आरती विष्णूमूर्ति जय महालया शक्ति मोहिनीराज आरती

आरती विष्णूमूर्ति । जय महालया शक्ति । 

आरती विष्णमूर्ति ।।धृ . ।। 


मोहिनी रूप तुझें तुवा आणिलें युक्ति । 

बैसोनी देव दैत्य सर्व समुदाया पंक्ति । 

वाटिलें एकवट सुरा असुरा युक्ति ।।१ ।। 

आरती विष्णमूर्ति ।।धृ . ।।


चोरूनि राहुनें अमृतपान केलें । 

देखोनि शशिसूर्य मग तुज जानविलें । 

चक्र हे काढोनियां त्याचे शिर छेदिले । 

ग्रासिले रविचंद्रा ग्रहण तेथोनि झालें || २ || 

आरती विष्णमूर्ति ।।धृ . ।।


प्रसिद्ध निधिवास जेथें प्रवरा वाहे । 

ते स्थळीं वास तुझा भूमिवैकुंठ आहे | 

भक्तिमुक्ति शीघ्र पावे तव भजनी राहे | 

गोसावी नंदन म्हणे कृपेनें पाहे || ३ ||

आरती विष्णमूर्ति ।।धृ . ।।
थोडे नवीन जरा जुने