गणाधिनाथा पवित्र गाथा (गणपती चे पद)

॥ गणपतीचे पद ॥

गणाधिनाथा पवित्र गाथा माथा तव पदि ठेवू ।
चतुर्थींचा उत्सव करुनि दुर्वांकुर तुज वाहू ॥ धृ ॥

सिंदूरचर्चित मस्तकी सिंदूर दनुजारी तू थोर ।
सर्व संकटे वारुनि विघ्ने स्मरती करिसी दूर ॥ १ ॥

विद्यारंभी उत्सवकाली जाता येता नाम ।
मंगलधाम स्मरता तुझे मोरया पुरविसी काम ॥ २ ॥

पाशांकुशरद वरदकरा तू अससी जगती हेतू ।
स्मरता भक्ता गती देसी तू तारक अमुचा तो तू ॥ ३ ॥

लड्डुक मोदक भक्षणकारक शक्तिविधारक एक ।
तो तू विनायक गजास्य तारक भाविकभयहारक ॥ ४ ॥

रक्तचंदन प्रसूनवसन प्रिय दूर्वांकूर पूज्य ।
साज्य खाद्याच्या नैवेद्या घेऊनि सुख दे प्राज्य ॥ ५ ॥

थोडे नवीन जरा जुने