उपेक्षा कदा राममरूपी असेना |
जीवा मानवा निश्चयों तो वसेना |
शिरी भार वाहेन बोले पुराणी |
नुपेक्षि कदा राम.दसाभिमानि ||34||
जय जय रघुवीर समर्थ.
आपल्या मना मधला भगवंता बद्दलचा भाव दृढ़ करण्या साठी समर्थ रामदास स्वामिनी या श्लोका मध्ये आपल्याला सांगीतलय.की आपला राम आपली कधीच उपेक्षा करत नाही.करणार नाही.हे सत्य आहे.पण काय आहे आपल्या जीवाला,या मानवाच्या जीवाला त्याच्या वरती विश्वास ठेवता येत नाही.जगातली सगळ्यात मोठी अडचन आहे.आपण भगवंताला काय मागतो?
"त्वमेव माताच त्वमेव पिताच त्वमेव
त्वमेव बंधु सखा त्वमेव"
तू माझा मायबाप आहेस.आहो एकनाथ महाराजांनी आपल्या आभंगात म्हंटलय न.
"माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तिरी
बाप आणि आई माझी विठ्ठल रुखमाई"
मग त्याला एकदा माय बाप मानल्या नंतर मग आता ही शंका का? आपल्या लेकरांणच्या भल्या साठी आई वडिलांनी अनेक गोष्टी केलेल्या असतात,आणून ठेवलेल्या असतात,तयार केलेल्या असतात.पण त्या केव्हा त्याला द्यायच्या त्याची वेळ त्या लेकरांण पेक्षा आई वडिलांना अधिक कळते याच्या वर विश्वास ठेवायला काही हरकत नाही.
एखादी गोष्ट भगवंतानी माझ्या पर्यन्त पोहचवली नाही म्हणजे माझ्या पुढच्या जीवनाला काहीतरी बाधा ठरत होती म्हणून मला ती दिली नाही.एव्हडा तरी दृढ़ भाव भगवंता वर ठेवला पाहिजे.
सुंदर लोक कथा अशी आहे.एक राजा होता अणि त्याचा प्रधान अतिशय जीवलग मित्र होता.ते दोघे ही आपल्या राज्यात भ्रमण करताना आपल्या राज्याच्या तलवारि जो तयार करायचा त्या लोहाराच्या दुकानात गेले.आणि तलवारिची धार बघत बघता राजाची करंगळी तूटली तसा तो राजा रागावला ही काय पध्दत झाली.तलवार तयार करायची त्या लोहारला तुरुंगात टाका. आशा वेळेला प्रधान म्हणाला महाराज आस रागावु नका .जे होत ते चांगल्या साठी होत.तू माझा मित्र असताना ललोहाराचाची बाजू घेतोस याला ही तुरुंगात टाका.प्रधान तुरुंगात पडला लोहार तुरुंगात पडला दूसरे दिवशी हे महाराज शिकारीला म्हणून गेले अणि चुकून आदिवासी लोकांणच्या हाती सापडले.आणि तेथे आदिवासी देवीला बळी देण्या करता कोणीतरील हवाच होता.आणि हा अनायसे मिळाला राजबिंडा माणूस.त्याला पकडला त्याच्या सगळय आंगाला शेंदुर फासला राजा घाबरुन गेला मरतो आता मी.एव्हड्यात त्या आदिवासीच्या पुरोहिताच्या लक्षात आल.थांबा थांबा याला बळी देता येणार नाही.याची
करंगळी तुटलेली आहे.देवाला जे वहातात ते आस अशुभ असता कामा नये.राजाचा जिव वाचला राजा परत आला.त्याला प्रधानाचे शब्द आठवले प्रधान म्हनत होता ते बरोबर आहे.जे होत ते चांगल्या साठी होत.देव करतो ते भल्या साठी करतो.माझा मृत्यु वाचला.प्रधानाला तुरुंगातुं मुक्त केल लोहाराला मुक्त केल.आणि सहज त्या प्रधानाला विचारला कायरे माझी करंगळी तुटली म्हणून माझा जिव वाचला मी मान्य करतो.तू तुरुंगात पडलास तुझ काय रे चांगल झालस? प्रधान म्हणाला वा महाराज.आहो तुम्ही मला जर तुरुंगात टाकल नसत तर तुम्ही तुमच्या बरोबर नेल असत.मग? करंगळी तुटलि म्हणून तुम्ही वाचला असता,मी मेलो असतो त्याच काय? 🤣भगवंतानी मला कारावसात ठेवल हे ही माझ्या कल्याणा साठीच ठेवल.
हा त्या सध्या प्रधानानि विश्वास ठेवला आणि त्यांना ती प्रचति आली.तस आपण विश्वास ठेवला पाहिजे.पुढच्या जीवनाला काही तरी बाधा करत असेल म्हणून आई वडील मुद्दामच देणार नाही बाकि चे सुख आहे. *माणूस आहे त्या सुखाचा कधी हिशोब करत नाही. तो हिशोब करता आला पाहिजे* आपल्याल्या मिळालेल्या सुखाचा हिशोब करून सांग बर माझ्या या रामचंद्रानी,परमेश्वरानी तुझी उपेक्षा केलि आहे का? सुखाच्या बाबतीतकाहि तरी उपेक्षा केलि? नाहीन? मग त्याच्या वर दृढ़ भाव ठेव.हा दृढ़ भाव राहण्या साठी समर्थ या ठिकाणी याश्लोकात सांगतात तेव्हा आजचा श्लोक होता.
*उपेक्षा कदा रामरूपी असेना*
......
*नुपेक्षि कदा राम.दसाभिमानि*
|| जय जयरघुवीर समर्थ ||