मना वीट मांनू नको बोलण्याचा |
पुढे मागुता राम जोडेल कैंचा |
सुखाची घडी लोटतां सुख आहे |
पुढें सर्व जाईल कांही न राहे ||25||
जय जय रघुवीर समर्थ.
जवळ जवळ पंचवीस श्लोक आता पर्यन्त झालेत.या पंचवीस वेळा समर्थ आपल्या मनाला म्हणजे त्यांच्या मनाला उपदेश केल्याच निमित्य करुन ते आपल्या मनाला उपदेश करतात.आणि सहाजिक आहे हो.विस वेळा बाविस वेळा पंचविस वेळा तेच तेच सांगितल तर एखाद्या वेळेला वीट येऊ शकतो.समर्थ म्हणतात मी तुला फार महत्वाची गोष्ट,फार चांगली गोष्ट,फार आवश्यक असलेली गोष्ट,सारख सारख सांगतोय कृपा कर त्याचा वीट माणु नको.
साधारणतः मनुष्याला दोन प्रकारे वीट येऊ शकतो. एक *किती ही चांगल असल तरी सतत सतत त्याची आठवण करुन दिली तरी एखद्या वेळेला अहंकारा मुळे वीट येतो* आ रे हे मला काय कळत नाहि का? मला हे काय समजत नाही का? मला हे सगळ समजण्या सारखा नाहीये का? हे सगळ मला कशा साठी सांगतातय.हा थोडा अहंकार आपल्याला लगेच सांगतो .किंवा
दुसर समोरची बोलनारी व्यक्ति जर अनाधीकारी असेल तर मग त्याच्या बोलण्याचा आपल्याला काही वेळा त्याच्या बोलण्याचाआपल्याला वीट येतो.गाण्याच्या महिपली बध्दल जर योग्य परीक्षण करायच असेल,उत्तम गायकान कराव.दुसऱ्यान येऊन हे कशाला सांगाव? दूसरा माणूस सांगेल ते काही संगीताच्या दृष्टीन असेल याला काहीच अर्थ नाही.की शास्त्रीय संगीता मध्ये पहिल्यांदा बड़ा ख्याल म्हणजे संत गायन केल जात.त्या नंतर थोड जलद गतिच गायन केल जात.आणि मग शेवटी तराना वगैरे प्रकारात आत्यंतिक जलद गतीने त्याच्यावर आपली कमांड आपल स्वामित्व किती आहे हे दाखवल जात.आणि ते लोकांन पर्यन्त पोहचवल जात.आता याच्या मध्ये कुठे लइचा क्रम चुकला असेल किंवा लइ थोड काही माग पुढ झाल असेल यातला संगीताच जानकार माणुस असेल त्यानि काही सांगितल असेल तर इतका त्रास नाही होत.पण एखादा मनुष्य जर आपल्याला उगाचच सांगू लागला."त्याच काय आहे बरका महाराज तुम्ही पहिल्यांदा उत्तम म्हणजे शांत पणे गायल.पण शेवटी गाण
संपवताना घाई घाई आस का केल?कळल नाही? आता आसल कुणी जर आपल्या संगीताच परिक्षण करायला लागला तर सहाजिक मनुष्याला वीट येतो. याचा अधिकार नाही या बाबतीत लबोलण्याचा. *समोरचा अनाधिकारी असला तरी सुध्दा त्याच्या बोलण्याचा विचार करावा आस आपल शास्त्र सांगत* कारण तो काही प्रमाणात का होईना त्यान काही तरी तुला प्रतिक्रिया तर दिली आहेन? या ज्ञानाच्या बाबतीत तो लहान असला तरी सुध्दा त्यान एखादि गोष्ट विचारलि असेल,एखादि गोष्ट सांगितली असेल,आणि ति आपल्या पुढच्या कला सादरी करना करता आवश्यक असेल,आवश्यक ति प्रगति देणारी असेल,तर मनुष्यान त्याच्या कडे दुर्लक्ष करु नये.
