उभे राहूनी सर्व आता आरती करूया ।
प्रेमभावे देवाला शरण जाऊया - २ ॥ धृ ॥
पंचारती लावूनी आता स्वरूप पाहूया ।
ब्रह्मानंदी लीन होऊनी आनंद भोगूया - २ ॥ १ ॥
उभे राहूनी सर्व आता आरती करूया ।
प्रेमभावे देवाला शरण जाऊया - २ ॥ धृ ॥
ऐसी विनंती करी आता सर्व जनासी ।
दीप लावुनी हरि उभा प्रभूच्या चरणासी - २ ॥ २ ॥
उभे राहूनी सर्व आता आरती करूया ।
प्रेमभावे देवाला शरण जाऊया - २ ॥ धृ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .