तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥
मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया द्वारी आज मी आलो, देई चित्त मज घ्याया ॥ १ ॥
तू सकलांचा भाग्यविधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा, निमवी नैराश्या ॥ २ ॥
तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।
पामर मी स्वर उणे भासती, तुझी आरती गाया ॥ ३ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .