श्री हरितालिकेची आरती

॥ श्री हरितालिकेची आरती ॥

जय देवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीते । ज्ञानदीपकळिके ॥ धृ. ॥

हरिअर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ।
तेथें अपमान पावसी । यज्ञकुंड गुप्त होसी ॥ जय. ॥ १ ॥

रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ जय. ॥ २ ॥

तापपंचाग्निसाधनें । धुम्रपाने अधोवदनें ।
केली बहु उपोषणें । शंभु भ्रताराकारणें ॥ जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ।
मातें दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय. ॥ ५ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने