कर्पूर गौरा गौरी शंकरा, आरती करु तुजला ।
नामस्मरणे प्रसन्न होऊनी, पावसी भक्ताला ॥ धृ ॥
ढवळा नंदी वाहन शोभे, अर्धांगी गौरी ।
जटा मस्तकी वास करीतसे, गंगा सुंदरी ॥ १ ॥
कर्पूर गौरा...
त्रिशुल डमरु शोभत हाती, गळा रुंड माळा ।
उग्र विषाते पिऊनी रक्षसी, देवा दिक्पाला ॥ २ ॥
कर्पूर गौरा...
तृतीय नेत्री निघती क्रोधे, प्रलयाग्नी ज्वाळा ।
नमीती सुरवर तुजला ऐसे, शंकर तु भोळा ॥ ३ ॥
कर्पूर गौरा...
सदया सगुणा गौरी रमणा, मम संकट भारी ।
मोरेश्वर सुत वासुदेव हरी, स्मरतो अंतरी ॥ ४ ॥
कर्पूर गौरा...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .