भवाच्या भये काय भीतोस लंडी |
धरी रे मना धीर धाकासि सांडी |
रघुनायकासारिख स्वामी शिरी |
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||27||
जय जय रघुवीर समर्थ.
हा श्लोक ऐकताना आपल्या डोळ्या समोर खरच साक्षात समर्थांची मुर्ति उभी रहाते.रोज बराशे सूर्यनमस्कार घालून अत्यंत पिळदार केलेल सुंदर शरीर ति भगवी छाटी कफनी अंगावरती घातलेली. ति दाढी जटा आणि कपाळि असलेल सुंदर भव्य आस असलेल वैष्णव गंध .डोळ्या मध्ये असलेली चमक आणि आपल्या पिळदार बाहुनि हाता मध्ये घेऊन कुबड़ी आशी उंचाउंन समोरच्याला धीर देताय.आरे काय घाबरतो मित्रा? काय घाबरतोस मुर्ख? आरे तू रामचंद्राचा दास,आरे तू रामचंद्राचा शिष्य,आरे तू रामाचा भक्त असताना
*भवा च्या भये काय भीतोस लंडी* मनाला धीर धर आणि धाक सगळा सांडुन टाक.कारणतुला कल्पना नाही हा प्रभु रामचंद्र काय ताकदीचे आहे.आरे वेडया
*रघुनायकासरीखा स्वामी शिरी*
त्या रघुनाथाचि ताकत तुला माहीत आहे? अरे त्रेता युगा मध्ये रावण नावाचा जो राक्षस होता त्याची भीती सर्वत्र होती. देवादिकांना ही भीती वाटत होती.सगळ त्रयलोक्या त्राहि भगवान झाल होत.पण अशा रावणाला सुध्दा पराभूत करणारा महापराक्रमी वानर तेव्हा आर्यवृता मध्ये होता.ज्याच नाव होत वाली.वाली केव्हडा बलाढ्य होता बाबारे .देहाणे सुध्दा प्रचंड.पराक्रमने सुध्दा प्रचंड. समुद्रा मध्ये उभा राहून वाली जेव्हा संध्या वंदन करत होता तेव्हा आकाश मार्गाने जाताना रावणानि त्याला पाहिल.रावणाला कल्पना आली बापरे हा कुणी तरी आपल्या पेक्षा बलाढ्य दिसतो यांच्याशी मैत्री करुन ठेवलेली बरी. पुढच्या राजकारणाच्या दृष्टिन. पण रावण तसा थोडा अहंकारी आणि विचित्र मुर्ति.रावण समुद्रातच मागे येऊन उभा राहिला.तर रावणाच्या मुकुटाच शेवटच टोक ते वाली च्या फक्त खेद्याला येउन राहील.म्हणजे ऊंचिच्या दृष्टिन वाली असा जबरदस्त होता त्यानि अर्घ प्रदाण करण्या साठी हात वर केले.तर या वेड्याने मगण बगलेतुन हात घालून गुद्गुल्या केल्या.वाली च्या लक्षात आल की *स्वःहा स्वार्था साठी उपासना करणारे आनेक हलकट,दुसऱ्या माणसांच्या उपासने मध्ये विघ्न अनण्या साठी असा त्रास देतात* असे.बघुया तर आता या कडे.पुन्हा वालीन अर्घ्य देण्या साठी हात वर केले.त्यानि गुद्गुल्या करण्या करता हात घातले यानि घट्टदिशि रावणाला पकडला आणि समुद्रात बसायला सुरुवात केलि.आहो मुकुटा सगट,तोंडा सगट,रावण पाण्यात बुडाला.वालीच तोंड पाण्याच्या वर राहील.नाका तोंडात पाणी गेल्यान माणूस इतक्या ताकतिन आपले हात पाय हलवतो.अत्यंत अकांतान आपले हतपाय झाड़ित होता तो.कोण?रावण.ज्याच्या शक्तिची दहशत सगळ्या त्रयलोका मध्ये.तो शक्तिवान रावण हात पाय झटत होता पण हात सोडवू शकत नव्हता एव्हडा सामर्थवान रावण.काही क्षणानि त्याला वर काढला.आणि रावणाला सज्जड़ दम भरला.वाली असा त्रयस्त वृत्तिचा होता.की रावण सगळ्या जगला त्रास देत असत.मला नाही न त्रास देत.बास.मग ठीक आहे.जाऊ दे.तो एक राजा आहे मी एक राजा आहे.राजा राजाचा मित्र असावा.म्हणुन या दोघांनी आपल्या मैत्रीच सौख्य सुध्दा केल.तोदुर्विलास.
की *या जगा मध्ये सज्जना मध्ये खर आशे ताकतवान माणस आसतात.की जे दुर्जणांना क्षणात संपवु शकतात.पण ही ताकतवान माणस अशाच पध्दतीन स्वयंम केंद्रित आसतात.मला त्रास होत नाहिन,तो पर्यन्त त्या दुर्जनाच्या सगळ्या मुर्ख कृत्या कडे दुर्लक्ष करायला महाभाग तयार आसतात. हेच तर जगाच दुर्दैव आहे* पण असा साम्राज्य संपन्न वाली होता.याच आणि सुग्रीवाच युध्द सुरु झाल.यानि आपल्या अहंकारच्या बळावर आपल्या धाकट्या भावाला सुग्रीवाला निष्कासित केला होता नगरातुन बाहेर घालवला होता.आपल्या किश्किन्दा नगरितुन जंगला मध्ये वणवासात पाढवला होता.त्या वणवासात जेव्हा सुग्रीवाची आणि रामचंद्राची भेट झाली.प्रभुनच्या जेव्हा लक्षात आल सत्याच्या बाजुन,सच्चाई च्या बाजुने जर कुणी उभ रहानार असेल तर तो सुग्रीवच आहे.वाली हा सातत्याने तटस्थ राहत आलेला आहे.नाही तर किमान आपल्या स्टेटसला शोभेल आस रावणाच्या पाढ़िशि तरी नाही उभा राहीला .असा वाली संपला पाहीजे.आणि जेव्हा सुग्रीव आणि वालीच युध्द सुरु झाल्या नंतर जेव्हा वाली सुग्रीवाला भारी पडू लागला अशा वेळेला आपल्या मित्रा वरती एव्हड मोठ भारी संकट चाल करुन येतय तेव्हा
*नुपेक्षी कदा कोपल्या दंड धारी.*
आपल्या हाता मध्ये जे धनुष्य होत त्या धनुष्यातुन तीक्षण बाण सोडुन त्यांनी वालीला आडवा लोळवला.ज्यानी रावणाच खेळण केल होत असा वाली एका बणात ज्यानी संपवुन दाखवला.असा रामचंद्र,आशे प्रभु रामचंद्र ते तुझे स्वामी असताना तू भक्ति केल्यानंतर त्यांनचा दास होणार आहेस एव्हडा पराक्रमी असलेला रामचंद्र तुझ्या शिरावर स्वामी म्हणुन असताना काय घाबरतोस भित्रा? मुर्ख.अरे नको घाबरुस.समर्थ रामदास स्वामिनी संपूर्ण भरता मध्ये यावनी सत्ता असताना सुध्दा एकटयानि संपूर्ण वरती काश्मीरा पासुन खालती लंके पर्यन्त भ्रमन करुन दाखवल.का? काही कुण्या रक्षकाची मला गरज नव्हती. का? माझा प्रभु रामचंद्र माझ्या पाढ़िशि आहे.अर्थात त्या साठी तपस्या,त्या साठी व्यायाम,त्या साठी आवश्यक शस्त्र साधन,समर्थानी केल होत.यात संशय नाही.त्या मुळे समर्थ म्हणतात अशा तऱ्हेन तू *रामाची उपासना केलि,स्वःहा असा समर्थ व्हायला तयार असशील तर रघुनाथ तुझ्या वर कृपा करायला तयार आहे.तेव्हा आपल्या मनातील सर्व धाक आपण सांडुन टाकला पाहीजे.धीर धरला पाहीजे आणि रघुनायकाच्या दासाला शोभेल आस वर्तन या पुढच्या काळात केल पाहीजे* हे समजावून सांगण्या साठी आज श्लोक क्रमांक सत्ताविस वर आपण चिंतन केल
उद्या पासुन
*नुपेक्षी कदा रामदासाभिमानी*
हीच ओळ शेवटी येणार आहे.दहा श्लोक आता सबंध एक दशक त्यातल आपल्याला बघायच आहे.रघुनाथाच चरित्र क्रमा क्रमानि त्याच्या मध्ये आपल्याला पहायला मिळेलच
नुवेक्षि कदा राम दासाभिमानी आस एकत्र नाही म्हणायच अ.
नुपेक्षी कदा राम.कुणाची उपेक्षा करत नाही.कारण का? तर त्याला दासाचा अभिमान आहे म्हणुन.
नुपेक्षी कदा राम.दासाभिमानी हे दशक उद्या पासुन सुरु होणार आहे.तेव्हा आज या सत्ताविसाव्या श्लोका मध्ये समर्थानी दिलेला धीर लक्षत घेऊ आपल्या मनात धाक आपण बाजूला करु.आजचा श्लोक होता.
*भवाच्या भये काय भीतोस लंडी*
|| जय जयरघुवीर समर्थ ||