अहल्या शिळा राघवे मुक्त केली |
पदी लागता दिव्य होउनि गेली |
जया वर्णिता शीनली वेद वाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||32||
जय जय रघुवीर समर्थ.
रामायणा मध्ये आहिल्येचि मोठी दुःखी कथा आहे.गौतम ऋषिनच्या बरोबर विवाह झालेली आहिल्या आतिशय रूप सुंदर होती.आणि गौतम ऋषि बरोबर तिचा प्रपंच ही सुखाने चालला होता.
कथा आस सांगते.
एकदा तिच्या आसक्ति मुळे एकदा इंद्राणी गौतम ऋषिचा वेश धारण करुन गोतमाच रूप धारणन करुन तिच्या आश्रमा मध्ये येण्याचा प्रयत्न केला.जेव्हा गौतम ऋषि एका आनुष्ठाना साठी एका यागा साठी आपल्या कुटीच्या बाहेर गेले.तेव्हा गौतम ऋषिनच रूप घेऊन त्या ठिकाणी आला. बिचारी आहिल्या फसली आणि तिन इंद्राच आगत स्वागत केल.पण तो पर्यन्त अनुष्ठान संपवून गौतम ऋषि परत तिथे आले.आणि गौतमानी आपल्याच रूपा मध्ये इंद्राला पाहिल तेव्हा त्यानि इंद्राला ही शाप दिला आणि आहिल्येला ही शाप दिला.
या ठिकाणी लक्षात घेण्या सारखी गोष्ट आहे.की एव्हडया देव देवतांन च आधिपत्य असलेल्या इंद्रा सारख्या एखाद्या व्यक्तिन जर अशा तऱ्हेच कृत्य केल.जाऊ दे एव्हडया मोठया सत्ते वरती आहे एव्हडया मोठया ठिकाणा वर आहे म्हणुन त्याला शापातुन किंवा शिक्षेतुन आपल्या पुराण काळात कधी ही सुटका मिळाली नाही. *जर चूक झाली त्याची शिक्षा कोणत्याही पदावरच्या व्यक्तीला झालीच पाहीजे* असा कडक दंडक आपल्या संपूर्ण महाभारता मध्ये रामायणा मध्ये आपल्याला पहायला मिळतो.
या दृष्टिन इंद्राला ही शासन झाल.आणि आहिल्येला शाप दिला आस नव्हे तिन एक विशिष्ट काळ तपस्या करुन हे सगळ आपल्या वरच सावट दुरकरून टाकण्या साठी त्या ठीकनी गौतम ऋषिनी आज्ञा केलि.आणि गौतम स्वःहा सुध्दा तपस्ये साठी गेले.लक्षात ठेवा.
या ठिकाणी आस काही झाल काही तरी केल इंद्राच स्वागत केल म्हणुन बायकोला टाकून दूसरी बाई घेऊन निघून गेले असा कुठ ही उल्लेख रामायणा मध्ये नाही. एकदा गौतम आहिल्येचा विवाह झाला म्हटल की त्या नंतर आयुष्या मध्ये येणारी सुख दुःख ही दोघानची आसतील तर संकट ही सुध्दा दोघांनचि आहे.समजा अजानते पणानि का होईना काही संकट आल असेल तर याच्या क्षालना साठी दोघ ही पतिपत्नी थोडा वेग वेग वेगळ्या ठिकाणी राहून तपस्याच करत होते हे लक्षात ठेवल पाहीजे.
