महासंकटी सोडिले देव जेणे |
प्रताबे बळे आगळा सर्वगुणे |
जयाते स्मरे शैलजा शूळपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||31||
जय जय रघुवीर समर्थ.
हा श्लोक ऐकल्या नंतर आपल्या मना मध्ये शंका आशी येईल की आपल्यावर संकट आल तर आपण ज्यांचे कडे जातो आसे देव सुध्दा जर त्या रावणाला घाबरत आसतील तर मग आपण त्या देवा कडे का जातोय ? बाकी संत महंत महात्मे तर सांगतात सगळ जग चालत ते देवाच्या सत्ते मुळे चालत.झाडाच पाण हालत ते देवाच्या सत्ते मुळे हालत.देवाच एव्हड प्रचंड ज़ामर्थ असताना ते संकटात कसे काय पडले?
तेव्हा या श्लोका मधे,आपल्या रामायण, महाभारत,या ग्रन्था मधला *देव* या शब्दाचा अर्थ आपण जरा थोडा नीट समजाउन घेतला पाहीजे.भागवत ग्रन्था मध्ये आस सांगितल आहे.किंवा आनेक पुराणा मध्ये आस सांगितलेल आहे.ही सृष्टी निर्माण झाल्या नंतर त्रिगुणाच आधार घेऊन मायेचा आधार घेऊन या सगळ्या ब्रम्हांडाच निर्माण केल्या नंतर या ब्रम्हांडाच सातत्य राखण्या साठी ब्रम्हा,विष्णु,महेष,तिघांना त्या परब्रम्हानी निर्माण केल.ब्रम्हाला सतत काहिना काही नवीन निर्माण करण हे काम दिल.आहे ते सांभाळण हे विष्णु ला काम दिल.लोप करण त्याचा प्रलय करण महेषाला काम दिल.एकाच दैवीशक्तिचे हे तिन आविष्कार ब्रम्हा विष्णु महेष आसे तिघ त्या नंतर निर्माण झाले.आता ब्रम्ह देवाने ही सृष्टी आणखिन छान निर्माण होण्या साठी चांगली,नटवण्या साठी आपले दहा माणस पुत्र निर्माण केले.या दहा माणस पुत्रान पैकी एकाच नाव आहे कश्यप ऋषि.नीट लक्षात घ्या बर.सृष्टी निर्माण झाली त्याच्या सातत्य साठी तिन देव निर्माण झाले.त्याच्या नंतर ब्रम्हदेवानी दहा माणस पुत्र निर्माण केले.त्यातले एक कश्यप ऋषि या काश्यपाना अदिति नावाच्या पत्नी पासुन जी संतति उत्पान्न झाली ति पुराणा मध्ये *देव* या अर्थाने संबोधली जाते .या देव लोकांनच साधारणताहा राज्य त्रिविष्टपा वरती होत.त्रयविष्ट म्हणजे हिमालया च्या पलिकडे आसणारा तिबेट सारखा भाग.या सगळ्या देव लोकांना,आदिति च्या सर्व लोकांना अत्यंत मोठ तिबेटच राज्य मिळाल होत.पण तरी सुध्दा रावणा सारखे त्या कालात रहात होते या आनेक आनेक राज्यन वरती स्वार्या करुन त्यांच्या वरती आक्रमण करुन त्यांचे प्रांत आपल्या ताब्यात घेत आसत.आणि जे कुणाच्या आध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही कुणाला त्रास द्यायला जात नाही असा देवदिकांना बंदी शाळेत टाकत किंवा हलकी सालकी काम करायला आपल्या राज्यात रावण ठेवत होता.अशा महा संकटा मध्ये हे देव जेव्हा सापडले तेव्हा हे सर्व दैवि गुणानी असेच देव होते.पण यांच कुणाच ही सामर्थ रावणाला संपवून टाकेल आस फारस उरल नाही.अशा वेळेला प्रभु रामचंद्रानि या सगळ्या देवाना त्या बंदीवासातून सोडवल या,त्रासातून सोडवल असा संधर्भ या ठिकाणी आहे.
या श्लोका मध्ये *सोडिले* हा जो शब्द आहे हा शब्द "सांभाळून" असा घेतला पाहीजे. आपण थोडया विचारान घेतला पाहीजे.सोडविले असाच अर्थ अभिप्रेत आहे.की महासंकटी ज्यानी या सगळ्या देवांना सोडवल.असा ज्याचा प्रताप आहे,पराक्रम आहे पण नुसता *पराक्रम आहे म्हणुन भरता मध्ये कुणाची पुजा नाही केलि जात.त्याच्या बरोबरीन त्यांच्या मध्ये श्रेष्ट गुणाणंची सुध्दा आवश्यक्ता असते.* अशा अनेक गुणांणचा संगम आहे रामचंद्रा मध्ये.
*प्रतापे बळे आगळा सर्वगुणे* आणि
*जयाते स्मरे शैलजा शुळपाणी*
या ठीकाणी मुद्दाम *शैलजा* म्हणजे पार्वती आणि *शुळपाणि* म्हणजे भगवान शंकर हे सुध्दा त्या रामचंद्राची स्तुति गातात.या ठिकाणी सांगितलय
*जयाचे स्मरे शैलजा शुळपाणि*
आता शैलजा म्हणजे पार्वती भगवान शंकराच द्वितीय लग्न .आधी या पार्वती चा जो कूर्म आवतार आहे त्यात दाक्षयानि बरोबर शंकराचा विवाह झाला होता.आणि या दाक्षायनीनी मधे असा वेडे पणा केला की रामचंद्राची ति परीक्षा घ्यायला गेली जेव्हा सीताहरण झाल होत.रावणानि सितेच अपहरण केल होत.रामचंद्र दुःखा मध्ये होते तेव्हा.
दाक्षयानी म्हणाली मी जर सीतामाईच रूप घेऊन त्या ठिकाणी गेले तर रामाला ही फसवु शकेल.शंकर म्हणाले आस नाही होणार.तू रामचंद्रचि शक्ति जानत नाहीये.पण न एकुण दाक्षयाणिनी सितेच मायावी रूप घेतल.ति त्या ठिकाणी आश्रमात गेलि.लक्षुमण क्षण भर फसला.त्याला वाटल सीता वहिनी आल्या की काय?रामचंद्रानि मात्र हात जोडून ओळखल आणि विचारल आई तुम्हि इथे एकट्या कशा आल्या भगवान शंकर कुठयेत्? मग मात्र आपण रामला फसवु शकु याचा सुध्दा अहंकार दाक्षायनी चा संपल अर्थात दाक्षायनीची पुढची कथा वेगळी आहे.नंतर च्या जीवना मध्ये आपल्या वडीलाच्या यज्ञा मध्ये जाऊन आपल जीवन संपवल्याची कथा आहे.ति कथा आता महत्वाची नाही.पण या ठिकाणी दाक्षायनिन रामाची परीक्षा करायचा वेडे पणा केला या साठी दाक्षयाणिला पश्चाताप भोगावा लागल.पश्चाताप भोगायला लागू नये म्हणुन पुढच्या अवतारा मध्ये पर्वतीच्या रुपा मध्ये असताना पार्वती म्हणजे शैलजा शुळपाणि म्हणजे शंकर हे सुध्दा ज्याच ध्यान करतात.असा मझा प्रभु रामचंद्र तो तुझी उपेक्षा करणार आहे करे? कधीच उपेक्षा करणार नाही.हे आपल्या मनामध्ये रामनाम स्थिर रहाव म्हणुन आजचा श्लोक आहे.
*महासंकटी सोडिले देव जेणे*
..........
*नुपेक्षी कदा राम दासाभिमानी*
|| जय जयरघुवीर समर्थ ||