आरती सत्यदेवा |
माझा प्राण विसावा ||
ओवाळू मनोभावे ।
शुद्ध कापूर लावा || धृ .।।
काशिक्षेत्र प्रगटूनी
सत्यनारायण ध्यानी ।
लाविलेजन सारे ।
फलसिद्धी पसरोनी ।।१ ।।
कपटी साधूवाणी ।
तुवा नेला उद्धरुनी ।
तसाच मौळीवाला |
तारीयेला कृपादानी ।।२ ।।
तत्काल फल तुझे ।
ख्याती असे जगीजागे |
तुकाराम सुत बोले ।
भजा सत्येश्वर माझे ।।३ ।।
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .