मनोबोध श्लोक २८वा (दीनानाथ हा राम कोदंड धारी)

दीनानाथ हा राम कोदंड धारी |

पुढे देखता काळपोटी थरारी |

जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||28||


जय जय रघुवीर समर्थ.

या श्लोका पासुन "नुपेक्षी कदा राम दासाभिमानी" हे दशक सुरु होत आहे.आता याच्या पुढचे दहा श्लोकाच शेवटचे वाक्य हेच रहानार आहे.

आता शाळे मध्ये मराठी माध्यम असताना आपण मराठी भाषा शिकत असताना सुध्दा."नुपेक्षी" या शब्दाचा पटकन अर्थ बऱ्याच लोकांना  कळणार नाही. त्याचा अर्थ सांगतो.मुळात समोरच्या च्या मागण्या कडे,समोरच्या माणसाच्या बोलण्या कडे,दुर्लक्ष केल किंवा त्याची मागणी पुर्ण न करणे.याला मराठी भाषेत ऊपेक्षा करणे आस म्हणतात. *समोरच्याच्या अपेक्षे कडे दुर्लक्ष करने याला आपल्या कडे उपेक्षा करणे आस म्हणतात.* तर समर्थानी इथ जो शब्द वापरला तो,तुझा सगळ्या चरित्राची,भविष्याची,तुझ्या मागन्याची, कधीही उपेक्षा करणार नाही. "न उपेक्षी " याचा संधि एकत्र केला 

"नुपेक्षी कदा" राम दासाभिमानी.

भक्ताच्या मागणीची तो कधीच उपेक्षा करत नाही.त्यांची मागणी नक्की पुर्ण करतोच.त्याच्या जीवनाला सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतोच.या साठी समर्थानी या पहिल्या श्लोका मध्ये इतका सुंदर शब्द वापरला आहे.तो "दीनानाथ" आहे. म्हणजे दिन लोकांनचा नाथ आहे. पालक आहे.त्यांना सांभाळायची ईच्छा आसणारा आहे.पण कसा आहे? कोदंड धारी.नुसती ईच्छा असुन काही उपयोग नाही योग्य शस्त्र त्याच्या हाता मध्ये पाहीजे.

अनेकांना  माहीत ही नसेल कोदंड नावाच जे धनुष्य आहे हे रामचंद्राच्या धनुष्याच नाव आहे.तर हे कोदंड नावाच धनुष्य कुणी तयार केल? रामचंद्र जेव्हा वणवासा मध्ये आले तेव्हा जाण्या साठी किंवा वणवासात राहण्या साठी.वन्य हिंस्त्र पशु पासुन किंवा राक्षसा पासुन आपल रक्षण व्हाव म्हणुन एक धनुष आणि एक भाता घेऊन निघाले होते.पण कोदंड त्या वनवासाच्या प्रवासा मध्ये अगस्ति ऋषिनी  तयार करुन दिलेल  होत.कारण रामचंद्राच्या जन्मचा हेतु,  जीवनाचा हेतु,रावण वध असा होता.हे अगस्ति ऋषि कोदंड  रमाला देताना सांगतात की हे राम,आज ना उद्या रावणाशि तुझ युध्द होणार हे मला माहित आहे. या दृष्टिन हे मी मुद्दाम वेगळ धनुष्य तयार केल आहे.कस आहे धनुष्य हे ? समजा तू रावणाशि युद्ध करायला उभा रहिलास.आणि रावणाच्या एखद्या शस्त्रांनी तुझ धनुष्यच तुटल.पुढच युध्द तू कस करणार?आता आयोध्येला जाऊन दुसर धनुष्य घेऊन येतो आणि मग पुढच युध्द करु.आस म्हणता येणार आहे का? आस नाही म्हणता येणार.रामा,या महाघोर रणसंग्रामा मध्ये रावणाच्या कोणत्याही शस्त्रांनी हे धनुष्य तुटनार नाही आस  हे धनुष्य मी तयार केल.आस अगस्ति ऋषि म्हणतात. म्हणजे पहा.त्या काळा मध्ये यज्ञयाग करणारे,तपस्या करणारे,ऋषि राष्ट्रा च्या संरक्षणाच्या च्या दृष्टिनी किती सजग होते.किति विचार करत होते.केवळ माझी उपासना झाली,केवळ माझा जप झाला,केवळ माझा यज्ञयाग होम हवन झाल,की झाल सगळ.नाही नाही नाही.राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिन  जे जे लोक कार्य करतात. त्यांनची शक्ति कशी वाढेल याच्या कडे ऋषिनी लक्ष पुरवल आणि राष्ट्रा च्या सुरक्षते साठी अतिशय प्रगत असणाऱ्या शस्त्राच निर्माण त्यानि आपल्या आश्रमात केल. तरी सुध्दा आपली तपस्या भंग होईल,आपल आध्यात्मिक अधपतन होईल,आस त्यांना कधी वाटल नाही.

