रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥
जय जय रघुवीर समर्थ.
अनेक तत्वज्ञ लोकांच एक प्रसिध्द वाक्य आहे.की *जगा मध्ये सुखी होन सोप आहे.पण दुसऱ्याच्या पेक्षा सुखी होण हे फार आवघड आहे* या वाक्याचा अर्थ इतकाच की मनुष्य नेहमी आपल्याला काय मिळाल? किती मिळाल? याचा हिशोब करतच नाही.आणि दुसऱ्याला काय मिळाल?किती मिळाल ? ते मला का नाही मिळाल? याचा हिशोब करत रहातो.आणि त्या मुळ त्याला मिळाल तेव्हड वैभव मला मिळाल पाहीजे.त्याला मिळालेली किर्ती तेव्हडि मला मिळाली पाहीजे.त्याची सुख संमृध्दि बघितलि तेव्हड सगळ मला मिळाल पाहीजे.आणि मग तो व्यर्थ शीण घेण्याचा प्रयत्न करत रहातो.समर्थ या ठिकाणी सांगतात.भगवंताला प्राप्त करुन घेण्याच्या कष्टा पेक्षा ही इतर कष्ट का करावे? आणि ते सुध्दा का? तर
*जना सारिखे व्यर्थ का ओसनावे*
त्याच्या सारख मला व्हायच आहे.म्हणुन का?मनुष्याच मन तर इतक विचित्र आहे.की आपल्याला मिळालय आहे याच्यात ते समाधानी रहात नाही. दुसऱ्याला याच्या पेक्षा काही जास्त मिळतय म्हटल्यावर जीवाचा असा काही जळ फळाट होतो की बापरे बाप.
एक फार प्रसिध्द लोक कथा आहे.असेच एक कीर्तनकारबुवा त्याचे सोबत एक पेटी वादक एक तबला वादक एक झांज वाला.आशे चौघ जन गावोगाव जाऊन कीर्तन सेवा करायचे.आणि बराच काळ गेला. दोन तिन तप त्यांची कीर्तन सेवा चालु होती.आणि मग सगळी एव्हडी सगळी छान सेवा झाल्या नंतर प्रभु रामचंद्रानी स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिल.आणि म्हणाले." बुवा आम्ही तुमच्या वर प्रसन्न झालोत तुम्हाला जे हव जीतक हव ते आम्ही तुम्हाला देणार" सहजिकच बुवांना आनंद झाला.वा वा काय तिन तपाच्या तपश्चर्यच पुण्य मला मिळालय वा वा.अतिशय आनंद झाला.पण दुसऱ्या क्षणाला तो आनंद संपला.कारण भगवंत एव्हडच म्हणाले."बुवा साहेब तुम्ही काही ही मागा मी ते तुम्हाला देनारच आहे.पण तुम्ही जे मागाल त्याच्या दुप्पट तुमच्या साथी दाराना देनार "आ रे देवा.आता मात्र अस्वस्थता वाढली.मी समजा एक कोटि रूपये मागितले तर मला एक कोटि मिळतील माझ आयुष्य चांगल जाईल. पण यांना दोन दोन कोटि फूकटचे मिळणार.काय करु.काय करु? काय करु? देवाला हाका मारायची सोय नाही तो समोरच उभा होता.मग काय शक्कल लढवलि महाराजानी? चालेल.पण आस करुया का आपण? मला जे देणार त्याच्या दुप्पट माझ्या साथीदाराना मिळणार बरोबर? हो.मग आस करुया का देवा? माझा एक डोळा जाऊ दे. किती दुष्ट किती दुष्ट किती दुष्ट? म्हणजे कीर्तनकारबुवाचा एक डोळा गेला म्हणजे या सगळ्या साथीदाराचे दोन्ही डोळे जातील.याला एका डोळ्यांनी का होईना दिसेल पण ते दोघे आंधळे होतील.आशी विचित्र वासणा मना मध्ये येते.
