जय जय जय श्री सत्यनारायण देवा ।
ओवाळून आरती करतो तव सेवा || धृ ।।
पुजा करता भावे सुरम्य सुरस कथा ।
ऐकोनीया हरती भक्त्यांच्या चिंता ।।
प्रसाद भक्षण करुनि करता तव धावा ।
प्रसन्न होवुनी पुरवी इच्छीत तु देवा ।। १ ।।
अनन्य भावे पुजनी व्रत जे आचरती ।
भवभय वारुनी त्यांचे देसी सुख शांती ||
लाभ कृपेचा देवा भक्त जना व्हावा ।
संतती संपत्ती देवुनी ठाव पदी घ्यावा || २ ।।
न वर्णवेना महीमा ब्रम्हादीकदेवा ।
नेणते श्रमले चारी तुज कैसा घ्यावा ।।
स्वरुप तुझे सत्यं शिव सुंदर देवा ।
अल्पशी स्वानंदाची स्विकारी सेवा ।। ३ ।। जय देव .