*आली कडे बरेच आध्यात्मिक गुरु आशे आहे.की राष्ट्रीय सुरक्षा हा विषय आपल्या चर्चे मध्ये जरी आला तर आपली आध्यात्मिक साधना कुठ तरी मातीत मिळेल की काय असा एक विचित्र न्यूनगंड त्याच्या मना मध्ये आहे.* दुर्दैवानी त्यांना ऋषिन ची चरित्र माहीत नहीं. *ऋषिनी आध्यात्मिक प्रचंड प्रगति केलिच राष्ट्राच्या सुरक्षे कडे कधी उपेक्षण पाहिल नाही.* ज्या अगस्ति ऋषिनी हे कोदंड निर्माण केल स्वःहा च्या शक्तिन,अंतस्तचक्षुणी,रावणा कडच्या सगळ्या शस्त्राचा आभ्यास केला होता. आणि तशा तऱ्हेची दूसर शस्त्र निर्माण करुन त्याचा या कोदंड वर प्रयोग करुन कोदंड निर्माण केल होत.रावणाच्या कुठल्याही शस्त्रांनी हे तुटनार नाही.आस कोदंड ज्याला मिळाल असा माझा प्रभु रामचंद्र,दिनाचा नाथ आहे.

*दीनानाथ हा कोदंड धारी*

असा कोदंड धारी राम असल्यावर पुढ काय झाल?

*पुढे देखता काळ पोटी थरारी*

आहो साक्षात काळ सुध्दा या रामाला घाबरतो.रावनाचे जे दूत दंडक अरण्य मध्ये आले होते. खर काय दूषन काय ति शूर्पणखा काय या खर दुशना च्या चौदा हजार सैन्याचा रामचंद्रानि पराभव केला  एव्हड ज्याच सामर्थ आहे.म्हणुन समर्थ म्हणतात बाबारे माझ्या रामचंद्राच एव्हड महाटीम्य जे सांगतो अतिशोक्ति नाही बर.

*जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी*

मी जे बोलतोय ते नेमस्त आहे.नेमस्त या शब्दाचा अर्थ यथा योग्य मनुष्य साधारणः मनुष्य स्तुति करताना काय गोंधळ करतो? एक तर अतिश्योक्ति करतो नाही तर अतिश्योक्ति च्या उलट निंदा तरी करतो.समाज एखाद्या चहा बध्दल बोलताना आहा अमृता सारखा आहे.ही तरअतिश्योक्ति आहे.आरे काय तुमचा चहा कडू लिबाचा काढा याच्या पेक्षा बरा.दोन्ही तशी अतिशोक्तिच.मनुष्य एकडची अतिश्योक्ति करतो नाही तर तिकडचि अतिशोक्ति करतो "नेमस्त " जे योग्य आहे.हे बोलण आवघड असत.म्हणुन समर्थ रामदास स्वामी म्हणतात माझ्या रामाची स्तुति करतोय ति कोठे अतिश्योक्ति नाहीये  ति नेमस्त आहे.हे सत्य आहे लक्षात ठेव,असा *माझा राम. तू जर त्याचा दास झाला सेवक झाला तर तो तुझी उपेक्षा करणार नहीं* या विश्वासाला आपल्या मना मध्ये दृढ़ करण्या साठी आजचा श्लोक असा आहे.

*दीनानाथ हा कोदंड धारी*

........

*नुपेक्षी कदा राम दासाभिमानी*


|| जय जयरघुवीर समर्थ ||

थोडे नवीन जरा जुने