आता.थोडस वाल्मीकि रामायण,तुलसी रामायण,याच्या मध्ये काही काही छोटे छोटेसे भेद आहे.वाल्मीकि रामायणा मध्ये वाल्मीकिनी ति दगड झाली होती, शिळा झाली होती, आस कुठ ही वर्णन केलेल नाही.त्यानि त्या रामायणा मध्ये एतकच लिहलय.की ति निश्चल म्हणजे द्गडा सारखी निश्चल त्या ठिकाणी राहून आपली तपस्या करत होती आपली उपासना करत होती.आता "ति द्गडा सारखी निश्चल राहून" या वाक्याच थोड पुढे उदत्ति करण करुन थोड वेगळ पण केल जात की "ति त्या ठिकाणी दगड होऊन बसली होती" अर्थात गोष्ट आशी आहे.एका बाजूला तर्कानि जर विचार केला तर ति ऋषि पत्नीये म्हटल्या नंतर रामचंन्द्र तिला चरण स्पर्श करतील आस दिसत नाही.किंबहुना वाल्मीकि रामायणा मध्ये रामानी तील नमस्कार केलेला आहे .तरी सुध्दा प्रभु रामचंद्राच देवत्व आपल्या मना मध्ये छान पैकी स्तीर व्हाव म्हणुन पुढे संत महात्म्यनि या कथेला थोडस वेगळ वळण दिल आणि आस सांगितल.आशी आहिल्या त्या ठिकाणी तपस्या करीत बसली होती जिचा पुर्वी च्या एका थोडयशा आगत स्वागता मुळे जीवनाला थोडासा काळीमा लागला होता. तो रामचंद्राच्या येण्या मुळे ..आता पहा "पाय लागणे" या शब्दा चा अर्थ व्यवहारा मध्ये आपण असाच घेतो की आपण "आल्यामुळे" एखाद्या कुणाच्या घरा मध्ये लाईट गेले आसतील,आपण गेलो आणि लाईट आली.तर वा वा "तुमचे पाय लागल्या मुळे लाईट आली बरका" पाय लागल्या मुळे इथ व्यवहरा मध्ये आर्थ आपण इतकाच घेतो की आल्या मुळे
तस रामचंन्द त्याआश्रमात आल्या नंतर.त्यांची पावल त्या आश्रमात आली आणि द्गडा सारखी निश्चल असलेली आहिल्या त्याच्या वरच सगळ मळाप तिच्या वरच संपूण गेल आणि ति दिव्य होऊन गेली.आशा
तऱ्हेची कथा आलेली आहे.
तेव्हा एखाद्या व्यक्तीला चूक झाली म्हणुन शिक्षा करण किंवा तिच्या कडून उपासना प्रायश्चित्य करुन घेण तीला मद्त म्हणुन आपण ही काही उपासना प्रायश्चित्य करण हे योग्यच आहे.पण त्याच बरोबर सतत शिक्षा हे ही काही त्याच उत्तर नव्हे.बरोबर नाहीये.कुठ तरी या गोष्टी च निराकरण झाल पाहीजे.दोघानी त्या गोष्टीला संपवल पाहीजे.या दृष्टिन पुन्हा गोतमाच आहिल्येच दोघानच मिलन करुन या ठियानि प्रभु रामचंद्र पुढच्या मार्गाला जनकाच्या कुटी कडे गेले.
लक्षात घेण्याचा विषय असा.की अहिल्या सारखी काही काळ जिच्या जीवनाला काळीमा लागला होता आशी आहिल्या सुध्दा त्याच्या येण्या मुळे ज्याच्य सहवासा मुळे त्याच्या पद स्पर्श मुळे दिव्य होऊन गेली
*जया वर्णिता शिनली वेद वाणी*
म्हणजे वेदानी सुध्दा आपली वाणी खुप प्रगत पणे केलि तरी सुध्दा परमेश्वराच परब्रम्हयाच् गुणगाण पूर्णः वेद उपनिषद् करु शकली नाहीत. तो प्रभु रामचंद्र ते परब्रम्हच रामाच्या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झाल ते रामचंद्र तुझ्या सारख्याचि उपेक्षा करतील का? आस होणार नाही.तेव्हा प्रभु रामचंद्रानि आहिल्येचा उध्दार केला तसा तुझ्या जीवना मध्ये तुझ्या अजानते पणाने काही त्रास झाला असेल काही कालिमा आला असेल तो सुध्दा दूर टाकून ते उध्दार करायला ते तयार आहे.पण तू उपासना त्या रामचंद्रा वरती विशवास ठेऊन केलि पाहीजे या साठी आजचा श्लोक होता.
*आहिल्या शीला राघवे मुक्त केलि*
......
*नुपेक्षी कदा राम दासाभिमानी*
|| जय जयरघुवीर समर्थ ||