एक साधि गोष्ट.तुकोबाराय यांच्या चरित्रा मध्ये आहे.आपले यथा शक्ति काही संसार आपला प्रपंच तुकोबाराय करत होते.बहुत आंशि वेळ ते भंडारा च्या डोंगरावर वरती जाऊन तपस्या साधना करत असत.त्यांना तो साक्षात्कार हवाच होता. तेव्हा दिवस दिवस ते एखद्या साधने मध्येच दिवस व्यतीत होत असत.आणि साधारण संध्याकाळी आपल्या घरी परत येत असत.अशा वेळेला गावातल्या काही लोकांनी येता जाता थोडीशि टिंगल केलि."आहो कुठली साधना आणि कुठली तपस्या म्हणे विठ्ठलाचा साक्षात्कार मिळवण्या साठी जतात.कसल काय अन कसल काय? आहो डोंगरा वर जायच जमेल तेव्हड वेळ तीथ रहायच विठ्ठल भेटला काय किंवा नाही भेटला काय?काय फरक पडतोय ? यायच पुन्हा घरी" अशा तऱ्हेची लोकांची निंदा ऐकली मात्र.म्हणुन तुकोबाची गाथा ही कित्येक वेळेला आस वाटत त्यांची दैनंदिनीच आहे.त्यांची डायरी आहे.त्यांचे अनुभवच त्यांनी त्यात लिहले.आणि त्याच्या वरण सुध्दा ते शिकले. आता हा निंदा करणारा आध्यात्मातला कुणी अधिकारी वगैरे होता आस आजीबात नाही.सामान्या होता. सामान्यातला सामाण्य,साधना न करणारा होता.तरी तो म्हणाला.
याच्यात ही काही मुद्दा आहे कारण खरच मला पांडुरंग हवा आहे हे अगदी बरोबर पण तो हवाच आहे.तोच हवा आहे.आस आहे का? तो नाही मिळाला तर मला काय फरक पडणार आहे?मी संध्याकाळी पुन्हा यईन जेवनार नंतर .म्हणुन "निंदकाचे घर असावे शेजार" तुकोबा सांगत असत ते याच्या साठीच. होऊ दे निंदा.त्याच्यातून शिकता येत.आणि मग मात्र त्यानि तो भंडारा डोंगराचा रस्ता सोडुन ते विहिरी कडे गेले.तिथे त्यांनी सलग तेरा दिवस प्रचंड मोठी तपश्चर्या झाली आणि मग "आनंदाचे दोही आंनद तरंग" असा साक्षात्कार प्राप्त करुन घेतला.
मुद्दा इतकाच होता.की अशा बोलण्याचा वीट माणु नये.त्या बोलण्याचा थोडा विचार केला पाहीजे आणि त्या प्रमाण आपली प्रगति केलि पाहीजे.म्हणुन या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आल्याला सांगतातय की
*मना वीट मानू नको रे बोलण्याचा*
आस जर चांगल बोलण्याचा वीट माणला तर
*पुढे मागता राम जोडेल कैंचा*
मग त्या रामाला त्या परब्रहाला तू कसा काय जोडनार आहेस सांग बर ? आणि अनखिन सांगु? तू माझ्या बोलण्याच वीट माणु नकोस. तू जर संसरात रमणार असशील तर तुझ्या सारखा मुर्ख कोणी नाही.या ठिकाणी जी तीसरी ओळ आहे.तिसऱ्या ओळीला पुर्ण विराम आसल्या पेक्षा बहुतेक प्रश्न चिन्ह असाव आस वाटत.
*सुखाची घडी लोटता सुख आहे*
एकदा त्या सुखाच्या काही क्षणाला समाप्ति मिळाल्या नंतर त्या सुखाचे क्षण संपल्या नंतर? आहो जीवना मध्ये कशाच्या नंतर सुख नाही शिल्लक. *कोणत ही सुख उपभोगता भोगता भोगता क्षीण होत जात संपत जान आपल्या स्वतः च्या क्षमता संपत जान हाच निसर्ग आहे* कोणता आनंद या जगा मध्ये असा आहे जो घेता घेता वाढत जातो? नव्हे तो घेता घेता पुढे नष्टच होत जातो.तेव्हा जे पुढे नष्टच होणार आहे त्यात तू रमनार असशिल माझ्या बोलण्याच वीट मानुन,तर तुझ्या सारखा वेडा तूच आहेस? आरे बाबा आस करु नकोस.
*सुखाची घडी लोटता सुख आहे?*
कुठ सुख तुला दीर्घ काळ मिळणार आहे?
*पुढे सर्व जाईल काही न राहे*
तू ज्याच्या ज्याच्या साठी म्हणुन तु प्रयत्न केलेस ते काहीच रहानार नाहीये. *साधना केलिस उपासना केलिस ति मात्र तुझ्या पाशी नित आयुष्य भर वाढत जानार आहे.जन्म जन्म वाढत जाणार आहे* आनंद देत हे होणार आहे.हे लक्षात ठेऊन तू तुझ आयुष्य घाल.
|| जय जयरघुवीर समर्थ ||