धन्य धन्य हो प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची | 
झाली त्वरा सुरवरां | विमान उतरायाची || १ || 

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी ।
सर्वहि तीर्थ घडली आम्हां आदिकरूनि काशी ।।
धन्य धन्य हे प्रदक्षिणा || २ ॥

 मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती ।
 नामसंकीर्तनें ब्रह्मानंदे नाचती ।।
 धन्य धन्य हे प्रदक्षिणा || ३ ॥ 

कोटि ब्रह्माहत्या हरिती करितां दंडवत | 
लोटांगण घालीतां मोक्ष लोळे पायांत ||
 धन्य धन्य हे प्रदक्षिणा || ४ ॥ 

गुरूभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी । अनुभव ते जाणती जे गुरूपदिंचे रहिवासी || 
धन्य धन्य हे प्रदक्षिणा || ५ || 

प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला । 
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला || 
धन्य धन्य हे प्रदक्षिणा . ॥६ ॥
थोडे नवीन जरा जुने