उद्धरी गुरुराया | श्रीदत्त पंचपदी

॥ पद दत्तात्रेयाचे ॥

उद्धरी गुरुराया । अनसूया-तनया दत्तात्रेया ॥ धृ ॥

जो अनसूयेच्या भावाला भुलूनि तत्सुत झाला ।
दत्तात्रेया अशा नामाला मिरवी वंद्य सुराला ।
तो तू मुनिवर्या, निजपाया स्मरता वारिसी माया ॥ १ ॥

जो माहुरपुरी, शयन करी सह्याद्रीचे शिखरी ।
निवसे गंगेचे, स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी ।
स्मरता दर्शन दे, वारि भया, तो तू आगमगेया ॥ २ ॥

तो तू वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढवीसी ।
मरता प्रेतासी, जीवविसी, सत्वरदाना देसी ।
यास्तव वासुदेव, तव पाया धरि त्या तारी सदया ॥ ३ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने