जनन शांती आणि देवता
कशासाठी: बाळाचा जन्म ग्रहण, अमावास्या, विशिष्ट नक्षत्र किंवा अशुभ योगांवर झाल्यास त्याचे अरिष्ट बाळाला किंवा माता-पित्यांना लागू नये म्हणून संबंधित देवतांची शांती व हवन केले जाते.
कालसर्पयोग शांती देवता
देवता: राहु, काल, नवनाग, अष्टधात्री, सत्येशान
अमावास्या (दर्श) शांती देवता
देवता: पितृ, चंद्र, सूर्य
कृष्ण चतुर्दशी (१४) शांती देवता
देवता: रुद्र, अग्नी, वृषभ
क्षयतिथी शांती देवता
(प्रत्येक तिथीची विहीत देवता) (खाली/शेवटी तिथी देवता दिल्या आहेत)
माता-पिता-अपत्य समान नक्षत्र जनन
(जे नक्षत्र असेल त्याची देवता) (खाली/शेवटी नक्षत्र देवता दिल्या आहेत)
अश्विनी नक्षत्र शांती देवता
देवता: पूषा, अश्विनीकुमार, यम
पुष्य नक्षत्र शांती देवता (२,३ चरण)
देवता: आदिती, बृहस्पती, सर्प
आश्लेषा नक्षत्र शांती देवता
देवता: बृहस्पती, सर्प, पितृ
मघा नक्षत्र शांती देवता
देवता: सर्प, पितृ, भग
उत्तरा (फाल्गुनी) नक्षत्र शांती देवता
देवता: भग, अर्यमा, सूर्य
चित्रा नक्षत्र (पूर्वार्ध) शांती देवता
देवता: सूर्य, त्वष्टा, वायु
विशाखा नक्षत्र (४ था चरण) शांती देवता
देवता: वायु, इंद्राग्नी, मित्र
ज्येष्ठा नक्षत्र शांती देवता
देवता: मित्र, इंद्र, निर्ऋती
मूळ नक्षत्र शांती देवता
देवता: इंद्र, निर्ऋती, उदक
पूर्वाषाढा नक्षत्र (३ रा चरण) शांती देवता
देवता: निर्ऋती, उदक, विश्वेदेव
रेवती नक्षत्र (४ था चरण) शांती देवता
देवता: अहिर्बुध्न्य, पूषा, अश्विनीकुमार
वैधृती योग शांती देवता
देवता: रुद्र, सूर्य, सोम
व्यतीपात योग शांती देवता
देवता: सूर्य, अग्नी, रुद्र
भद्रा (विष्टी करण) शांती देवता
देवता: सूर्य, अग्नी, रुद्र, विष्णू, गणेश
ग्रहणकाळ शांती देवता
देवता: सूर्य, चंद्र, राहू
यमल (जुळे) शांती देवता
देवता: इंद्र, वरुण, अग्नी, सोम, मरुत, पवमान
सदंत जनन शांती देवता (जन्मतः दात)
देवता: सोम, अग्नी, वायू, विष्णू, धात्री
संवत / पायाळू जनन शांती देवता
देवता: विष्णू, रुद्र
गोमुख प्रसव शांती देवता
देवता: विष्णू, वरुण, यम
विषनाडी शांती देवता
देवता: रुद्र, अग्नी, मृत्यू, यम
गंडदोष जनन शांती देवता
देवता: मरुत
अभिलाषेदोष शांती देवता
देवता: ब्रह्मा, विष्णू, रुद्र, मरुत, चंद्र
त्रिकप्रसव शांती देवता (३ मुलीनंतर/मुलानंतर)
देवता: ब्रह्मा, विष्णू, रुद्र
चांडाळ योग शांती देवता
देवता: गुरू, राहू
पल्लीमरठ शांती देवता (पाल अंगावर पडल्यास)
देवता: रुद्र, महामृत्युंजय
विनायक शांती देवता
देवता: विनायक
नवग्रह शांती व जप अनुष्ठान
देवता: सूर्य
वास्तुशांती
देवता: वास्तु, ध्रुव, मृत्युंजय
उदक शांती
देवता: ब्रह्मा
कुंभ / अर्क विवाह
देवता: वरुण, विष्णू, अर्की
नक्षत्र देवता
कशासाठी: नक्षत्राच्या देवतेची पूजा व हवन केल्याने त्या नक्षत्राचे शुभ फळ मिळते व जीवनातील अडचणी दूर होतात.
१. अश्विनी: अश्विनीकुमार
२. भरणी: यम
३. कृतिका: अग्नि
४. रोहिणी: प्रजापती
५. मृग: सोम
६. आर्द्रा: रुद्र
७. पुनर्वसू: अदिती
८. पुष्य: bृहस्पती
९. आश्लेषा: सर्प
१०. मघा: पितृ
११. पूर्वा फाल्गुनी: भग
१२. उत्तरा फाल्गुनी: अर्यमा
१३. हस्त: सवितृ
१४. चित्रा: त्वष्टा
१५. स्वाती: वायु
१६. विशाखा: इंद्राग्नि
१७. अनुराधा: मित्र
१८. ज्येष्ठा: इंद्र
१९. मूळ: निर्ऋती
२०. पूर्वाषाढा: आप: (जल)
२१. उत्तराषाढा: विश्वेदेव
२२. श्रवण: विष्णू
२३. धनिष्ठा: वसू
२४. शततारका: वरुण
२५. पूर्वाभाद्रपदा: अजैकपाद
२६. उत्तराभाद्रपदा: अहिर्बुध्न्य
२७. रेवती: पूषा
तिथी देवता
कशासाठी: जन्म तिथीच्या देवतेची शांती केल्यास कार्यात यश मिळते आणि तिथी दोष नष्ट होतो.
प्रतिपदा: ब्रह्मा, अग्नि
द्वितीया: ब्रह्मा
तृतीया: विष्णू, पार्वती
चतुर्थी: गणपती, यम
पंचमी: नाग, चंद्र
षष्ठी: स्कंद
सप्तमी: सूर्य, इंद्र
अष्टमी: शिव, अष्टवसू
नवमी: नाग, दुर्गा
दशमी: यम
एकादशी: शिव, विश्वेदेव
द्वादशी: विष्णू, सूर्य
त्रयोदशी: काम
चतुर्दशी: शिव, कलि
पौर्णिमा: चंद्र, विश्वेदेव
अमावास्या: पितर
करण देवता
कशासाठी: करण हा तिथीचा अर्धा भाग असतो. भद्रा (विष्टी) सारख्या अशुभ करणावर जन्म झाल्यास या देवतांचे पूजन आवश्यक असते.
१. बव: इन्द्र देव
२. बालव: ब्रह्म देव
३. कौलव: सूर्य देव
४. तैतिल: सूर्य देव
५. गर: पृथ्वी देवी
६. वणिज: लक्ष्मी देवी
७. विष्टी: यम देव (अशुभ)
८. शकुनी: कलियुग देव
९. चतुष्पाद: रुद्र देव
१०. नाग: नाग देव
११. किंस्तुघ्न: पवन देव
वारानुसार अशुभ योग आणि देवता
कशासाठी: विशिष्ट वार आणि नक्षत्रांच्या संयोगातून कालदंड, मृत्यू, दग्ध आणि यमघंट योग तयार होतात. यात जन्माला आलेल्या बालकांसाठी शांतिविधी आवश्यक असतो.
वैधानिक इशारा / टीप: वरील सर्व माहिती पारंपरिक पंचांग आणि ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांवर आधारित आहे. ही केवळ अभ्यासक आणि पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींच्या संदर्भासाठी संकलित केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आमचा उद्देश नाही.
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .