असे हो जया अंतरी भाव जैसा |
वसे हो तया अंतरी देव तैसा |
अन्न्यास रक्षीतसे चापपाणी |
नुपेक्षि कदा रामदासाभिमानि ||35||
जय जय रघुवीर समर्थ.
या श्लोका मध्ये समर्थांनी आपल्या सर्व साधकांना च्या गाथ्यालाच हात घातला.आहो प्रत्येक माणसाची इच्छा असते.आपल् भल व्हाव,आपलचांगल व्हाव,आपल् कल्याण व्हाव,आपल्यावर देवांनी कृपा करावी,आपल्या ला परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा, परमेश्वराची कृपा छाया आपल्याला मिळावी,साक्षात्कार आपल्याला व्हावा.पण आस होताना बहुत अंशी दिसत नाही.मग मनुष्य विव्हळ होऊन जातो.आम्ही उपासना करतोय.आम्ही साधना करतोय.पण खरच ती फळाला येते का हो?अजुन तरी काही फारशी फळाला आलेली दिसत नाही.त्याला समर्थांनी उत्तर दिलय.
भगवंत तुला साक्षात्कार द्यायला काही काचकुच करत नाहिये. प्रश्न इतकाच आहे की तुझा भाव किती दृढ़ आहे? ते तू पहा.तू अनन्य आहेस का? बाकी सगळ्यां प्रपंच्या मधली सगळी कर्तव्य ही एक साधन म्हणून करत रहावि साध्य मला भगवंता ची प्राप्ति हे आहे.अस लक्ष ठेऊन अनन्य पणे त्या साध्यावर लक्ष ठेऊन तुझा जीवन क्रम करतोयस का? मग अपेक्षा कशी काय करतोस एव्हड्या सगळ्याची.?
कस असत.मनुष्याच्या अपेक्षा आशा इतक्या विचित्र आहे. की मी कसाहि वागलो देवानी माझ्याशी चांगलाच वागल पाहिजे.मी कंसा सारखा वागलो तरी देवानी माझी सुदाम्या सारखी भालवन केलि पाहिजे.आस कस होईल?
*वसे हो जया अंतरी भाव जैसा*
तुझ अंतर जस असेल त्या प्रमाणे तुला त्याचा साक्षात कार होणार.तुझ्या अंतराळ म्हणजे मन चक्षु वरती मलपटला वरती जर काम क्रोध अहंकारा च्या लाटा आशा जर वर खाली येत जात असतील.तर त्या मध्ये वरच चंद्राच्.वरच सूर्याच,परब्रम्हाच,प्रतिबिंब शांत,स्तीर,आनंदी दायी,दिसणार कस? तो भाव तुझा स्तीर नाहिये तो चंचल आहे.तेव्हा भगवंताचच तुला दिसणार दर्शन हे आसच काहिं वेळ आहे आणि काही वेळ नाही.ज्याणी अनन्य पणे भगवंताला शरण जाऊन त्याच गुणगान, तो मिळावा म्हणून साधना केलि त्याला कही उपेक्षित ठेवलच नाही.
*अनन्यास रक्षितसे चापपाणी*
रक्षितसे चापपाणी पेक्षा *अनन्य* हा शब्द फार महत्वाचा आहे? चापपाणी म्हणजे काय? आधी समजावून घेऊ चाप म्हणजे धनुष्य ते धनुष्य ज्याच्या हाती आहे.संसकृत भाषे मध्ये पाणी म्हणजे हात बरका.विवाह लग्न कार्या मध्ये वधु वराचा हात एक मेकांन् च्या हातात द्यायचा या विधिला पाणी ग्रहण विधि आस म्हणतात.अनेक जणांना माहीत नसल्या मुळ त्या वेळेला पाणी पितात की काय? 😛 आशा या लोकांनचा भ्रम होतो.पाणी या शब्दाचा अर्थ हात असा होतो.तेव्हा असा भ्रम नसावा.ज्याच्या हाता मध्ये सुदर्शनचक्र आहे तो चक्रपाणि, ज्याच्या हाता मध्ये ते कोदंड आहे तो चापपाणी,ज्याच्या हाता मध्ये त्रिशूळ आहे तो शूळपाणी,या सगळ्यां शब्दाचा अर्थ नीट लक्षात ठेवला पाहिजे.जो अनन्य पणे त्याला शरण जातो त्याच रक्षण हा चापपाणी म्हणजे माझा रामचंद्र करतोच.माझा परब्रम्ह परमात्माकरतोच.
याला दृष्टांत म्हणून एकायची असेल तर दोन मिनिटाची कथा सुध्दा आपल्याला पुरेशी आहे.
नामदेवा कडून नामा चा अनुग्रह प्राप्त झालेली त्यांच्या घरातलि दासी जनि.तिला
"दळीता कांडीता तुज गायीन अनंता"
न संपे नाम ना क्षणभरी मुरारी
आशी साधना आहे? आयुष्यातल्या दुःखाला कधी उगाळत बसली नाही. उलट आपली साधना उपासना उत्कृष्ट केलि.आपला जो प्रपंच म्हणून होता उदरनिर्वाहा कररिता तिही गोष्ट आवश्यक होती.ति कारणा पूर्ति केलि.अणि हरी प्राप्ति निशाना वरती आपल् लक्ष कायम ठेवल.परिणाम.जेव्हा जनाबाई वरती देवाचे दागिने चोरल्याचा आरोप आला त्याच्या साठी तिला सूळी देण्याची शिक्षा झाली.तरी तिच्या चेहऱ्यावर शांत आस हास्य होत.का? दृढ़ भाव होता.भगवंत पांडुरंग माझ रक्षण करणार या सगळ्या संकटाना मि नाही घाबरणार.परिणाम तिला जेव्हा त्या सुळा पाशी आनल त्या सुळाला हात लावताच स्पर्श करताच त्या लोखंडाच्या सुळाच पाणी झाल आशी कथा आहे.आपल्याला ही आशे चमत्कार व्हावे आपण संकटा मधुन सुटाव आस वाटत पण जनाबाई च्या इतका दृढ़ भाव, जनाबाई इतकी आपल्या कडून साधना झालीय का? याचा अंतर्मुख होऊन कोणी विचार करतच नाहीं ? तेव्हा आंतर्मुख होऊन आपण विचार करावा अणि आपली योग्यता तेव्हडि वाढवावी.मग मात्र भगवंत आपली उपेक्षा करणार नाही या बद्दल ची आपली भावना दृढ़ राहण्या साठी समर्थ रामदास स्वामींनचा आजचा श्लोक होता.
*असे हो जया अन्तरि भाव भाव तैसा*
..........
*नुपेक्षि कदा रामदासाभिमानि*
|| जय जयरघुवीर समर्थ ||