कडकडिला स्तंभ गडगडिले गगन ।
अवनी होत आहे कंपायमान ।
तडतडली नक्षत्रे पडताती जाण ।
उग्ररूपे प्रकटे तो नृसिंहवदन ॥ १ ॥
जय देव जय देव जय नरहरिराया ।
आरती ओवाळू महाराजवर्या ॥ धृ ॥
एकवीस स्वर्गमाळा डळमळली कैसी ।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी ।
चंद्रसूर्य दोनी लोपती प्रकाशी ।
कैलासी शंकर दचके मानसी ॥ जय ॥ २ ॥
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळीत ।
तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारीत ।
अर्धांगी कमलजा शिरी छाया धरीत ।
माधवदासा स्वामी नरहरी शोभत ।
जय देव जय देव जय नरहरिराया ।
आरती ओवाळू महाराजवर्या ॥ ३ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .