हे अवलोकन करून श्रीशौनकादि ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. ॥ २९ ॥[cite: 2] वत्सा श्रीदीपका ! असा ज्या श्रीप्रभूचा प्रभाव आहे अशा शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणाऱ्या सर्वेश्वर श्रीदत्तात्रेयांचे पूजन, श्रद्धाभक्तीने करून तूही परमानंदाला प्राप्त हो." ॥ ३० ॥[cite: 2]
॥ इति श्रीदत्तोपाख्यान पंचमोध्यायः ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीदत्त ॥[cite: 2]