आवाहन मंत्र:-
हिरण्यवर्णां हरिणीम्
सुवर्ण रजत स्रजाम् |
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं
जातवेदो मी आवह ||
दिनांक ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी आवाहन पूजन व विसर्जनाविषयी माहिती
आवाहन पूजन व विसर्जन हे तिन्हीही नक्षत्र प्रधान असल्याने त्या त्या नक्षत्रावर ते करावे.
आवाहन: ३ सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र हे सूर्योदयापासून रात्री १०.५७. मिनिटांपर्यंतआहे या पूर्ण वेळेत आपण केव्हा ही आवाहन करू शकता.
त्यात स्थिर लग्न विशेष सांगितले आहे ते
सिंह लग्न सकाळी ७.०९ ते ९.१५ पर्यंत
वृश्चिक लग्न दुपरी ११.२५ ते १.३९ पर्यंत
कुंभ लग्न सायं.०५.३५ ते सायं.७.१३ पर्यंत आहे
पूजन दिनांक ४ सप्टेंबर रोजी
रितीरिवाजाप्रमाणे ज्यांच्याकडे दुपारी आहे त्यांनी दुपारी ज्यांच्याकडे संध्याकाळी आहे त्यांनी संध्याकाळी पूजन करावे.
विसर्जन : दिनांक ५ सप्टेंबर रोजी मूळ नक्षत्र सूर्योदयापासून रात्री ८.०६ पर्यंतआहे वरील वेळेत आपण हे पूजन केव्हाही करू शकता.
विसर्जन मंत्र :-
यांतू देवगणा सर्वे
पूजा मादाय पार्थिवम् |
इष्ट काम प्रसिध्यर्थम्
पुनरागमनाय च ||