मना कामना सांडि रे द्रव्यदारा |
मना यातना थोर हे गर्भवासी |
मना सज्जना भेटवी राघवासी ||21|
जय जय रघुवीर समर्थ.
या श्लोकाच अर्थ पहाताना एक शब्द फार महत्वाचा आहे.आणि तो आपण बऱ्याच श्लोकान च्या वेळेला एक नियम लक्षात ठेवायचाय.की कविते मध्ये किंवा श्लोका मध्ये किंवा अभंगा मध्ये काही शब्द असे आसतात की ज्याला
*दहेरी दिप* आस म्हणतात.दहेरी दिप याचा अर्थ "उंबरठया वरचादिवा." दहेरी म्हणजे उंबरठा.उंबरठया वरच्या दिव्या सारखे हे शब्द आसतात.उंबऱ्या वरचा दिवा याला उपमा का दिली? जसा घरा मध्ये दिवा लावला त्याचा प्रकाश घरात होत असणार आहे .आणि समजा एकदम दारा बाहेर दिवा लावला तर त्याचा प्रकाश आंगणा मध्ये आसणार आहे. उंबरठया वरच्या दिव्याचा प्रकाश.तसा घरात ही येतो थोडा आणि आंगणात ही येतो.तसे कविते मध्ये काही शब्द आसे आसतात. की ज्याचा संधर्भ मागल्या शब्दा साठी पण घ्यायचा आसतो आणि पुढच्या शब्दा साठी पण घ्यायचा आसतो.अगदि एक प्रसिद्ध आभंग आहे बघा कान्होपात्रेचा.
आपण अनेक वेळा ऐकला असेल.
"पतित तू पावणा म्हणविसि नारायणा
तरी सांभाळी वचना ब्रीद भगवेसीअसे जाणा"
यात एक ओळ आली आहे पहा.
"याती नाही शुध्द भाव" आता याती नाही शुध्द भाव यातला "नाही" हा जो शब्द आहे.दहेरी दिप शब्द आहे.हा दोन्ही बाजूला घ्यायचा आहे बघा.'याती शुद्ध नाही' "नाही शुद्ध भाव" तेव्हा दोन ही शब्दांन च्या साठी ते मधले दोन शब्द दहेरी दीप सारखे आहे.तेव्हा या श्लोका मध्ये
*मना वासणा *चुकवि* येर झारा*
"मना वासणा चुकवि" "चुकवि येरझारा"
*चुकवि* हा शब्द येरझारे साठी आहे.वासणे साठी पण आहे. कीखरच
मनुष्याला परत परत जन्म का येतो.काही तरी उपभोगायची ईच्छा सतत त्याच्या मना मध्ये जी आपुरी राहिली त्याला वासणा आस म्हणतात. त्या वासणे मुळे परत त्याला जन्म घ्यावा लागतो.
"जन्म घेणे लागे वसनेच्या संगे"
आस संत महात्मे आपल्याला सांगत आसतात.तेव्हा ती वासणा जर चुकवली तर आपोआप येरझारा चुकनार आहे."पुनरपि जननम पुनरपि मरणम" ही सगळी येरझार थांबणार आहे.पण या साठी काय आवश्यक आहे?
*मना सांडी रे द्रव्य दारा*
या ठिकाणी एक शब्द असा आलाय."दारा" या शब्दाचा अर्थ पत्नी असा होतो बघा.पण मग कुणी आशी पण शंका घेईल की स्त्री ला आध्यात्म साधना नसते का? कुणी स्त्रीन आध्यात्माच्या दृष्टिन पर्मार्थाच्या दृष्टिन साधना करुन मुक्त व्हायच नसत का? मग फक्त पुरुषार्थान साठी सगळ आध्यात्म परमार्थ आहे का? अशा कुठल्या तरी वाद वदंगा मध्ये तुर्त न पडता.दारा हा शब्द जरी त्या ठिकाणी असला तर आपण त्या ठिकाणी जोडीदार असा अर्थ करुन याच्या पुढच्या चिंतना करता पुढ जायला काही हरकत नाही.कारण काय वादा मध्ये वेळच निघून जाण्या पलिकडे हाताला काही लागत नाही.तेव्हा द्रव्य आपल्या पाशी असलेल वैभव आणि आपले त्या आयुष्यातले असलेले जोडीदार.या सगळ्यांनच्या बध्दल ची कामना आहे.जी आसक्ति आहे.ती सांडल्या शिवाय अपोआपच वासणा कमी होणार नाही.आणि वासणा कमी झाल्या शिवाय येरझार थांबणार नाही.आणि मग समर्थ पुन्हा काकुळती न विचारतातय.आपल्याच मनाला सांगितल्या सारख करतातय. आ रे.
*मना यातना थोर झाल्या गर्भवासी*
तेव्हा माझ्या मना आता इतके जन्म करत करत या जन्माला आलो आहे.आता परत ह्य त्रासा मध्ये नको रे बाबा अडकवु.
*मना सज्जना भेटवी राघवासी*
मला माझ्या पभु रामचंद्राला मला भेटाव रे.खरच समर्थान च्या जीवना मध्ये सुध्दा आसे काही प्रसंग झाले.की ज्याच्या मध्ये तातपर्य आपोआप आपल्या लक्षात येत.
समर्थानची माता नारायणा ची माता रानु बाई.समर्थ जेव्हा लग्न ठरलेल असताना सुध्दा लग्नाच्य मांडवातून निघून गेले अर्थात जिच्याशि लग्न ठरल होत तीच नंतर त्याच मांडवा मध्ये दुसऱ्या एक उपवराशि लग्न होऊन गेल.तिचा संसार सुरु झाला.पण समर्थानी इकडे टाकळीला येऊन आपल्या तपश्चर्येचा संसार सुरु केला.पुढे भारत भ्रमण केल याच्या मध्ये बरीच वर्ष गेली.आणि जेव्हा ते नंतर आई च्या भेटीला आले तेव्हा त्यांच्या लक्षात आल.की आपली आई आपली आई आपली वाट पहाता पहाता आपल्या वियोगान रडून रडून आंधळी झाली आहे.आणि अशा तऱ्हेन दृष्टी गेलेली असताना अतिशय दुःखी होती सगळा जन्म विफल झाला किती बिचारी ची आवस्था आशी होती.समर्थानी आपल्या तपश्चारे च्या बळानी तिला दृष्टी पुन्हा प्राप्त करुन दिली आणि राघवाच दर्शन ही घडवल.आणि ते घडवल्या नंतर आयुष्या मधल्या सगळ्या दुःखाच निचरा झाला.सगळे दुःख बाजूला झाली आणि पुर्ण जीवना मध्ये त्या आई च्या सार्थकता आली.आणि तो भाव तिन स्वःहाच प्रगट केला.तेव्हा.
जरी जन्मा मध्ये गर्भवासा मध्ये पुढच्या आयुष्या मध्ये प्रचंड मोठ दुःख असल तरी त्या *राघवाची जर भेट झाली त्या प्रभु राम चंद्राला त्या परब्रम्हाला मला पहाता आल अनुभवता आल याच्या सारख जीवनाच सार्थक नाही आणि हे सार्थक आपल्या सधकांनी मिळवाव असा उपदेश या ठिकाणी समर्थ आपल्याला करतात*
|| जय जयरघुवीर समर्थ ||