जनी वाउगे बोलतां सुख नाही |
घडिने घडी काळ आयुष्य नेतो |
देहांती तुला कोण सोडूं लहतो ||23||
जय जय रघुवीर समर्थ.
साधना करताना उपासना करताना परमार्था च्या मार्गाने जाताना एक पथ्य पाळल पाहीजे.समर्थ त्या पथ्या बध्दल या श्लोका मध्ये आपल्याला सांगतातय.
*न बोले मना राघवेविण् काही* कारण
*जनी वाउगे बोलता सुख नाही*
खरच आपण जे जे काही बोलतो दिवसभरा मध्ये.याच्यातल खरच किती आवश्यक असत? याचा आपण आंतरमुख होऊन थोडा विचार केला तर लक्षात येईल की आपण खुप वाउग बोलत रहातो. *आपल्या बोलण्या मध्ये दोन गोष्टी खुप महत्वाच्या सतत येतात रहातात .की आपली स्तुति आणि दुसऱ्याची निंदा* पण स्वःहा ची किती ही स्तुति केलि आणि दुसऱ्याची किती ही निंदा आपल्या वाणी मध्ये असली तरी हे आपल्या देहांती वाचवायला उपयोगी पडणारी काही ही गोष्ट नव्हे.उलट त्यानि आपला अहंकार पुष्ट होत रहातो.तेव्हा हे सगळ वाउग कशाला बोलायच? एक फार सुंदर कथा आपल्या लोक कथान मध्ये आहे.
एक मुर्तिकार आसतो.अगदि हुबेहुब माणसा सारखी दूसरी मुर्ति करन्या मध्ये अगदि पटाइत आसतो.वाकबदार आसतो.आणि त्याला जेव्हा कळत की आपल मरण जवळ आलेल आहे.तेव्हा यमाला फसवण्या साठी हा पठ्या आस करतो.की सहा सात आपल्याच् पध्दतीन दिसणाऱ्या मूर्ति करतो.आणि स्वःहा एका मुर्ति मध्ये लपून रहातो.यमाच्या लक्षात येत.की आपल्याला फसवण्या साठी ही गंमत चालली आहे.यम दुतानी सुध्दा फसाव त्या मुर्ति अतिशय सुंदर बनवलेल्या आसतात.मग यम एक युक्ति वापरतो.आणि त्या सगळ्या मुर्तिची थोडया वेळ स्तुति करतो आ रे वा वा काय सुंदमर मुर्ति तयार केल्या.अगदि हुबेहुब म्हणजे याच्या सारखा जगत मुर्तिकार नाही.त्याला बर वाटत आपली स्तुति ऐकल्या नंतर.आणि एक क्षण यम राज आस पटकन आस बोलून जातात या मुर्ति मध्ये जरा थोडिशि चूक राहिली आहे.आपली चूक राहिली हे लक्षात आल्यावर किंवा आस कोणी बोलल्यावर त्याचा अहंकार जागृत होतो आणि तो जिथ लापला होता तिथून बाहेर येऊन पटकन विचारतो काय चूक आहे? मी आयुष्यात कुठल्याही मुर्तिची निर्मिति करताना कधी चूक केलि नाही. मग माझ्या कडून कशी चूक राहिली? यमराज लागलीच म्हणाले.हा अहंकार आपण पुष्ट केलाय हीच चूक राहिलय.आणि त्या मूर्तिकराला जमराज घेऊन जतात.
अर्थात यातला तपशील जरी वजा केला तरी *आपल्या बोलण्या मध्ये स्वःहा ची स्तुति दुसऱ्याची निंदा हा विषय अधिकाधिक आसतो आसल बोलण टाळल पाहीजे* कारण
*घडिने घडी काळ आयुष्य नेतो*
आपल्याला कल्पना ही नाही.इतक्या गतिन काळ पुढ चाललेला आसतो.आणि आपल मानवी आयुष्य आस विचित्र आहे.की याला यु टर्नच नाही.तेव्हा तुला देहांती कोण सोडवणार आहे ? या यातनातून सोडवायच असेल तर एक प्रभु दूसरे संत.या कुणाची तरी कृपा तू संपादन केल्या शिवाय तुला त्या देहांती सुख होणार नाही.
भागवत ग्रन्था मध्ये एक छोटी सुंदर कथा आहे.
की अजामेळ नावाचा एक कुणी तरी होता.आणि तो अत्यंत पातकी पध्दती न आपल जीवन व्यथित करत होता.त्याला साधु संतानी एक विनंती केलि आज मेळा तुझी पत्नी गरोदर आहे.तेव्हा या तुझ्या सगळ्या धाकट्या मुलाच नाव तू नारायण ठेव.त्यानि नारायण आस नाव ठेवल आणि ते मुल देखील वेल्हाळ निघाल आणि त्या अजामेळाचा जिव त्याच्यावर जडला.अखंड त्या मुलाच्या रूपाने का होईना नारायण आस स्मरण सुरु झाल.अखंड नाम घेण सुरु झाल.नारायणा पाणी आणतोस का रे? नारायणा कुठे बसलायस रे? नारायणा जेवलास का रे? नारायणा इकडे येतोस का रे? अशा तऱ्हेन त्या नारायणाचा अखंड अनुसंधानाचा विषय झाल्या मुळे त्याला देह सोडून जाताना कोणत्याही यातना सहन करायला न लगता प्रत्यक्ष भगवान विष्णुच दर्शन होऊन विष्णु दुतानी त्याला घेऊन जाव आणि त्याचा उध्दार व्हावा अशा तऱ्हे ची कथा भागवत ग्रन्था मध्ये व्यास महर्षिआपल्याला सांगत आसतात.तेव्हा
*घडिने घडी काळ आयुष्य नेतो*
*देहांती तुला कोण सोडवू पहातो*
दुसर कोणी आपल्याला या यातना मधुन सोडवनार नाही.हे लक्षात घेऊ *आपण प्रभु ची रामचंद्रा ची त्या भगवंताची उपासना करण्या मध्ये जास्त वेळ आपला व्यथित केला पाहीजे.आणि वावग बोलण टाळल पाहीजे* असा महत्वाचा उपदेश या श्लोका मध्ये समर्थ आपणाला करतातय.
|| जय जयरघुवीर समर्थ ||