मनोबोध श्लोक २६ वा (देहे रक्षणा कारणे यत्न केला)


देहे रक्षणा कारणे यत्न केला |
परी शेवटी काळ घेउनि गेला |
करी रे मना भक्ति या राघवाची |
पुढे अंतरी सोडि चिंता भवचि ||26||

जय जय रघुवीर समर्थ.

मनुष्य अनेक वेळेला अनेक अनेक वेळेला प्रयास करताना दिसतो,आपल्या देह रक्षणा साठी.पण हे देह रक्षण पुष्कळशा वेळेला देह सौख्या साठी असत.साधने साठी असत नाही.एखाद्याला तुम्ही विचारल.काहो तुम्ही या माँर्निंगवाँकला येता सकाळी तर दोन प्रदक्षणा तिन प्रदक्षणा करता तुम्ही या सगळ्या पटांगनाला.आज तुम्ही पाच प्रदक्षणा केल्या वा रे वा.तुम्हाला काही विशेष तीर्थयात्रा करायची आहे या साठी तुम्ही तयारी करता की काय? माणुस म्हणतो.हया,आहो त्याची कसली तयारी हो.आहो जरा दोन फेऱ्या जास्त मारल्या. का? पाडवा आहे.पुरणपोळी खायचि आहे.ति पचवण्या साठी थोडया जास्त कँलरिज जळल्या पाहिजेत.म्हणुन सकाळच चालन आहे.
एखाद्याला म्हणाव अगदि चांगल्यातलि चांगली टूथपेस्ट घेऊन, छान दात घासतोयस. प्रभुरामचंद्राच नाव मुखावाटे याव या करता स्वच्छता बाळगतोस का? सहाजिक आहे "रा"उच्चारयला "रामरक्षा" हा शब्द उच्चारायला मुखाचि, दाताची,जिभेची,आवस्था ठणठणीतच असायला हवी.नाही तर कोणत्या क्षणि राम हा शब्द लांम लांम लांम जाईल याचा नेम नाहीं.यादृष्टिन विचारल.तुम्ही एव्हडी दाताची निगा ठेवता.मुखाचि चांगली काळजी घेताय.म्हणजे रामनाम छान याव या साठी करताय ? 
छे हो.रामनाम कुठल विचारात घेताय? दात चांगले ठेवतो.चकल्या खायला मिळाल्या पाहीजे.कटगोळी खायला मिळाली पाहीजे.
म्हणजे पुष्कळशा वेळेला देह सौसष्ठ देह सौख्य हे सगळ मी देहाच रक्षण मी का करतो? की या देहा साठी जे उपभोग आहे तेच भोगण्या साठी माझ्या देहाच रक्षण करतो.
पण समर्थ म्हणतात.या देहाला राखण्या साठी,आपल्या देहाला सुधारण्या साठी किती किती ही प्रयत्न केला
 *परी शेवटी काळ घेउनि गेला*
तो तुला तशी शेवट पर्यन्त साथ करणार नाही.किंमबहुना तो एका विशिष्ट काळा नंतर तो दुरच होणार आहे.काळ त्याला घेऊन जाणार आहे.तुझ्या पाशी तो रहाणारा नाही.
*करी रे मना भक्ति या राघवचि*
माझ्या राघवाची,परब्रम्हाचि जर भक्ति  केलि पुढच्या आयुष्यात काय होईल.का पुढच्या जीवनात आपल चांगल होईल बर होईल का कस होईल याची चिंता कराविच लागणार नाही.
आपल्याला महाभारता मधली एक प्रसिध्द कथा माहीत आहे.की
युध्दा मध्ये द्रोणाचार्याणि चक्रव्ह्यू लावला होता.त्या चक्राच भेदन करुन अभिमन्यु आत मध्ये  शिरला.त्याला बाहेर पडता आल नाही.तो बिचारा त्या युध्दा मध्ये  सहा वीरांन कडून एकत्र मारला गेला.आणि अत्यंत आहत होऊन पडला.आता सूर्यास्त झाला की युध्द थांबत असे.अभिमन्यु आर्जुनाच मुलगा.अर्जुन दुसऱ्याच आघाडी वर लढत होता त्यान विचार केला अजुन माझा पुत्र का नाही आला?आणि मग जेव्हा सगळ्यानी  रणांगणावर शोध घेतला तेव्हा जखमी झालेला मरणासन्न आवस्थे मध्ये अभिमन्यु दिसला.अर्जुनाला वाईट वाटल.त्या वेळेला अभिमन्यु एकच म्हणाला.बाबा मी धर्मयुध्दा मध्ये धर्माच्या बाजुने लढताना मी मृत्यु पडतोय याचा मला आंनद आहे.पण वाईट एकाच गोष्टीच वाटत.मी असा मरणासन्न अवस्थे मध्ये पडलो असता जयंद्रथ नावाच्या राजाने माझ्या मस्तका वर लाथ मारली.हा अपमान माझ्या मनाला सलतोय.त्या क्षणी अर्जुनाने प्रतिज्ञा घेतलि.की उद्या सूर्यास्त होई पर्यन्त जयंद्रथाला मारुन टाकिन.नाही तर मी स्वःहा मृत्यु मुखी जाइन.आणि आता आपला भक्त जे बोलला त्याची काळजी भगवंताला जास्त लागली.गोपाळ कृष्ण विचार करु लागले की या लोकांना अर्धी प्रतिज्ञा नाही का करता येत? की सूर्यास्ता पर्यन्त मी 
जयंद्रथाला मारिन एव्हड पुरेस् होत ना.पुढ  मी मरीन कशाला म्हणायच? म्हणजे जे शत्रु ला हव ते आपोआपच मिळणार.अर्थात दुसऱ्या दिवशी जयंद्रथा चा देह रक्षण करण्या साठी प्रचंड प्रयत्न केला कौरवानी.संध्याकाळ होई पर्यन्त 
जयंद्रथ दृष्टिसच पडू  दिला नाही.आता सूर्यास्त होणार हे लक्षात घेतल्यावर सुदर्शन चक्र सोडल.सूर्यास्ताचा भास् निर्माण केला आणि आता अर्जुन स्वताः ची चिता रचुन मारायला निघाला  भाव असा होता .भाव काय होता? पुढ सगळ्या भावाच काय होईल याची चिंता सोडुन दे.तू भगवंताची भक्ति करतोस ना? त्याची साधना करतोस ना? त्याने सांगिलया प्रमाणे गीते मध्ये उपदेश केल्या प्रमाणे आचरण करतोस ना? मग आता पुढे भवा मध्ये काय होणार याची चिंता तो बरोबर करेल.अत्यंत शांत भावनेन अर्जुन चिता रचत होता.आणि आता अर्जुन कसा मारतो हे पहायला तो वेडा जयंद्रथ त्या गर्दी मध्ये आला.आणि मग सुदर्शन चक्र बाजूला घेऊन भगवंतान दाखवल आ रे सूर्य आहे बाजूला नको मरुस अर्जुना.हा सूर्य आणि हा जयंद्रथ.
देहे रक्षणा कारणे किती प्रयत्न केला.तरी त्या मुर्खाच्या मुर्खतेन तो काळ घेऊन गेला.ज्यानी भगवंताची भक्ति केलि अर्जुनाला मृत्यु आला नाही अशातलि गोष्ट नाही तरी सुध्दा माझ्या जीवना मध्ये पराजय दुःख आस वगैरे काय येईल याची चिंता भक्ताची आपोआप सुटते त्याची चिंता स्वःहा भगवंत करतात .
*तू राघवाची भक्ति कर त्याच्या पुढची सगळी चिंता भगवंत करतील यात संशय नाही* हे सांगण्या साठी हा सव्विस् क्रमाकाचा श्लोक आपण चिंतना साठी घेतला.

|| जय जयरघुवीर समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने