जयदेव जयदेव जय मुंजाराया | श्रीअश्वत्थाची ( मुंजोबाची ) आरती

॥ आरती श्रीअश्वत्थाची ॥

संरक्षिसी भक्ता देशी निजपद ॥
आणता अनुभव तुम्हां करिसी भवबंध ॥
अक्षय अकारिता खेळसी निश्छंद ॥
प्रकटित विकटित रुपे करिसी भवबंध ॥
जयदेव जयदेव जय मुंजाराया, श्री मुंजाराया,
अद्भुत तुझी करणी न कळे गुणराया,
जयदेव जयदेव ॥ १ ॥

वृक्षामाजी वृक्ष पिंपळ हा थोर ॥
तेथे रहिवाशाशी अक्षय दातार ॥
सगुण निर्गुण तुझे गुण हे अपार ॥
वर्णु काय माते मुढ मी पामर ॥
जयदेव जयदेव ॥ २ ॥

अखंड चर्चुनि शेंदुरे कांती सुज्वळ ॥
घुळघुळ वाजती पायी घागरिया घोळ
चरणी तत्पर होशी स्नेहाळ ॥
भक्ता संकट पडले, दासा संकट पडले,
त्याचा तू करिसी प्रतिपाळ ॥
जयदेव जयदेव ॥ ३ ॥

कुळधर्माचे दिवशी जे करितील उत्सव ॥
संतति संपत्ति देशी देखुनिया भाव ॥
कृष्णदास म्हणे पटला अनुभव,
जे कां निंदा करितील त्यांची रवरव ॥
जयदेव जयदेव ॥ ४ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने