त्रिगुनात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा |
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेति नेति शब्द नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना |
जय देव जय देव जय श्रीगुरूदत्ता |
आरती ओवाळितां हरली भवचिंता || धृ ||
सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात |
पराही परतली तेथे कैंचा हा हेत |
जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || १ ||
दत्त येऊनियां उभा ठाकला |
सद्भावे साष्टांगेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला।
जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || २ ||
दत्त दत्त ऐंसे लागले ध्यान |
हारपले मन झालें उन्मन |
मी तूं पणाची झाली बोळवण |
एका जर्नादनी श्रीदत्त जाण || जय || ३ ॥
संबंधित इतर पोस्ट्स 👇
🪙
विशेष ज्योतिष उपाय
समृद्धी (Prosperity), बचत (Savings) आणि गुंतवणुकीसाठी (Investment) विशेष मार्गदर्शन