मना सज्जना भक्तिपंथेचि जावे |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे |
जनी निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे |
जनी वंद्य ते सर्व भावे करावे |
जय जय रघुवीर समर्थ.
समर्थ रामदास स्वामीच मुळ नाव नारायण. त्यांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत ठोसर तसेच त्यांच मुळ गाव जांब होत .या ठिकाणी जन्माला आलेला हा महात्मा बालपणापासुन त्यांच्या वर रामभक्तिचे संस्कार झाले. सूर्यनमस्काराच व्रत त्यांच्या घरा मध्ये कित्येक पिढ़यांपासुन चालत आल होत. मात्र या मुलाची चौकस बुध्दि अशी की आसपासची (भोवतालची) परिस्थिती पाहुन या समाज मध्ये पुन्हा एकदा राम उभा केला पाहीजे. लोकांना भक्तिपंथाला लावल पाहीजे. याची त्यांला तीव्र आवश्यक्ता आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि म्हणुन घरी आपल्या आईन आपल लग्न ठरवलेल असताना सुध्दा त्या लग्नाकडे पाठ फिरवुन हा नारायण नाशिक कडे निघून आला आणि नाशिक च्या शेजारी टाकळी नावाच्या गावी अत्यंत खडतर अस बारा वर्षाच तप करुन साक्षात रामचंद्राचा साक्षात्कार प्राप्त केला. त्याच्यानंतर समर्थांनी अवघ्या भारताच भ्रमन केल .तेव्हा असे अधिकारी संत आपल्याला त्याच पंथावरुन नेण्यासाठी काय-काय कराव याची फार सुंदर सुचना देताय. सुरुवात किती छान केलीय पहा.अनेक संतांच्या रचना या अशाच आहे,की थेट लोकांना उपदेश करायला गेल ते त्यांना आवडत नाही.
आम्हाला कोण तुम्ही सागणारे?
आम्हाला कशाला सांगता?
अशा तर्हेची उध्दट उत्तर ऐकायला मिळतात. तेव्हा मग संतानी हा सोपा मार्ग निवडला. आपणच आपल्या मनाशी बोलल्या सारख करायच पण त्याचा उपयोग लोकांना झाला पाहीजे. अर्थात समर्थांनी हे त्यांच्या मनाला सांगायची गरजच नाही. त्यांना राम साक्षात्कार प्राप्तच आहे.आपल्या मनाला सांगण्यासाठी ते अस सांगतात. ज्याच्या कडून काम करवुन घ्यायच त्याला थोडस "अंजराव-गोंजराव" लागतच. एकदम त्यांच्याशी फटकुन त्याच्या कडून काम नाही करुन घेतायेत.त्यामुळे समर्थांनी उलट आपल्या मनाला गोड पणान गोंजारल आहे.
तू सज्जन आहेस की नाही? आहेस ना?
*मना सज्जना* मग तु *भक्तिपंथेचि जावे* सज्जन लोक ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने तु जा.मग त्यामुळे काय होईल?
*तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे*
या ठिकाणी समर्थानी मुद्दाम *श्रीहरी* हा शब्द वापरलाय.याचा हेतु लक्षात घेतला पाहीजे.कारण समर्थानच्या दृष्टिने श्रीराम आणि श्रीहरी याच्यात फरक नाहीच आहे.आपणच मना मध्ये फरक घेऊन उगाचच भेद शोधत बसतो.पण पांडुरंगाच, विठ्ठलाच, प्रभुच जे रूप आपल्या सगळ्यांनच्या समोर आहे.तोच राम आहे.तोच कृष्ण आहे.आणि तोच सगळयांच दुःख हरण करणारा हरी पण आहे.म्हणुन विठ्ठलाचा गजर सुध्दा राम कृष्ण हरी.या तिनही नावा मध्ये आहे.या दृष्टिने
"गमु पंथ आनंत या राघवचा" म्हणतांना फक्त दशरथ नंदन राम इतकाच त्यांच्या डोळ्या समोर नाहिये.तर तो परब्रम्ह राम त्यांच्या डोळ्या समोर आहे. त्या परब्रम्हाला तुम्ही काहीही म्हणा.राम म्हणा, कृष्ण म्हणा, श्रीहरी म्हणा, गणेश म्हणा, जगदंबा म्हणा.कुठल्याही रूपानी म्हणा.परब्रम्ह एकच स्वरूप रहानार आहे. या दृष्टिन तो श्रीहरी.कृपा करीलच रे.आपल्या मनाला सांगताना किंवा लोकांना सांगताना समर्थ इतक गोड सांगतात.ते म्हणतात.तू भक्ति पंथानी जायला लागलास ना.की तुला तो पावनारच. तो त्याचा स्वभाव आहे.
*तरी श्रीहरी पविजेतो स्वभावे*
तो त्याचा स्वभावच आहे.या मार्गानी आला जो त्याच्यावर कृपा करायचीच.आता मनुष्य म्हणतो त्यासाठी मी काय करु? भक्ति म्हणजे?
आता तुम्ही ती भक्ति कशी करायची हे तुम्ही मला सांगा.नामस्मरण किती करु?
जपजाप्य किती करु ? वैगैरे.
समर्थ या पुर्वी पहिल्यांदा एक सुचना देतात.
*जनी निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे* आणि
*जनी वद्य ते सर्व भावे करावे*
पहिल्यांदा आपला आचार मंगल केला पाहीजे. त्या नंतर या भक्ति मार्गातल्या नवविध भक्तीच्या कोणत्या तरी एक प्रकाराला अटी टाकल्या पाहीजे.शेवटी अन्न चांगल असेल तरच त्या औषधाचा उपयोग होणार आहे.अन्न चुकिच असल, अपथ्य असल तर औषध किती ही चांगल असल तरी त्याचा नीट उपयोग होणार नाही.या दृष्टिन भक्ति ची सुरुवात ही सदाचाराने होत असते समर्थानी या श्लोका मध्ये आपल्याला सांगितलय. ते लक्षात घेऊन आपणही या भक्ति मार्गामध्ये प्रगति करण्याच्या दृष्टिन काम करताना *पहिल्यांदा आपला दैनंदिन आचार जेव्हडा सात्विक करता येईल तेव्हडा करुया* आणि मग या भक्ति मार्गाच्या मार्गानि सुरुवात करु या
|| जय जयरघुवीर समर्थ ||