मनाचे श्लोक १ला ( गणाधीश जो ईश )

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।

गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

जय जय रघुवीर समर्थ.

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाच स्तवन कराव हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक संकेत आहे.ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना सुध्दा माउलींनी गणेशाला वंदन केल आहे.जगतगुरु तुकोबारायांनी सुध्दा आपल्या अभंग गाथे मध्ये पुढील प्रमाणे गणेशाचा गौरव केला आहे. 

"ओंकार प्रधान रूप गणेशाचे 
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान 
अकार तो ब्रम्हा , उकार तो विष्णु 
मकार महेश जाणियेला 
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न 
तो हा गजानन मायबाप 
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी 
पहावी पुराणी व्यासाचिया"
      
     भगवान गणेशाला बुध्दिची देवता असा सन्मान आहे.तेव्हा पहिल्यांदा या बुध्दिला नमस्कार आहे.
*गणाधीश जो ईश सर्वा गुणांनचा*
समर्थ अस म्हणतात.एक-एक सद्गुणांनी सुध्दा आपलं जीवन कृतार्थ होऊन जात(उजळून निघत).  अशा अनेक गुणांनचा हा संगम गणेशाच्या एकाच व्यक्तिमत्वा मध्ये आहे. हा अनेक गुणांचा अधीश आहेपण तरी सुध्दा समर्थांना आवडनारे विशेषण अस की तो *गणाधीश* आहे.तो शिव गणांचा प्रमुख आहे.नव्हे-नव्हे ,अशा गुणी माणसानी नेतृत्व घेण.तसेच नेतृत्व हाती घेऊन  काही चांगल्या गोष्टी समाजा मध्ये करण हे समर्थांना अतिशय आवडनारी गोष्ट आहे. नाही तर समाजा मध्ये गुणी माणस खुप आसतात हो. *गुणा धीश बरेच आसतात पण ते गणाधीश होत नाहीत* म्हणुन समर्थानी त्यांना आवडनारा शब्द प्रथम क्रमांकावर ठेवलाय.की गणेशाचे अनेक गुण आहेत.हे सगळे चांगलेच आहेत.पण तो *गणाधीश* आहे हा  समर्थांना जास्त आवडनारा गुण आहे.
*गणाधीश जो ईश सर्वा गुणांनचा* पण *मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा*
या ठिकाणी शंकर पार्वती च्या पोटी जन्माला आलेला गणेश एवढाच  सिमित अर्थ न घेता ओंकार स्वरूप गणेश  या अर्था कडे समर्थ जातात.कारण जेव्हा मनुष्य किंवा कोणी ही साधक सगुण रूपाच्या उपासने कडून निर्गुण रूपाच्या उपासने कडे वाटचाल करतो तेव्हा मात्र तो ओंकाराची साधना करतो.तेव्हा ओंकार प्रधान रूप गणेशाचे या नियमा प्रमाणे या ओंकार रूपी गणेशाला.जो मुळारंभ आहे.कशाचा? निर्गुणाच्या उपासनेचा.तेव्हा 
*मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |*
अस गणेशाला वंदन केल आहे.त्याच्या नंतर आपली जी वाणीची देवता आहे. *शारदा* तिला वंदन केलय समर्थांनी.
*नमु शारदा मुळ चत्वार वाचा |*
कारण ही वाणी चार प्रकारानी आपल्या देहातून प्रगटते."परा पश्चन्ति मध्यमा वैखरी".या चतुर्विध वाणीच्या रूपाने जी शारदा माझ्या मध्ये (समर्था मध्ये) निवास करते  त्या शारदेला वंदन केलय. गणेशाला वंदन करुन शारदेला वंदन करुन आपल्याला काय करायचय? आपल्याला कोणता मार्ग चालायचाय? याचं मार्ग दर्शन पहिल्याच श्लोका मध्ये समर्थांनी केलय.
*गमु पंथ आनंद या राघवाचा*
या परमेश्वराला,या रामचंद्राला,या परब्रम्हला प्राप्त करुन घेण्याचा हा जो अंनत चालनारा पंथ आहे या रस्त्यानी आपल्याला जायचय.तेव्हा सर्वानच्या सह आपल्या मना सह आपल्या सर्व इंद्रियांसह या भक्ति मार्गाच्या पथा वरती समर्थ आपल्याला घेऊन जात आहे. आणि त्याच्या आधी गणेशाला शारदेला वंदन करायचा हा आपला संस्कृतीचा संकेत ही पाळता आहेत.तेव्हा आता अंनत असलेला पथ कसा चालायच?या पथा मध्ये चालताना कोणती कोणती पथ्य पाळायची? या सगळ्याच मार्गदर्शन पुढच्या श्लोका पासुन समर्थ आपणाला सांगणार आहे.तेव्हा तो पर्यन्त गणेशाला शारदेला वंदन करुन पहिल्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी पुर्ण करुया आणी ओंकार स्वरूप गणेशाला चतुर्विधा वाणी च्या रुपान शारदेला वंदन करुन या राघवाच्या पंथाला जाण्याचा निश्चय करु या.

जय जय रघुवीर समर्थ.


थोडे नवीन जरा जुने