चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ।
पुण्याचा सोनार बोलवा ग,
आईला नथनी घडावा ग,
हळदी ग कुंकवाचं घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट,
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ।
ठाण्याचा कासार बोलवा ग,
आईला बांगड्या भरा ग,
लिंब ग नारळाचं घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट,
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ।
रायगडचा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूळ घडावा ग,
उदो ग कोंबड्याचं घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट,
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ।
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .