समर्थाचिया सेवका वक्र पाहे |
असा सर्व भूमंडळी कोण आहे |
जयाची लिला वर्णिति लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||30||
जय जय रघुवीर समर्थ.
रामदास स्वामींनच्या वाङ्गमया तील हा फार प्रसिद्ध श्लोक आहे.
*समर्थाचिया सेवका वक्र पाहे*
*असा सर्व भूमंडळी कोण आहे*
पण या श्लोका मध्ये एक लक्षात ठेवल पाहीजे की "समर्थाचिया सेवका" म्हणजे समर्थ रामदास स्वामीचे सेवक असा अर्थ घ्यायचा नाही.रामदास स्वामी हे प्रभु रामचंद्राला समर्थ म्हणत होते.तेव्हा या श्लोका मध्ये रामदास स्वामिनी जे प्रभु रामचंद्राचे जे सेवक आसतील त्यांचे कडे कोण वाकडया डोळ्यान पाहनार ?असा विषय केलेला आहे.मात्र दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे.की प्रभु रामचंद्राचे सेवक हे ही लक्षात ठेवल पाहीजे.आणि मुळात ज्याच्या कडे वाकडया डोळ्याने कुणी पाहु नये,त्याच कुणी अहित करु नये.आस ज्याला ज्याला वाटत त्यानि मुळात आधी सेवक झाल पाहिजेन.प्रभु रामचंद्रचि काहीतरी सेवा केलि पाहीजे. त्याच्या नंतर हया गोष्टी शक्य आहे. तेव्हा हा प्रभु रामचंद्र इतका दयाळु आहे की याच्या सेवका कडे कोण वाकडया डोळ्यान पहिल तर त्याला सहन होत नाही बर.म्हणजे असा.
*असा सर्व भूमंडळी कोण आहे*
शब्द वापरला समर्थानी वा रे वा.म्हणजे भारता पुरत नाही.फक्त चीन रशिया अफगानी स्थान नाही या अख्य विश्वात या भूमंडळा मध्ये कोणी नाही.की जो रामचंद्राच्या सेवका कडे वाकडया डोळ्यान पाहिल.आणि म्हणुन
*जयाची लिला वर्णिति लोक तिन्ही*
आरे स्वर्ग लोक,भूलोक,पातळ लोक, सप्त लोक असू दे.ते हया प्रभु रामचंद्राची लिला वर्णन करत आसतात.काय प्रचंड सामर्थ आहे.
या श्लोका च्या मागे एक फार छान कथा आहे बरका.
समर्थ रामदास स्वामींनचा एक शिष्य होता.त्याच नाव मधुकर आस होत.या मधुकर नावाच्या शिष्यानि अतिशय उत्तम तऱ्हेन प्रभु रामचंद्राची सेवा कार्य सेवक पण पतकारल होत. रामदास स्वामिनी सांगितली त्या प्रमाण तो उपासना ही करत होता.मठात राहून भिक्षा मागून या रामचंद्राच्या चरित्राचा सगळ्या उपसनेच्या रामनामाचा प्रसार करत होता.यथा शक्ति रामचंद्राचा सेवक म्हणुन कार्यरत होता.काही वेळा समर्थ आनेक गावातून भ्रमण करत त्या वेळेला हा मधुकर त्यांच्या बरोबर येत असे.
एका गावा मध्ये आले.नविनच गाव होत. काही ओळख पाळख नव्हती.एका मारुतीच्या मंदिरा मध्ये आपला बसतान ठेवल.मधुकराला सांगितल की बाबारे,आपली जी पध्दत आहे. दुपारच्या वेळेला भिक्षा मागून आणली आहिजे.
एक गोष्ट लक्षात ठेवा बर.
"भिक्षा" आणि "भिक" या शब्दा मध्ये फार मोठा फरक आहे.समोरचा काही करु शकत नाही या साठी म्हणुन सहानुभूती पूरक दिली जाते ति "भिक" आहे.आणि समोरचा चांगल करतोय म्हणुन त्याला मदत दिली जाते तिला "भिक्षा" आस म्हणतात.काही वेळेला आपण दोन्ही गोष्टी करता एकच शब्द वापरतो.स्वःहा चा चरितार्थ चालावा,माझा ग्रह प्रपंच चालावा,माझ घर चालावा,माझ्या बायका पोरांना खायला मिळाव,म्हणुन भिक्षा मागायला लागण ते मात्र चांगल नाही.आपला पैसा आपण उद्योग करुन मिळवला पाहीजे.असा तुकोबांनचा आभंग आहे.
"भिक्षा पात्र अवलंबिने जळोत्याचे जीणे"
पण हे वाक्य कुणा साठी? संसारी माणसा साठी.प्रापंचिक माणसा साठी.पण जो संन्यासी आहे,जो ब्रम्हचारी आहे,ज्यानी या सर्व लोकांनचा संसार आपल्या डोक्यावर घेतला आहे.अशा माणसान एखाद्या महत कार्या साठी,एखाद्या मोठया कार्या साठी,तो कार्यकर्ता म्हणुन काम करतोय.अशा वेळेला भिक्षा मागितली तर ति सन्माननीय भिक्षा आहे . आहो आपल्या कडे आखा दत्त साप्रदाय भिक्षे मध्ये आहे.नाथ साप्रदाय भिक्षा मागणारा आहे,कित्येक ठिकाणी भिक्षेचा अतीशय स्पष्ट उल्लेख आहे.त्या मुळे भिक्षा प्रत्येक वेळेला वाइटच असते आस नाही. *भिक देणआणि भिक्षा देण याच्या मधल परक माणसाला ककळला पाहीजे* आणि संसारी माणस,प्रापंची माणसान स्वःहा च पोट जाळण्या साठी भिक्षा मागण हे संताना माण्य नाही.पण सन्याशानि,ब्रम्हचाऱ्यानि,स्वःहा च्या उपासने साठी.आपल्या तपस्ये साठी. आपल्या लोक कल्याणा साठी,जर भिक्षा मागितली तर त्याचा कुठ निषेद नाहीये.
आली कडचे महा मुर्ख विद्वान् नको त्या गोष्टीच्या स्तुति करत आसतात अशा विद्वानाच्या पासुन आपण चार हात दूर असलेल बर.
या मधुकराला समर्थरामदास स्वामींनी सांगितल की गावत जाऊन काही ठिकाणी भिक्षा मागून ये.शेवटी आपला उदरभरण हा ही विषय आहे पुन्हा .आणि मधुकर गावात विचारायला गेल.तीथ काही टावळ खोर होते त्यानि त्या गावत जो सगळ्यात कोपिष्ट ज्योतिषी होता त्याच घर दाखवल.जा तिथे जाऊन भिक्षा माग.मधुकरने बिच्याऱ्याने त्याच्या आंगणा मध्ये जाऊन भिक्षा मागितली. आणि तेव्हा हा त्यानि हा श्लोक रचला.
*समर्थाचिया सेवका वक्र पाहे*
तो कोपिष्ट इतका चिडला तो कही कार्या मध्ये होता आणि त्यानि स्वःहा च ज्ञान आणि कौ शल्य वापरून त्या ठिकाणी शाप असा उच्चारला."आरे मुर्ख पोरा. तुझ्या आयुष्य तुझ्या रूपा पेक्षा जास्त नाही आणि अशा वेळेला तू माझ्या सारख्या विद्वानाला त्रास देतोस.उद्या जिवंत राहिलास तर ये मग घालिन तुला भिक्षा." मधुकर बिचारा घाबरून गेला.समर्थानच्या पाशी आला आणि म्हणाला "मला त्या ज्योतिष्याणि पंडितांनी असा शाप दिला हो मी उद्या दुपार पर्यन्त मारेल म्हणुन." समर्थ म्हणाले काही काळजी करु नको हे बघ तू रामचंद्राचा सेवकत्व पत्कारल आहेस न ? मग रामवर विश्वास आहे या शब्दाला काही अर्थच रहात नहीं.तू असा घाबरल्या सारखा करु लागलास तर. यातुन ही तुला भीती वटतेन? तू एक काम कर.उद्या सकाळी आपली रामचंद्राची पुजा वगैरे वाचन झाल की तू थोडिशि विश्रांती घे.त्या वेळेला तू माझे पाय चेपत रहा. कोणी ही आल तरी तू ज्या घोंगडी वर बसला आहेस त्या घोंगडी वरण ऊठायच नाही एव्हड पहा.मधुकर सकाळी आहो रात्रभर त्यांना झोप नाही आणि स्वामींनचे पाय चेपत बसला.आणि आलन ते यमराज त्याचे काळदुत आले.आणि त्यानि यम पाश फेकलेन.पण ते पाश घोंगडी पासुन पुढ जात.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
रामचंद्राची रामचंद्राच नाम स्मरण, रामचंद्रचि उपासना सतत चालु आहे त्या ठिकाणी यमाचे पाश नाहीं पडत.यम दूत निघून गेले.आणि आता समर्थ म्हणाले जा त्याच्याच कड जाऊन भिक्षा माग.तो घाबरून एतकच म्हणाला आहो ते रस्त्या मध्ये ते यमदूत आड वे आले म्हणजे आली का पंचाइत.ति घोंगडी द्या.आरे घोंगडी महत्वाची नव्हती त्याच्यावर वर बसणारा मनुष्य महत्वाचा होता. असो.त्याला घोंगडी दिली त्यानि तीथ जासुन परत तो श्लोक म्हटला तो आश्चर्य चकित झाला नव्हे समर्थाना शरण आला.त्याचा अहंकार संपला आणि समर्थानी त्याला हेच शिकवल की *आपल्या विद्येचा आपल्या ज्ञानाचा उपयोग समोर च्या ला घाबरवण्या साठी किंवा समाजा मध्ये बड़ेजाव करण्या साठी करण चांगल नाही.त्याच्या पेक्षा प्रभु रामचंद्राची उपासना करावी आपल्या विद्येन आपल्या उपासनेन लोकांना मुक्त कस करता येईल याचा विचार करावा* म्हणुन अशा समर्थाच्या सेवकाला म्हणजे रामचंद्राच्या सेवकला कुणी ही वाकडया डोळ्यांनी पाहु शकत नाही.पण त्यान सेवकत्व घेतल पाहीजे.हे रामदास स्वामिनी या श्लोका मध्ये आपल्याला सांगितलय.अती उत्कृष्ट धीर दिलाय.आजचा श्लोक आहे.
*समर्थाचिया सेवका वक्र पाहे*
..............
*नुपेक्षी कदा राम दासाभिमानी*
|| जय जयरघुवीर समर्थ ||
श्री समर्थ रामदास स्वामींची करुणाष्टके
( Stotra, Arati, Mantra, Articles, PDF Library and more...)