सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता । सदगुरू आरती

सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।
कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥
न कळे ब्रह्मादिकां अंत अनंता ।
तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय करुणाकारा ।
आरती ओवाळू सद्गुरूमाहेरा ॥ धृ ॥

मायेविण माहेर विश्रांती ठाव ।
शब्दी अर्थी लाव बोलणे वाव ।
सद्गुरूच्या प्रसादे सुगम उपाव ।
रामी रामदास फळाला सद्भाव ॥ जय ॥ २ ॥

थोडे नवीन जरा जुने