मनोबोध श्लोक ३३ वा (वसे मेरुमांदार सॄष्टिलिला)

वसे मेरुमांदार सॄष्टिलिला |
शशि सूर्य तारांगणे मेघमाळा |
चिरंजीव केले जनी दास दोन्ही |
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||33||

जय जय रघुवीर समर्थ.

आपल्याला इतिहासा मध्ये आशा बऱ्याच  गोष्टी  माहीत असतील,की कुठल्या तरी राजाने कुणाला तरी जमीन,शेत.एखाद्या राज्याचा तूकड़ा म्हणून दाण दिला.पण दाण देताना त्या दाण पत्रा मध्ये काही शब्द आशे लिहलेले असतात की यावत चंद्र दिवाकरय .म्हणजे जो पर्यन्त चंद्र आहे जो पर्यन्त सूर्य आहे तो पर्यन्त ही भूमि तुझ्याच कड़े राहील.हे मी तुला देऊन टाकतो.
आता प्रश्न आसा असतो जो वर चंद्र सूर्य असणार आहे एव्हडया कालखंडा पर्यन्त काय,आशे राजवट काही वेळेला शंभर दोनशे वर्ष सुध्दा  टिकलेली नसते .किंवा समोरच्या बिचर्या माणसाची ती गोष्ट सुध्दा  दोनशे तीनशे वर्ष पर्यन्त जास्त रानार नाही.पण तरी सुध्द पण एक म्हणायची पध्दत आपल्या कड़े आहे.यावत चंद्र दिवाकराय .मी जे दाण देतोय किंवा मी जे करणार आहे त्याची कीर्ति जो पर्यन्त शशि,सूर्य,तारांगणे,मेघ माला,हे जो पर्यन्त आहे.तो पर्यन्त राहील.त्यातली भावना सगळी चांगली आहे.आपण इतक्या काला पर्यन्त आपली कीर्ति शिल्लक रहावि एव्हडि काही आपली योग्यता नसते.एक मर्यादा आपल्याला माहीत आसते.पण रामचंद्राणि मात्र केल.निश्चित पणे जो वर शशि,सूर्य,तारांगणे,मेघ माला,आहे तो पर्यन्त त्याची कीर्ति रहानारच.जो पर्यन्त या सृष्टि वरती मेरु पर्वत आहे मांदर पर्वत आहे.
*वसे मेरुमांदार  हे सृष्टिलीला*
ही सर्व सृष्टि जो पर्यन्त आहे.
*शशि सूर्य तारांगणे मेघमाळा*
शशि सूर्य तारांगणे मेघमाळा हे जो पर्यन्त आहे तो पर्यन्त रामचंद्राची कीर्ति राहणाराच.का? तर त्याने या आपल्या कीर्तना साठी किंवा आपल्या या पुढ च्या कार्या साठी सातत्याने कष्ट वीर जे आपले दोन दास होते ते चिरंजीव केले.एका बाजूला हनुमंताला चिरंजीव केल दुसऱ्या बाजूला बिबिषण नावाचा जो रावणाचा भाऊ त्यांच्या कडे आला होता.त्याला ही चिरंजीव केले.पुढच्या कालखंडा मध्ये बऱ्याच महात्म्यांना बिबिषणाच किंवा या हनुमंताच साक्षात दर्शन झाल्याच्या कथा आहे.तेव्हा एकदम सगळा अविश्वास या गोष्टिन वरती दाखवण्या पेक्षा या साठी योग्य ती त्यांची उपासना झाली असेल.त्यांना त्यांना या लोकांनच दर्शन होउ शकत.किंवा रामकार्य पुढच्या जीवना मध्ये देह संपला तरी एका वेगळ्या रूपा मध्ये राहून करू शकता.अस चिरंजीव पद रामचंद्राणि आपल्या या दोनही दासांना दिल आहे.
आता या ठिकाणी एक शंका मात्र येण्य सारखी आहे.की बिबिषणानि रामचंद्रला मदत करण हा त्यांनी राष्ट्र द्रोह केला किंवा बंधु द्रोह केला आस नाही का होणार ? 
