श्री सत्यांबेची आरती

॥ श्रीसत्यांबेची आरती (१) ॥[cite: 3]

जय देवी जय देवी जय श्री सत्यांबे, शंकरवरदे जगदुद्धरणे जगदंबे ॥धृ.०॥[cite: 3]

शौनकऋषिपृच्छेने सूताने कथिला । कलिमलहारक तारक जो हो जगताला ॥
उपाय ऐसा, सोपा करण्या सकलांला । होवो फलदायी तो देशोध्दाराला ॥१॥ जय० ॥

देवांचा सेनानी षण्मुख रणकालीं । संकटि पडता धावुनि शशिमौली ॥
सत्यांबा व्रत करण्या सांगे त्यां कालीं । झाला विजय तयाचा प्रसन्न हो काली ॥२॥ जय० ॥

कौंडिण्य नावाचा ब्राह्मण कांचीचा । दारिद्रये बहु पिडिला विट ये जीवाचा ॥
मळ हरिला पळभारे तद्दारिद्रयाचा । सत्यांबा व्रतमहिमा दावियला साचा ॥३॥ जय० ॥

सौराष्ट्राधिप सूर्यकेतु नृपराया । परचक्रे ग्रासियतें लागे गुरुपाया ॥
गुरुरायें व्रतमहिमा कथिला त्या ठाया । परचक्रा त्वां हरिलें दाउनि बहु माया ॥४॥ जय० ॥

मालव देशी गुंड नांवाचा होता । कोणी शूद्र त्याचे पोटी सुत नव्हता ॥
व्रतमहिमा कळतां तव व्रत तें अचरितां । झाला सुपुत्र त्यातें तत्कुल उध्दरिता ॥५॥ जय० ॥

या व्रतविधिनें इच्छित फल भक्तां मिळते । व्रतदिनकर तेजानें अघतम ते पळतें ॥
द्रव्यार्थ्याला लक्ष्मी राज्यार्थ्या फल तें । राज्यहि, नरसिंहाचा सुत गातो फळ तें ॥६॥ जय० ॥
[cite: 3]

-----------

॥ आरती सत्यांबा देवीची (२) ॥[cite: 3]

जय जय सत्यांबे देवी ॥ करुणामूर्ति मां पाहि ॥धृ.०॥[cite: 3]

आदिशक्ति तू मुळमाया । अवतरसी जग ताराया ।
प्रसूति स्थिती विश्वप्रलया । विधि हरिहर वंदिती तवपाया ॥
(चाल) - सकल गुण मंडित कल्पलते । वंदिता चरण ॥
हरति बहु विघ्न कामनापूर्ण । महिमा असि दुनि नाहीं । भजा हो जन या नरदेही ॥१॥ जय जय० ॥

अपजय येता नृपतीला । गुरुपद कमलि लीन झाला ।
षडानन पुसे शंकराला । दयाघन तारि बालकाला ॥
(चाल) - वदे सत्यांबा व्रत महिमा । त्रिभुवनी श्रेष्ठ ॥
पूर्ण करी इष्ट । होय संतुष्ट । वारूनी कष्ट । सदा पाही । दुर्लभ मोक्षाते देई ॥२॥ जय जय० ॥

भूपति व्रतार्चने तरला । विजयी शंभुतनय झाला ।
प्रसादे शूद्रबंदी सुटला । व्रत महिमा जगी श्रुत झाला ॥
(चाल) - दरिद्री द्विज कौडिण्यातें । प्रगटुनी रूप ॥
केले सुखरूप । झाले तद्रूप । बुडविले निजानंद देही । दुर्लभ मोक्षाते देई ॥३॥ जय जय० ॥
[cite: 3]

-----------

॥ भगवती सत्यांबेचे ध्यान ॥[cite: 3]

नाभेरधस्तु नीलाभा उपरि श्यामलाकृतिः । अग्रे रक्तारविन्दाभा चतुर्भुजसमन्विता ॥
ग्रैवेयाङ्ङ्गदसंयुक्ता लसत्कांची कलापिनी ॥
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् ॥
ॐ अम्बे अम्बिके ० ॥
[cite: 3]

-----------

थोडे नवीन जरा जुने