मनोबोध श्लोक २२वा (मना सज्जना हित माझे करावे)


मना सज्जना हित माझे करावे |

रघूनायका दृढ़ चित्ती धरावे |

महाराज जो स्वामी वायूसुताचा |

जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ||22|| 


जय जय रघुवीर समर्थ.

पुन्हा एकदा या श्लोका मध्ये समर्थांनी आपला आवडता शब्द वापरलाय."मना सज्ना" हे मना तू सज्ज्न आहेस.मग एक माझ हित करना."हित" या शब्दाचा अर्थ सुध्दा लक्षात घेतला पाहीजे बर. *दीर्घकालीन किंवा पुढच्या सर्व आयुष्य भर ज्याच्या मुळे आपल कल्याण होणार आहे.ज्याच्या मुळे आपल हित होणार ज्याच्या मुळे आपल मंगल होणार शुभ होणार आशी जी कुठली गोष्ट तर ती हिताची म्हटली जाते* या ठिकाणी मुद्दाम सुखाची,आनंदाची,वगैरे,कुठलाही शब्द समर्थ वापरत नाही. *हित माझे करावे* माझ सर्वकालीन कल्याण ज्याच्या मध्ये आहे आस काही तरी तू कर.पण आस काही तरी म्हणजे मनाला थोडच कळणार आहे.समर्थानी त्याच उत्तर पण दिलाय.

*रघुनायका दृढ़ चित्ती धरावे*

बाबारे हा जो माझा रामचंद्र आहे ना त्याला दृढ़ चित्ता मध्ये धरून ठेव.एव्हडच माझ्या जन्माच खर हित आहे.

आणि आता रामचंद्राची गुणवत्ता सांगताना समर्थ रामदास स्वामिनी एक फार छान आशी युक्ति केलि आहे.की आपल्या मनालाच सांगितलय.हे मना तू मारोती रायांना ओळखतोस ना? मग तो जो वायु पुत्र आहे.पवन पुत्र हनुमान आहे.त्याला तू ओळखतोस ना? आ रे मग ज्या पवन पुत्राणि ज्याला महाराज म्हटल म्हणजे ज्याला मारोतीरायांनीच स्वामी म्हटल तो राम काय असेल? याची कल्पना कर वेडया.कारण मारोतिराय सामाण्य गोष्ट नव्हे.मारुतिराय कसे होते? 

बुधकौशिक ऋषिनी फार त्याच सुंदर वर्णन केलय आहे.ते म्हणतात मारोतिराय ची योग्यता आशी "मनोजवं" मनावर विजय मिळवणारे."मारुती  तुल्यम वेगं" त्यांच एकुण उड्डाणाचा वेग पहाता .अगदि वायुला मागे टाकतील असा जबरदस्त वीर होता."जितेंद्रियं" स्वःहा च्या इंद्रिया वरती,स्वःहा च्या इंद्रियाच्या संवेदनान वरती,प्रचंड मोठा ताबा होता.आणि "बुध्दिमतां वरीष्टिम" खरच काही वेळेला समाजा मध्ये आपल्याला दिसत.की एकाच वेळेला कोणी "शक्तिमतं वरिष्ठम" आणि बुध्दिमतां वरीष्ठम" आस सहसा सापडत नाही.साधारण बुध्दिमतां वरिष्ठम म्हणजे फार कुशाग्र बुध्दिमत्ता असलेले आसे वेताच्या काडी सारखे तब्यतिचे लोक सापडतात.आणि सधारणः प्रचंड चांगली तब्यत असलेले बुद्धिच्या दृष्टीने जरा फार बेताचेच आसतात.पण मारोतिराय या दोन गोष्टीच अगदि अप्रतिम मिश्रण.जितेंद्रियं बुध्दिमतां वरिष्ठम ."वातात्मजं वानरयूथ मुख्यम" वनराच्या संपूर्ण सेनीचे ते मुख्य आहे.

आणि असे जे मारुतिराय आसे जे हनुमंत ते स्वःहा रामचंद्राला आपला स्वामी समजतात.स्वःहा ला त्याच दास मानण्या मध्ये त्याला मोठेपण वाटत याच्या वरून कल्पना कर.माझा प्रभु रामचंद्र काय जबरदस्त असेल? 

अशा तऱ्हेन त्या राघवाला दृढ़ चित्ता मध्ये धराव अर्थात पुन्हा एकदा या ठिकाणी प्रभु रामचंद्राची फक्त अयोध्यावासी भूमिका मांडलेली नाही. *तो नाथ लोकत्र्याचा*  आहे.तिन ही लोकिचा नाथ आहे.

याच्या मध्ये पूर्व आयुष्या मधली किंवा पूर्व युगा मधे एक वामनाची कथा सुध्दा येऊन जाते.की ज्यानी आपल्या तिन पावला मध्ये सर्व त्रयलोक्य व्यापूण टाकल होत.आणि या त्रयलोक्या मध्ये ज्याला कुणाला कोणताही त्रास असेल तर त्या त्रासा पासुन जो त्याला मुक्त करतो अशा सगळ्या तिन ही लोकाचा नाथ तिन्ही लोकांनचा स्वामी.असा जो माझा परब्रम्हपरमात्मा रामचंद्राच्या रूपानी आला त्याला दृढ़ चित्ता मध्ये धरून ठेव.एव्हड माझ्या हिताच कर. आस ते मनाला सांगतातय.म्हणजे एका अर्थानि ते आपल्यालाच सांगताय.की *बाबानो आयुष्या मध्ये हित जर साधायच असेल तर या रघुनाथाला मरुतिरायानी ज्याना स्वामी म्हटल त्या रघुनाथाला आपल्या रूधया  मध्ये आपल्या चित्ता मध्ये दृढ़ ठेवा* तो आनंदच निधान आपल्याला  देणार आहे.


|| जय जयरघुवीर समर्थ ||

थोडे नवीन जरा जुने