"आहो पूर्व पुण्य ज्याचे घडे सुख त्याला
कुणी राव होइ कुणी रंक झाला"
या नियमा प्रमाणणे कस छान अलिप्त रहाव.पण नाही.त्याच्या सारख मला का मिळाल नाही? या मघ्ये इतका शीणतो इतका शीण तो ओव्हर टाइम करायला तयार.मेहनत करायला तयार. का?त्याच्या इतक मला मिळाल पाहीजे.त्या मुळे नाम साधने करता वेळ देता येत नाही.म्हणुन समर्थ म्हणतात.त्या करता व्यर्थ शीनू नकोस.
*सदा सर्वदा नाम वाचे वसोदे*
नामस्मरण करताना किंवा कोणती ही साधना करताना.सगळ्यात मोठी अडचण असते ति अहंकार नावाच्या एका शत्रु ची.की बाबारे आपल तत्व आहंकाराने व्यापल तर ते व्यर्थ व्हायची शक्यता असते .
खुप प्रसिध्द कथा आहे पुराणा मधली.आपल्या सर्वाना माहित असेल.एकदा दुर्वास ऋषि अंबरीराजा कडे आले.राजच व्रत होत.एकादशी चा तो उपवास करत असे उपवास म्हणजे निर्जळी उपवास.त्या दिवशी पाणी ही प्यायच नाही.द्वादशीच्या दिवशी सकाळी दुर्वासा ऋषि आले.बर वाटल वा वा उपवास सोडण्या साठी एक सतपात्र ऋषि माझ्या बरोबर आहे.पण दुर्वास ऋषि स्नान संध्ये साठी ध्यान धारने साठी नदि वर गेले.ते सायंकाळ होइ पर्यन्त आलेच नाही.आता सूर्यास्त झाला तर व्रत मोडेल.व्रत मोडू नये म्हणुन फक्त अंबरिशाण दोन घोट पाणी पिल.आचमन केल.ते सुध्दा दुर्वासा ऋषिना सहन झाल नाही.कारण मी एव्हडा तपस्वी आहे.तप होत पण त्याला अहंकार जोडल्या आसल्या मुळे त्याला कही पवित्रता नव्हती.त्यानि आपल्या जटे मधुन कृत्या निर्माण केलि आणि ति अंबरिशावर सोडली.अंबरिशान देवाची कृपा मागितली तर भगवंतानि सुदर्शन चक्र आस सोडल की त्या मध्ये कृत्या ही संपली आणि ते चक्र दुर्वसाच्या माग लागल.त्या चक्रा पासुन सुटका व्हावी म्हणुन दुर्वासने ब्रम्हदेवाला विनंती केलि, विष्णुला विनंती केलि ,महादेवाना विनंती केलि,कुणीच काही करु शकत नव्हत. कारण ते ज्याच्या साठी सूटल होत त्यानि आपली तक्रार मागे घेतल्या शिवाय थांबणार नव्हत.शेवटी अंबरिशा जवळ च याव लागल आणि जेव्हा अंबरिशान सांगितल की भगवंता मी माझ रक्षण कर एव्हडच तुला सांगीतल होत दुर्वासान च्या मागे त्रास दे आस कुठ सांगितल होत?
कथेच तातपर्य एतकच की दुर्वासच तप होत.वाईट एक होत.पण अहंकार आसल्या मुळे तपाला एक आवश्यकन पवित्रता प्राप्त होत नव्हती.विघ्न येत होती किंवा काही काळ शाप सुध्दा असत्य ठरत होता.
*आपल्या उपासनेला कधी ही व्यर्थता प्राप्त होऊ नये म्हणुन समर्थानी या श्लोका मध्ये नाम साधना असावी पण अहंकार नसावा* अशा दोन्हीही सुचना या श्लोका मध्ये आहेत.
|| जय जयरघुवीर समर्थ ||