याच उत्तर मुद्दाम लक्षात ठेवा.
राष्ट्र द्रोह केव्हा होतो? जर रामचंद्र लंकेच राज्य जिंकण्या करता गेला किंवा लंकेच राज्य गिळनकृत करण्या साठी गेला आणि त्या वेळी बिबिषणानि रावणाची साथ सोडून जर रमाला मदत केलि असति तर मात्र राजद्रोह झाला असता.बिबिषणाने कुठे राष्ट्राशि द्रोह केला नाही.कारण रामचंद्र लंका जींकायला नाही आलेले.त्यातल्या फक्त  रावणाला शासन करायला ते आले होते.
या ठीकानी बिबिषणानी केलेल्या कृति ला बंधुद्रोह नाही म्हणता येत .एक वाक्य मुद्दाम लक्षात ठेवा.फार महत्वाच वाक्य आहे.जे गोपालकृष्णनी आपल्या महाभारता मध्ये सांगीतल आहे ते *केवळ एका घरा मध्ये जन्माला आलेत म्हणून कुणी कुणाचे बंधु नसतात. ज्यांनचि विचार सरणी आपल्या जीवनाची एक समान असते.ते खरे एकमेकाचे बंधु असतात* म्हणून या विश्वा मध्ये अशीच पध्दत आहे.ज्यानची विचारसरनि *जगा आणि जगु द्या* आशी आहे.ते सगळे एकत्र येऊन अनेक दुष्ट शक्तिनचा अनेक राष्ट्रा मध्ये उतपन्न होणाऱ्या दुष्ट शक्तिनचा निपात करायला एकत्र येतात.तेव्हा 
आपल्या देशाला त्रास देणारा आतंकवादी एखाद्या दुसऱ्या देशात लपला असेल अणि आपण समजा त्याच्यावर कारवाही करण्या साठी त्या देशात गलो तर त्या देशातलि माणस आपल्याला करतात ना मदत.याचा अर्थ ते त्यांच्या देशाशि द्रोह करत असतात किंवा त्यांच्या माणसाशि द्रोह करत असतात ? आस नाही.ते पशुतेचा द्रोह करत असतात.त्या राक्षसी कृत्यशि द्रोह करतात असतात .पण मानवतेशी मैत्री करतात.तेव्हा 
स्वःहाला सत्ता मिळेल की नाही माहीत नाही.स्वःहाला संपत्ति मिळेल की नाही माहीत नाही.पण आस काहीही नाही मिळाल,एखाद्या वेळी मी रामचंद्राला सहाय्य झालो म्हणून मला मृत्यु सुध्दा मिळेल.तो मृत्यु ही मान्य करून जेव्हा बिबिषणाने मनवतेचा हात धरला पशुतेचा हात सोडला. किंवा या सगळ्या राक्षसी प्रवृत्ति ची साथ सोडलिं.आस ज्याणी स्वःहा च्या मरणावर तयार होऊन रामकार्या करायचा,देवकार्य करायचा प्रयत्न केला.अशावेळेला प्रभु रामचंद्राणि त्याला चिरंजीत्व दिलय.मग
आसच रामकार्य जर तू केलस तर तुझी चिंता तो करणार नाही का? तेव्हा काळजी करु नकोस मनात शका बळगू नकोस प्रभु रामचंद्रच्या सेवे मध्ये उपासने मध्ये आखंड रहा.तो रामचंद्र तुझी उपेक्षा करणार नाही.हे आपल्या मना मध्ये पुन्हा पुन्हा ठसवण्या साठी समर्थ हा प्रयत्न करतात.तेव्हा आजचा श्लोक.
*वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा*
..........
*नुपेक्षि कदा रामदासाभिमानी*

|| जय जयरघुवीर समर्थ ||


थोडे नवीन जरा जुने